top of page

Search Results

68 results found with an empty search

  • हेरिटेजच्या मुलांनी घेतला ऐतिहासिक ‘छावा’ चित्रपटाचा अस्वाद, व मिळाला उस्फुर्त प्रतिसाद.

    हेरिटेज इंटरनॅशनल स्कूल, कासार अंबोली, मुलशी, पुणे दिनांक - २५ फेब्रुवारी २०२५ हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक श्री. कृष्णा भिलारे सर, सचिव सौ. संगीता भिलारे मॅम व्यवस्थापक संचालक अध्यक्ष श्री.कुणाल भिलारे सर तसेच व्यवस्थाकीय संचालिका सौ. यशस्विनी भिलारे मॅम व शाळेच्या मुख्यध्यापिका सौ. डॉ. रेणू पाटील मॅम यांनी फेब्रुवारी २०२५ ला विद्यार्थ्यांना दिनांक २४ आणि २५ तारखेला ऐतिहासिक चित्रपट "छावा" पाहण्याची एक चांगली संधी प्रदान केली. या चित्रपटाने स्वराज्यप्रती असणारे प्रेम हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या संघर्ष आणि बलिदानांबद्दल आदर आणि कौतुकाची भावना जागृत केली आहे. "छावा" हा २०२५ चा ऐतिहासिक कृती चित्रपट आहे. जो छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे, जो शिवाजी सावंत यांच्या प्रसिद्ध कादंबरीने प्रेरित आहे. या चित्रपटात त्यांचे शौर्य, दृष्टी आणि स्वराज्य प्रेम आणि आपल्या हिंदवी राज्याविषयी असणारे अतूट समर्पण यांचे एक शक्तिशाली चित्रण रेखाटले असून जिवंत देखावा हा मनाला अगदी भावनिक व हृदयाला स्पर्शून जातो. " छावा" पाहणे हा एक महत्त्वपूर्ण शैक्षणिक हेतू आहे. हे मराठा योद्धा आणि त्यांच्या कुटुंबियांनी केलेल्या संघर्षाची जाणीव विचारात घेतलेल्या कथा आणि त्याग प्रकाशित करते, विशेषत: समाजावरील युद्धाच्या,निर्बलतेच्या, जाती विचार ह्या सारख्या परिणामावर आणि मागे राहिलेल्या लोंकाच्या लवचिकतेच्या मनावर विचार करून लक्ष केंद्रित करते. छत्रपती संभाजी महाराजांचे धैर्य व संघर्ष दर्शविणारे मराठा धर्म रक्षक आजच्या युगात हा चित्रपट मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करतो. तसेच हे विद्यार्थ्यांना समजण्यासाठी स्वराजासाठी केलेले बलिदान आणि या मावळ्यांचे ऐतिहासिक महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत करते. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा धगधगता इतिहास मांडणाऱ्या बहुचर्चित ‘छावा’ या हिंदी चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून हेरिटेजच्या विद्यार्थ्यांनी देखील त्याचा उस्फूर्त प्रतिसाद घेतला तसेच चित्रपट दरम्यान विद्यार्थ्यांनी मोठ्या आवाजात जयघोष करत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची शिवगर्जना देखील करून डोळ्यातील अश्रू वाहत छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी प्रेम व आपुलकी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना ज्ञानात भर घालून ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकल्याबद्दल आणि हिंदवी मराठा साम्राज्याच्या समृद्ध वारशाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी प्रेरणा दिल्याबद्दल या चित्रपटाचे मनापासून कौतुक व शतशः आभार.

  • समर्थ च्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धेत यश

    अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन बंगलोर व सॅमसंग मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बँगलोर येथे झालेल्या "अन्वेषण" या राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प स्पर्धेत समर्थच्या विद्यार्थ्यांना "१०० टाईम्स क्युरियस क्वेश्चन अवार्ड " हे विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आल्याची माहिती समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे व गुरुकुल चे प्राचार्य सतिश कुऱ्हे यांनी दिली. ही स्पर्धा सॅमसंग सेमिकन्डक्टर इंडिया यांनी पुरस्कृत केली होती.अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्या सहयोगाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी नुकतीच विज्ञान आणि तंत्रज्ञान राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धा बँगलोर येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालय,बेल्हे कम्प्युटर इंजिनिअरिंग अंतिम वर्षात शिकत असलेले ऋतुजा गवांदे व वैष्णवी गणेश आणि समर्थ गुरुकुल मधील प्रगती औटी व प्रांजल दाते या ग्रुप ने सादर केलेल्या "कृषी तज्ञ" या प्रकल्पान्वये विद्यार्थ्यांना विचारल्या गेलेल्या शंभर प्रश्नांना अतिशय समर्पक उत्तरे देत समर्थ च्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली. रुपये पाच हजार रोख,सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. हा प्रकल्प तयार करण्यासाठी समर्थ अभियांत्रिकीच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाचे विभागप्रमुख प्रा.निर्मल कोठारी,कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा.स्नेहा शेगर,प्रा.प्रियांका लोखंडे,प्रा.अजिंक्य,अभंग प्रा.राणी बोऱ्हाडे तर समर्थ गुरुकुलच्या प्रिया कडूसकर यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर तसेच संकुलातील सर्व विभागाचे प्राचार्य विभागप्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

  • जन्मोत्सव शिवरायांचा सोहळा मराठी अस्मितेचा : हेरिटेज इंटरनॅशनल स्कुल ,कासार आंबोली

    जन्मोत्सव शिवरायांचा सोहळा मराठी अस्मितेचा “प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय...” असा जयघोष करत हेरिटेज इंटरनॅशनल स्कूल कासार आंबोली येथे आज मोठ्या जल्लोषात शिवजन्मोत्सव म्हणजे शिवजयंती साजरी करण्यात आली. या वर्षाची कार्यक्रमाची मुख्य संकल्पना शिवराज्याभिषेक सोहळा ही होती. “प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते.” राजमुद्रेवर कोरलेल्या या शब्दांनी महाराजांचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणूनच शाळेत महाराजांचे स्मरण करण्यासाठी त्यांच्या कार्याची थोरवी जाणण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवजयंती उत्सवात खालील सादरीकरणांचा समावेश होता: कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमात सादर होणारे विविध सादरीकरण रुपी पुष्पांनी जणू एक माळच गुंफण्यात आली. या माळ मार्फत महाराजांचा जीवनकाल नाट्यरुपात अमृता शिंदे इ. 9वी व वृद्धी राजगुरू इ. 6वी. या विद्यार्थिनींनी सादरीकरण केले. शिवरायांचा पाळणा या नृत्यातून शिवरायांचा जन्मोत्सव दाखवण्यात आला. लाठीकाठी या नृत्यामार्फत शिवरायांचे युद्ध कौशल्यांचे प्रदर्शन करण्यात आले त्यानंतर शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा नृत्य व नाटकामार्फत दाखविण्यात आला. राज्याभिषेकासाठी मासाहेब जिजाऊ व राजा छत्रपती यांचे अश्वारूढ होऊन आगमन झाले. व राज्याभिषेक सोहळा दाखविण्यात आला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक शपथ विधी दाखवण्यात आला. त्यानंतर इयत्ता सहावीच्या हिमाक्षी बीटे हिने आपल्या भाषणामार्फत महाराजांची थोरवी गायली. 3री ते 5वी व इयत्ता 6वी च्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादरीकरण केले त्यातून शिवाजी महाराजांचे शौर्य साहस व पराक्रम दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच इयत्ता 7वी चे विद्यार्थी नील देवजीरकर आणि अमेय भोसले या विद्यार्थ्यांनी महाराजांवरती एक सुंदर असं रॅप गायले. इयत्ता पहिली व दुसरी अनुक्रमे स्पृहा हिमगिरे शरण्या व राजवीर पाटील यांनी महाराजांची माहिती सांगणारे कथाकथन केले. तसेच शाळेच्या व्यवस्थापकीय संचालक सौ. यशस्विनी भिलारे यांनी महाराजांविषयी विचार प्रकट केले. आपल्या भाषणातून त्यांनी विद्यार्थ्यांना महाराजांविषयी माहिती मिळवण्यासाठी जास्तीत जास्त वाचन करण्यासाठी आव्हान केले. विद्यार्थ्यांना महाराजांच्या चरित्राविषयी, महाराजांच्या कार्याविषयी आणि गड किल्ले यांची माहिती व्हावी म्हणून प्रश्नमंजुष्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी सामूहिक शिवगर्जनेने आसमंत दुमदुमला. कार्यक्रमाचे शेवटी श्री कुणाल भिलारे यांनी मुलांचे कौतुक केले. शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी शाळेच्या प्राचार्या डॉक्टर रेणू पाटील यांनी मार्गदर्शन केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सुषमा पाटील यांनी केले संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन शाळेतील Yellow हाऊस ने केले होते. कार्यक्रम सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचा सहभागने अतिशय सुंदर रित्या पार पडला. शिवजयंती निमित्त शाळेत एक आठवडा आधीच विद्यार्थ्यांना विविध ऍक्टिव्हिटीज देण्यात आल्या होत्या जसे की निबंध लेखन, पोस्टर तयार करणे, शिवगर्जना पाठांतर, शिवमुद्रा लेखन व पाठांतर, शिवरायांची वंशावळ लेखन, शिवरायांचे कथांचे वाचन व वर्गात सादरीकरण अशा अनेक ऍक्टिव्हिटी विद्यार्थ्यांनी आठवडाभरात पूर्ण केल्या. शिवजयंतीसाठी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी सरपंच व विद्यमान सदस्य कासार आंबोली श्री उमेश सुतार उपस्थित होते. तसेच शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री कृष्णा भिलारे, संस्थापक सचिव सौ संगीता भिलारे, व्यवस्थापकीय संचालक श्री कुणाल भिलारे, समाजसेवक गणेशभाऊ भिलारे ,शाळेच्या प्राचार्या डॉ. रेणू पाटील उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय !

  • झी स्टुडिओज' सादर करीत आहेत, आता थांबायचं नाय!'झी स्टुडिओज', 'चॉक अँड चीज' आणि 'फिल्म जॅझ' प्रॉडक्शन यांची एकत्र निर्मिती!

    बृहन्मुंबई महानगरपालिका, आशियामधील सर्वात श्रीमंत समजली जाणारी भारतातील मानाची महानगरपालिका, याच बीएमसीच्या सहकार्याने आणि प्रेरणेने तयार होत आहे, 'झी स्टुडिओज'चा आगामी मराठी चित्रपट, 'आता थांबायचं नाय'! 'झी स्टुडिओज', 'चॉक अँड चीज' आणि 'फिल्म जॅझ' प्रॉडक्शनची एकत्र निर्मिती असलेल्या 'आता थांबायचं नाय' या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे, शिवराज वायचळने. सोबतच लोकप्रिय अभिनेते भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, ओम भुतकर, श्रीकांत यादव, पर्ण पेठे, प्रवीणकुमार डाळिंबकर, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे आणि आशुतोष गोवारीकरअशी तगडी स्टारकास्ट सिनेमात आहे. पहिल्यांदाच हे सर्व दिग्गज कलाकार एकत्र आल्याने या चित्रपटाची कथा काय असणार याचं औत्सुक्य प्रेक्षकांमध्ये नक्कीच असणार आहे. हृदयाला भिडणाऱ्या अद्वितीय प्रेरणादायी कथेच्या दर्जेदार सादरीकरणासाठी तसेच निर्मितीसाठी चित्रपट निर्मिती क्षेत्रातील लोकप्रिय आणि विश्वसनीय 'झी स्टुडिओज' ही संस्था पुढे आली असून त्यांच्यासोबत हिंदी चित्रपट क्षेत्रातील नावाजलेले निर्माते निधी परमार-हिरानंदानी, धरम वालीया ही धुरा उत्तम निभावत आहेत, या निर्मितीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. तसेच “श्रीकांत” फेम तुषार हिरानंदानी हे या सिनेमासाठी क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून काम पाहत आहेत, आज सोमवार १६ डिसेंबर २०२४ रोजी 'आता थांबायचं नाय' या सिनेमाचा मुंबई महानगर पालिका आयुक्त माननीय भूषण गगराणी, किरण दिघावकर महापालिका उपायुक्त, झी स्टुडिओजचे चिफ बिझनेस ऑफिसर उमेश के बन्सल, झी स्टुडिओजचे बिझनेस हेड बवेश जानवेलकर, निर्माते निधी परमार - हिरानंदानी, धरम वालीया, क्रिएटिव्ह प्रोड्युसर तुषार हिरानंदानी, निवृत्त सनदी मनपा अधिकारी उदयकुमार शिरुरकर या खास मान्यवरांसह चित्रपटातील मुख्य कलाकार तंत्रज्ञाच्या उपस्थितीत ग्रांट रोड येथील गिल्डर टँक महापालिकेच्या शाळेत मुहुर्त संपन्न झाल्यानंतर लगेचच चित्रीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. मराठी चित्रपटविश्वात एका कर्तबगार आणि संवेदनशील अधिकाऱ्यासंबंधीची ही सत्यकथा नक्कीच वेगळी ठरेल.   “मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात तेजाचा किरण आणणाऱ्या एका व्यक्तिमत्त्वाचा प्रवास मांडण्याची संधी मिळणं, ही गोष्ट 'झी स्टुडिओज'साठी अत्यंत भाग्याची आहे. मराठीत येणारा एक वेगळा आणि प्रेरणादायी सिनेमा पाहणं, ही एक पर्वणीच ठरणार आहे.” -  उमेश के बन्सल, चिफ बिझनेस ऑफिसर, झी स्टुडिओज   “मुंबई महानगरपालिकेमधल्या कर्तबगार कर्मचाऱ्यांच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा सिनेमा एका सत्यघटनेवर आधारित आहे. मात्र ही घटना अत्यंत प्रेरणादायी असून, मराठीत पहिल्यांदाच अशाप्रकारची मांडणी केली जाणार आहे. मुंबई महापालिकेने या चित्रपटासाठी जे सहकार्य दिलं आहे, त्यासाठी एक मुंबईकर आणि सिनेव्यवसायिक म्हणून आम्ही नक्कीच आभारी आहोत.” - बवेश जानवेलकर, बिझनेस हेड, झी स्टुडिओ   "साधारण शासन असेल किंवा महापालिका असेल नेहमी काय केलं जात नाही या टीकेला आम्हाला दैंनदिन सामोरं जावं लागतं. महापालिकेत म्हणा, शासनात म्हणा अनेक चांगले उपक्रम चालू असतात, चांगले अधिकारी असतात ते चांगली कामे करीत असतात. त्याच्या नोंदी बऱ्याच वेळा घेतल्या जात नाहीत किंवा घेतल्या तर त्यात काही त्रुटी राहतात. म्हणूनच या चित्रपटाच्या माध्यमातून चांगला उपक्रम आपल्यासमोर येतोय. अश्या प्रकारे या कामांची नोंद कायमस्वरूपी घेतली जाईल आणि लोकांपर्यंत पोहचण्यास मदत होईल. म्हणूनच  मला महापालिकेच्या वतीने आनंद व्यक्त करावासा वाटतोय. मी सर्वांचे अभिनंदन करतो." भूषम गगराणी - बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त    “मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी खरंच काय करू शकतात, याची चुणूक दाखवणारी आमच्या गुणी अधिकाऱ्यांच्या कामाची दखल घेणारी कलाकृती तयार होतेय, याचा आनंद आहे.” - किरण दिघावकर - उपायुक्त, मुंबई महापालिका   “प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहताना कायमच नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचबरोबर आमच्या कर्मचाऱ्यांचीही प्रगती व्हावी, असा विचार मनात आला आणि त्यावर अंमलबजावणीही केली. हा प्रवास आता चित्रपटातून मांडला जाणार आहे. अधिकारी म्हणून काम करताना जे आनंदाचे आणि समाधानाचे क्षण असतात त्यातला एक क्षण आता या सिनेमाद्वारे कायमचा आठवणीत राहणार आहे.” - उदयकुमार शिरुरकर, निवृत्त सनदी अधिकारी   “मुंबई महानगरपालिका क्षेत्रात फुललेली अत्यंत प्रेरणादायी कथा, त्यासाठी झी स्टुडिओ, सहकारी आणि मुंबई महानगर पालिका यांचे योगदान असल्यानेच 'आता थांबायचं नाय', शक्य झाले आहे.” -  क्रिएटिव्ह प्रोड्युसर तुषार हिरानंदानी चित्रपट - 'आता थांबायचं नाय' दिग्दर्शक - शिवराज वायचळ निर्माते : झी स्टुडिओज - उमेश के बन्सल आणि बवेश जानवेलकर चॉक अँड चीज प्रॉडक्शन - निधी परमार – हिरानंदानी क्रिएटिव्ह प्रोड्युसर - तुषार हिरानंदानी फिल्म जॅझ - धरम वालीया लेखक - शिवराज वायचळ, ओमकार गोखले आणि अरविंद जगताप  कलाकार - भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, ओम भुतकर, श्रीकांत यादव, पर्ण पेठे, प्रवीणकुमार डाळिंबकर, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे आणि आशुतोष गोवारीकर

  • सामूहिक गायनानंतर ‌‘वंदे मातरम्‌‍‌’चा जयघोष‌‘एक पाऊल देशासाठी-वॉकेथॉन‌’मध्ये दोन हजार पुणेकरांचा सहभाग

    भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा युद्धघोष असणाऱ्या बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित ‌‘वंदे मातरम्‌‍‌’ या तेजस्वी काव्याच्या निर्मितीचे 150व्या वर्षात पदार्पण झाल्याचे निमित्त साधून आज (दि. 11) सुमारे दोन हजार पुणेकरांनी वॉकेथॉनमध्ये सहभागी होत संपूर्ण ‌‘वंदे मातरम्‌‍‌’चे सामूहिकरित्या गायन करून ‌‘वंदे मातरम्‌‍‌’चा जयघोष केला. शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमीच्या सहकार्याने आज सकाळी 7 वाजता ‌‘एक पाऊल देशासाठी-वॉकेथॉन‌’चे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या अध्यक्षा प्रा. डॉ. अनुराधा येडके आणि सचिव राज तांबोळी व संस्थेच्या संपूर्ण टीमने याचे संयोजन केले. वॉकेथॉनच्या आयोजनाबाबत डॉ. येडके यांनी प्रास्ताविकात निरोगी व सदृढ देशाच्या उन्नतीसाठी व्यायामाचे महत्त्व सांगितले व वंदे मातरम्‌‍च्या गीतातून प्रेरणा घेऊन शारीरिकदृष्ट्या देश सक्षम करण्याचे आवाहन केले. म्हात्रे पुलाजवळील शुभारंभ लॉन्स येथे सुमारे दोन हजार पुणेकर एकत्र आले. यात शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग होता. येथे ‌‘वंदे मारतम्‌‍‌’चे सामूहिकरित्या गायन झाले. ‌‘वंदे मातरम्‌‍‌’चे संशोधक-अभ्यासक मिलिंद सबनीस यांची प्रमुख उपस्थिती होती. इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक आनंद हर्डिकर, संगीतकार अजय पराड, युवा गायक देवव्रत भातखंडे, वंदेमातरम्‌‍ सार्ध शती समारोह समितीचे कार्यवाह संजय भंडारे उपस्थित होते. ‌‘वंदे मातरम्‌‍‌’च्या सामूहिक गायनापूर्वी विजय केळकर यांनी शंखनाद केला. ‌‘वंदे मातरम्‌‍‌’ या साहित्यकृतीच्या निर्मितीचा थोडक्यात आढावा सादर करून प्रमुख अतिथी मिलिंद सबनीस म्हणाले, ‌‘वंदे मातरम्‌‍‌’विषयी हृदयात असलेले अतोनात प्रेम नागरिक विविध उपक्रमांद्वारे व्यक्त करीत आहे. येत्या वर्षभरात ‌‘वंदे मातरम्‌‍‌’चा देशपातळीवर जागर होणार आहे.. ‌‘वंदे मारतम्‌‍‌’च्या निर्मितीचे 150वे वर्ष सुरू झाल्याच्या निमित्ताने भारतीय इतिहास संकलक समितीच्या माध्यमातून वंदे मातरम्‌‍ सार्ध शती जयंती समारोह समितीतर्फे राष्ट्रीय पातळीवर विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमीच्या सहकार्याने वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. शुभारंभ लॉन्स ते राजाराम पूल आणि परत शुभारंभ लॉन्स असा वॉकेथॉनचा मार्ग होता. ‌‘वंदे मातरम्‌‍‌’, ‌‘भारत माता की जय‌’, ‌‘छत्रपती शिवाजी महाराज की जय‌’ अशा जोशपूर्ण घोषणा देत नागरिकांनी मार्गक्रमण केले. लिना पुरोहित यांनी सूत्रसंचालन केले तर राज तांबोळी यांनी आभार मानले.

  • माझ्या मातीतला चित्रपट मातृभाषेतच करायचा होता, 'घात'ने ही संधी दिली!- लेखक - दिग्दर्शक छत्रपाल निनावे

    भारतीय चित्रपटांचे जनक असलेल्या दादासाहेब फाळके यांनी आपल्या मातीत पहिला चित्रपट तयार करून येथे चित्रपट निर्मितीची मुहूर्तमेढ रोवली, डॉ. व्ही शांताराम यांनी त्यावर कळस चढवला आणि त्यानंतर एकापेक्षा एक धुरंधरांनी चित्रपटसृष्टीचा पाया मजबूत करण्याचे अफाट कार्य सुरु ठेवले आहे. याच शृंखलेत नवं काहीतरी करण्याच्या उमेदीने दिग्दर्शक छत्रपाल निनावे नव्या पिढीचे नेतृत्व करीत आहेत. अगदी गडचिरोलीच्या खोल जंगलात अख्या चित्रपटाचं युनिट घेऊन जात त्यांनी शिलादित्य बोरा यांची ''प्लॅटून वन', मनीष मुंद्रा यांची 'दृश्यम फिल्म्स' आणि मिलापसिंह जडेजा, संयुक्ता गुप्ता आणि कुणाल कुमार यांनी मिळून सिनेमाची निर्मिती केलेल्या 'घात' हा चित्रपट नुसता दिग्दर्शितच केला नाही तर अनंत अडचणींवर मात करीत थेट जगात अतिशय प्रतिष्टीत असलेल्या बर्लिनल आंतरराष्ट्रीय महोत्सवात स्थान मिळविणारा जगातील एकमेव चित्रपट होण्याचा रेकॉर्ड तयार केला आहे. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवून आता 'घात' महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीला २७ सप्टेंबरला येत आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी केलेला हा संवाद घातचं कथानक कसं सुचलं ? मी पहिले मुंबईला होतो. एक फिल्म केली पण ती वर्कआऊट झाली नाही. त्यानंतर मी इंडस्ट्रीत सिनेमेटोग्राफर, एडिटर, पोस्ट प्रोडक्शन अशा पद्धतीची कामं केली. मग म्हटलं एक स्वत: एक फिल्म करूया पण ते होऊ शकलं नाही. तेव्हा ठरवलं की फिल्ममेकिंगला टाटा बाय बाय करणार, शेवटची शॉर्ट फिल्म करणार. ती करण्यासाठी नागपूरला गेलो.… आम्ही चार पाच मित्र मिळून तेथील जंगलात जाऊन आम्ही एक शॉर्टफिल्म शूट केली. त्या शॉर्ट फिल्मने मला होप्स दिले ती शॉर्टफिल्म 'घात' याच नावाने केली होती. ती माझ्या ‘घात’ सिनेमातील पहिला चॅप्टर, फाल्गुनची कथा आहे. ती आम्ही शूट केली तेव्हा एंडच्या वेळी दोन कॅरेक्टर्स सडनली येत होते. ते जितेंद्र आणि मिलिंदचे कॅरेक्टर्स आहेत. या व्यक्तिरेखांना स्वतःची गोष्ट हवी आहे हे शॉर्टफिल्म केल्यावर जाणवलं. म्हणून याचा एक पिच व्हिडीओ तयार केला. पुन्हा निर्माते शोधण्यासाठी चक्रा मारल्या. आधी बरेच निर्माते तयार होत नव्हते पण 'दृश्यम फिल्म्स'ला शेवटी तो व्हिडीओ आवडला.- पसंत पडला. त्या दुर्गम भागातल्या शूटिंगचे किस्से सांगा ना… ! आम्ही वर्कशॉपला गेलो होतो. ते गाव खरोखरच नक्षल भागात होत. तिथे पोलिसही जात नाहीत. आम्ही धाडस करून तिथे पोहचलो. सुरुची, माझी असिस्टंट किमया, कॉश्च्युम डिझायनर उत्पला, मी आणि माझा सहाय्यक दिग्दर्शक प्रशांत असे आम्ही जंगलातून चालत तिकडे गेलो. जाताना आम्हाला जळलेल्या गाड्या दिसल्या, रेड बॅनर्स दिसले. तिथल्या पोलीस चौक्या दिसल्या त्या खूप वेगळ्या किल्यासारख्या आहेत. त्यांच्यावर कधीही हल्ला होऊ शकतो. पुढचा रस्ता खूप खराब होता, जीपही जाऊ शकत नव्हत्या. ड्राइव्हर म्हणाले आम्ही इथेच थांबतो, त्यामुळे आम्ही पायी निघालो. तिथली झाडी खूप दाट असल्याने भयानक रस्ता होता, सहा फूटाच्यावर सुद्धा काही दिसत नाही. वाघ - नक्षली कोणीही आले तरी दिसणार नाही अश्या रस्त्यातून आम्ही त्या गावात पोहचलो. गावात पोहचल्यावर एकदम युनिक अनुभव आला, गाव जिथं इलेक्ट्रिसिटी नाही. अश्या आदिवासी गावात आम्ही पोहचलो, त्यांचं आदरतिथ्य कमालीचं होतं. मोठ्या मनाची माणसे आहेत सगळी. आम्ही परत जायला निघालो तेव्हा समजलं कि आमचे दोन्ही जिपचे ड्रॉयव्हर्स जंगलातल्या भीतीने गावात पोहचले होते. हा अनुभव खूप थरारक होता, तिथून आम्ही टिपागडावर गेलो तो भाग पहाडी होता. पहाडावर एक सुंदर तलाव परिसर आहे. तिथे गोंड राजाचा किल्ला आहे. तिथून भोवतालच्या परिसरावर नजर ठेवली जाते. आमच्यासोबत असलेला कुत्रा येताना अचानकपणे विचित्र वागू लागला. मला जंगली प्राण्याबद्दल माहिती असल्याने मी सगळ्यांना एकत्र राहण्याच्या सूचना केल्या.. आम्ही खाली उतरत असताना आमचा पाठलाग लेपर्ड करत असल्याचे दिसले. असे अनेक थरारक अनुभव आम्ही घेतले होते. आमचा साऊंड डिझायनर जंगलात साउंड रेकॉर्ड करीत असताना त्याला वास आला म्हणून तो गाडीत बसला, आणि त्याच्यासमोर वाघ होता. तसेच जितेंद्रला स्पॉट बॉयने अर्धे खाल्लेले हरीण दाखविले होते असे अनेक प्रसंग आम्ही पहिले आहेत. ‘घात’ची भाषा टिपिकल मराठी वाटत नाही यामागे विशेष काही कारण आहे का ? हो! हा सिनेमा महाराष्ट्राच्या सीमा भागातला असल्याने, मराठीची ही पोटभाषा झाडीबोलीतला आहे.. तिचा लहेजा वेगळा आहे, हा भाग महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या बॉर्डरचा असल्याने या बोलीत हिंदी मिश्रित संवाद बोलले जातात. ही गोष्ट झाडीपट्टीतल्या माणसांची आहे, त्यांच्या जगण्याची आहे. त्यामुळे ही गोष्ट त्यांच्या बोलीभाषेतून मांडली आहे. बोलीभाषेसोबतच नक्षलवाद हा दुर्दैवाने तिथलं वास्तव आहे. त्यामुळे गोष्टीत ते टाळताच येणार नव्हतं. मग ते गोष्टीत आले आणि त्यांच्यासोबत सगळा संघर्षही. तुम्ही स्वत: कधी नक्षलवाद्यांना भेटलात का? नाही. प्रत्यक्ष भेटलो नाही, मी लहान असताना एकदा इटिहा डोहाच्या परिसरात गेलेलो. तिथे नक्षलवादी आले होते. त्यांनी काही त्रास दिला नाही पण ते आल्यानंतर तिथलं वातावरण एकदम तणावपूर्ण झालं होतं. त्यामुळे नक्षलवादी, गावं, त्यातला ताण हे सगळं मी अनुभवलं आहे. माझा असिस्टंट प्रशांत, फाल्गुनच्या भूमिकेतला धनंजय मांडवकर यांनी पाहिले आहेत. शिवाय गावकऱ्यांशी बोलताना अनेकदा कळत नकळत त्याचे संदर्भ आलेच होते. त्यामुळेच कुठेतरी हा सिनेमा अधिक खरा झाला. त्यामुळेच एका इंग्रजी वृत्तपत्रात सिनेमाबद्दल जेव्हा लिहीलं गेलं तेव्हा, यातले नक्षलवादी फिल्मी वाटत नसून खरेखुरे वाटतात, असा विशेष उल्लेख झाला. सिनेमातली पात्र कशी सापडली? विशेषत: पेरकुसारखी सुरुचीने अतिशय सुंदर ऑडिशन दिली त्यामुळे तिची निवड करणं भागच होतं मला. तिचा गोरा रंग, शहरी दिसणं या सगळ्याला विसरुन जावं, अशी कामगिरी सुरुचीने केली आहे. पेरकुची निवड म्हणजे एक धमालच होती. खूप ऑडिशन झाल्या पण पेरकु सापडेना. शेवटी गंमत अशी झाली की जनार्दन कदम आले ऑडिशनसाठी. त्यांनी ती ऑडिशन चांगली दिली. आम्ही निवड करणारच होतो. पण त्याआधी कदम म्हणाले, ते अनुसूचित जातीतील असल्याने त्यांना फिल्मच मिळत नाही. मी त्यांना म्हणालो, पाहा मला तुमची जात नको तुमचा अभिनय हवाय. तो उत्तम दिलात की, रोल तुमचाच. कदमांनी सुंदर ऑडिशन दिली आणि पेरकु पटकावला. या विषयावर विचार करताना लक्षात आलं की, अरे अशा मातीतल्या माणसांच्या भूमिका लिहील्याच गेलेल्या नाहीत. ज्या दिसतात. त्या शहरी, मध्यमवर्गीय नाहीतर एका साच्यातले गावकरी. मग या मातीतल्या माणसांची गोष्ट, जंगलाची गोष्ट जगापुढे आणायची तर आपल्याला सिनेमा करावाच लागणार बॉस. वर्क इन प्रोग्रेस लॅबचा किती फायदा झाला खूप फायदा झाला. कारण आम्ही आमच्या दृष्टीकोनातून सिनेमा पाहत होतो, तयार करत होतो. वर्क इन प्रोग्रेस लॅबमध्ये इतर अनेक तज्ज्ञांचे दृष्टीकोन मिळाले. फिल्म पुढे नेण्यासाठी काय करायचं, याचा खूप उपयोग झाला. ऑलिव्हिया स्टीवार्ट, फिलिपा कॅम्पेल .??...... यांच्यासारखे तज्ज्ञ लोकं होते. त्यांच्यामुळे एक नवी दृष्टी मिळाली. बर्लिन फिल्म फेस्टिव्हलने तुम्हाला दोन वेळा बोलावणं पाठवलं होतं ना?त्याविषयी सांगा ना? बर्लिनला आम्हाला फिल्म पाठवायची होतीच. मात्र ते त्यावेळी झालं नव्हतं. मीनाक्षी शेडे ज्या बर्लिन फिल्म फेस्टिव्हलच्या साऊथ एशिया कन्सल्टंट आहेत. त्यांचा मला एक दिवस फोन आला. त्या म्हणाल्या, छत्रपाल तुझी फिल्म बर्लिन फिल्म फेस्टिव्हलच्या वेबसीरिज विभागाच्या प्रमुख ज्युलिया फिडेल यांनी पाहिली. त्यांना ती अतिशय आवडली. फिल्ममध्ये तीन चॅप्टर आहेत तर ती वेबसीरिज म्हणून देशील का असं त्या विचारतायत. मी विचारात पडलो. म्हटलं मला बर्लिनला जायचं आहे, पण ही फिल्मच राहणार कारण पहिल्यापासून मी तिचा विचार फिल्म म्हणूनच केलाय. मीनाक्षी मला म्हणाल्या, बघ अरे विचार कर. पण मी ठाम होतो. मग मीनाक्षींनी ज्युलियांना फोन करून सांगितलं. ज्युलिया यांनी तेव्हाचे फिल्म निवड समितीचे प्रमुख कार्लो चॅट्रीयन यांना सांगितलं. मग पुढे मायकेल स्तत्झ (Micheal stutz) हे तेव्हा पॅनोरमाचे हेड होते. त्यांनी फिल्म पाहिली आणि निमंत्रण पाठवलं. ते साल होतं २०२१. तेव्हा आम्हाला काही कारणाने जमलं नाही पण २०२३ मध्ये पुन्हा संधी मिळाली आणि आम्ही बर्लिनला पोहोचलो. अशाप्रकारे एकाच सिनेमाला दोनदा निमंत्रण मिळण्याचा प्रसंग पहिल्यांदाच बर्लिन फिल्म फेस्टिव्हलला घडला होता. जर बर्लिन फिल्म फेस्टिवल नसता तर ही फिल्म बाहेर आली नसती, अटकली असती, जगभरात पोहचली नसती. मी त्यांचा कायम ऋणी राहील

  • 'चतुरंग'चा सुवर्णमहोत्सवी आनंदसोहळा!

    प्रतिवर्षी डिसेंबर महिन्यात आपल्या जीवनगौरव पुरस्कारासाठी होणाऱ्या 'रंगसंमेलना' व्यतिरिक्त यावर्षी 'चतुरंग प्रतिष्ठान'ने आपल्या पन्नाशीच्या पूर्तते निमित्ताने मुंबईमध्ये याच सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस दोन दिवसांच्या सुवर्णमहोत्सवी आनंद सोहळ्याचे आयोजन केले आहे. १४ विद्या ६४ कलांसारख्या बहुविध क्षेत्रातील प्रतिनिधिक अशा ११ नामवंत गुणवंतांचा 'चतुरंग सुवर्णरत्न सन्माना'ने जाहीर सन्मान करताना, त्यांच्या गौरवाप्रित्यर्थ नृत्य.. नाट्य.. साहित्य.. संवाद.. गायन-वादन.. अशा कलाविष्कारांचे विशेष आयोजन केले आहे. यामध्ये नृत्यांगना शर्वरी जमेनीस यांची 'अर्घ्य' ही नृत्यवंदना आहे.. टेलिव्हिजन मालिकाविश्वात खूप लोकप्रिय झालेल्या 'हास्यजत्रा' या मालिकेतील सचिन गोस्वामी, सचिन मोटे, पृथ्विक प्रताप, रोहित माने, शिवाली परब या हास्यजत्रावीरांची, सुधीर गाडगीळांचा वारसा चालवणारे 'मित्र म्हणे' फेम सौमित्र पोटे हे 'मुलाखत' घेणार आहेत.. कविवर्य कुसुमाग्रज आणि नाटककार शिरवाडकर हे जर समोरासमोर आले-भेटले तर त्यांच्यात होऊ शकणाऱ्या संवाद-गप्पांचा सौ. धनश्री लेले लिखित 'हा सूर्य... हाच चंद्र!' हा कुतूहलजन्य नाट्यप्रयोग, दिग्पाल लांजेकर यांच्या दिग्दर्शनाखाली अजय पूरकर आणि दीपक करंजीकर सादर करणार आहेत.. गानप्रिय रसिकश्रोत्यांमध्ये सर्वसाधारणपणे खूप लोकप्रिय असलेल्या सर्व प्रकारच्या गाण्यांची 'ओठांवरची आवडती गाणी' ही संगीत मैफल, सध्याचे आघाडीचे रसिकपसंत युवा गायक प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, शमिका भिडे हे सादर करणार आहेत..   चतुरंग संस्थेच्या पायाभरणीकारांना कृतज्ञ वंदन करण्याच्या समारंभात आणि लक्षवेधी, उत्तुंग कारकीर्दीच्या पं. हरिप्रसाद चौरसिया, पं. उल्हास कशाळकर, श्री. अशोक पत्की, श्री. दिलीप प्रभावळकर, श्री. बाबासाहेब कल्याणी, मेजर महेशकुमार भुरे, डॉ.अनिल काकोडकर, श्री.महेश एलकुंचवार, श्री.वासुदेव कामत, श्रीमती रोहिणी हट्टंगडी, आणि श्री.चंदू बोर्डे या नामवंत, गुणवंत मान्यवरांचा 'चतुरंग सुवर्णरत्न सन्माना' ने गौरव होणाऱ्या खास समारंभात विशेष सहभागी म्हणून ॲड. उज्वल निकम, अविनाश धर्माधिकारी, देवकी पंडित, धनश्री लेले, विजय केंकरे, सुहास बहुळकर, श्रुती भावे-चितळे, स्वानंद बेदरकर, आदित्य शिंदे, समीरा गुजर आदी नामवंतांचा समावेश असणार आहे....   इतक्या बहुविध समाविष्टतेचा आणि चतुरंग पन्नाशीचा भव्योत्सवी सुवर्णानंद सोहळा शनिवार-रविवार दिनांक २८-२९ सप्टेंबर २०२४ या दोन्ही दिवशी दुपारी ४-०० ते रात्रौ १०-०० या वेळेत दादर-माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरामध्ये चतुरंगने आयोजित केलेला आहे. एवढ्या मोठ्या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठानने अतिशय अत्यल्प दराच्या प्रवेशिका ठेवल्या असून, निमंत्रितासाठी ठेवलेल्या राखीव जागांव्यतिरिक्तच्या प्रवेशिका शनिवार दि.२१ सप्टेंबर पासून  ticketkhidakee.com  वर on line booking पद्धतीने आणि थिएटरवर सकाळ-संध्याकाळ उपलब्ध होतील असे चतुरंगने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

  • आदि शंकराचार्यकृत गणेश पंचरत्न!लोकप्रिय पार्श्वगायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांची नवी भक्तीमय स्वरभेट

    अवघ्या चार दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाचे औचित्य साधून आदि शंकराचार्य रचित ‘गणेश पंचरत्न’ या गणपतीच्या श्लोक काव्याची स्वरभेट लोकप्रिय ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी  कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मुंबईतील श्री सिध्दीविनायक मंदिरात मंगळवारी सकाळी श्रींच्या चरणी अर्पण केली. श्री सिध्दीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदानंद सरवणकर, अनुराधा पौडवाल यांच्या कन्या कविता पौडवाल, या ध्वनिचित्रफितीचे निर्माते लंडनस्थित व्यावसायिक दिलीप आपटे यावेळी उपस्थित होते. अत्यंत मांगल्यपूर्ण वातावरणात या पारंपारिक, सुश्राव्य आणि वैशिष्ट्यपूर्ण भक्ती रचनेच्या ध्वनिचित्रफितीचे लोकार्पण सिध्दीविनायकाच्या साक्षीने झाले.   गणेश पंचरत्न हे श्री गणेशाची स्तुती करणारे एक उत्तम श्लोक काव्य आहे. काही महिन्यांपूर्वी  सुप्रसिध्द गायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी आदि शंकराचार्य रचीत विघ्नहर्त्याचे हे पंचरत्न स्तुती काव्य लंडन येथील हाऊस ऑफ कॉमनमध्ये गायले. ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून ते सर्वसामान्य भाविकांना आता ऐकता येणार आहे. यंदाच्या गणेशोत्सवात संगीत रसिक आणि श्री गणेश भक्तांना अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात पंचरत्न श्लोक काव्य  ऐकण्याचा भाग्य योग लाभणार आहे.   मंगळवारी श्री सिध्दीविनायक मंदिराच्या प्रांगणात ‘गणेश पंचरत्न’ श्लोककाव्य प्रसारित करण्यात आले. त्यामुळे तेथील प्रसन्न आणि मंगलमय वातावरणात भर पडली. मंदिरात दर्शनासाठी येणारे हजारो भाविक तल्लीनतेने हे श्लोककाव्य ऐकत होते.

  • हेरिटेज इंटरनॅशनल स्कूल मध्ये आषाढी एकादशी उत्सव सोहळा पार पाडला

    देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई, सुखालाही आला या हो आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर, अवघे गरजे पंढरपूर, मुळशी येथील कासार आंबोली गावातील हेरिटेज इंटरनॅशनल स्कूल मध्ये दिनांक १६जुलै २०२४ रोजी आषाढी एकादशी उत्सव सोहळा साजरा करण्यात आला. आषाढी निमित्त फुलाद्वारे सजवलेल्या सुशोभित पालखीचे मा. मुख्याध्यापिका डॉ.रेणू पाटील यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून पालखी पूजन केले. सर्व विद्यार्थ्यांसोबत पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले. विठ्ठल नामाचा जयघोष करत शाळेची दिंडी गावातील पद्मावती मंदिर ते विठ्ठल मंदिर पर्यंत फेरी पूर्ण करून पुन्हा आनंदाने शाळेत परतली.सर्व विद्यार्थ्यांनी रंगबेरंगी पारंपारिक पोशाख परिधान केले होते. कार्यक्रमाची सुरुवात लेझीम व नृत्यातून करण्यात आली. यावेळी शाळेचे व्यवस्थापन सदस्य श्री. कृष्णा भिलारे ,सौ संगीता भिलारे, श्री कुणाल भिलारे, सौ यशस्वी रसाळ भिलारे व समिधा भिलारे हे उपस्थित होते. मुख्याध्यापिका यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. जसे की संताची जवळून ओळख व्हावी यासाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा, कीर्तन, भारुड, श्लोक, अभंग, नाट्य स्पर्धा आणि चिमुकल्यांसाठी तुळस व पालखी सजावट अश्या विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. वातावरण आनंदाने व अध्यात्माने भरलेले होते या उत्सवाने विद्यार्थ्यांना आपल्या महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि त्यांचा वारसा अधिक जाणून घेण्यासाठी प्रोत्साहित केले.

  • मुळशीतील प्रहारी गटाचा उपक्रमात हेरिटेज इंटरनॅशनल स्कूल कासार आंबोली ही शाळा अग्रेसर.

    दिनांक 12/6/2024 च्या शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार हेरिटेज इंटरनॅशनल स्कूल मध्ये प्रहारी गटाची स्थापना करण्यात आली आहे. बालकांमध्ये ड्रग्स आणि मादक पदार्थांचा प्रसार आणि अवैध तस्करी प्रतिबंध या विषयावर कृती आराखडा अंमलबजावणीबाबत हेरिटेज प्रभारी गट सदस्य व हेरिटेज रोटरी इंटरॅक्ट क्लब सदस्यांनी अंमली पदार्थ विरोधी जागरूकता कार्यक्रमावर एक चर्चासत्र आयोजित केले होते. सुरुवात इयत्ता 6 वी ते इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती सत्राने झाली. प्रहारी गटप्रमुख व इतर सदस्य विद्यार्थी यांनी अंमली पदार्थ विरोधी समितिच्या कृती आराखड्याप्रमाणे ते कार्य कसे करतात याची माहिती दिली आणि अंमली पदार्थ आणि इतर मादक पदार्थांच्या घातक परिणामांबद्दल जागरूकता पसरवण्याची धुरा या चर्चासत्राद्वारे व विद्यार्थ्यांना व्हिडिओ दाखवून त्यांना अंमली पदार्थ कसे दूर राहता येईल याबद्दल माहिती दिली. स्वतःला अंमली पदार्थांपासून किंवा इतरांच्या प्रभावाखाली न जाता विद्यार्थ्यांनी स्वतःवर काम करून व्यक्तिमत्वविकास व इतर कलागुणांच्या क्षमतांचा विकास करण्याचा सल्लाही या प्रहारी गटाने दिला. हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या डॉ.रेणू पाटील यांनी विद्यार्थ्यांना समवयस्कांची निवड हुशारीने करण्याचे मार्गदर्शन केले. त्यांना विषारी लोकांच्या प्रभावाखाली न जाण्याचा विद्यार्थ्यांना सल्ला दिला. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना असा सल्ला दिला पाहिजे की जेव्हा एखादा पर्याय दिला जातो तेव्हा ड्रग्सपेक्षा जीवन निवडा आणि आघातातून जीवन वाचवा. प्रहरी गटाचे कार्य पाहणाऱ्या शिक्षक प्रतिनिधी सौ हिमाली व सौ सीमा यांनी विद्यार्थ्यांना असा सल्ला दिला की, "व्यसन हा शब्दच वाईट वाटतो. तो तुमच्यासाठी नाही, म्हणून नेहमी योग्य निवड करा." शाळेतील स्कूल काउन्सलर आदिती यांनी देखील दारू, सिगारेट किंवा ड्रग्ज यांसारख्या मादक द्रव्यांचे सेवन केल्याने होणारे वाईट परिणाम व्हिडिओद्वारे व संभाषणातून स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी अँटी नार्कोटिक्स एनजीओ ऑफ इंडियाने प्रकाशित केलेला व्हिडिओ देखील दाखवण्यात आल्या तसेच अनिल अवचट सरांचे TedX tallk व मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र याबद्दलही मुलांना माहिती देण्यात आली. ज्यामुळे त्यांना ड्रग्सचे तोटे समजण्यास खूप मदत झाली. आजच्या या अनुभवाने सर्व विद्यार्थ्यांवर एक वैचारिक छाप सोडली असे प्राचार्या म्हणाल्या. शालेय व्यवस्थापन सदस्य श्री. कृष्णा भिलारे (संस्थापक, अध्यक्ष), सौ. संगीता भिलारे (सचिव), श्री. कुणाल भिलारे (संचालक), सौ. यशश्विनी भिलारे यांनी विद्यार्थ्यांनी प्रहारी गटाद्वारे केलेले प्रबोधनपर कार्याबद्दल कौतुक केले व यापुढे विद्यार्थ्यांनी स्वतःहून केलेल्या उपक्रमाबद्दल व आपल्या साथीदारांना चांगल्या सवयी लागाव्यात व चुकीच्या दिशेने न जावे हा संदेश असाच पुढे देत राहावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

  • हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलमध्ये डॉक्टर्स डे सेलिब्रेशन

    हेरिटेज इंटरनॅशनल स्कूल, कासार आंबोली, मुळशी पुणे येथे राष्ट्रीय डॉक्टर्स दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. WWClinics आणि DIMBHA (डायबेटिस मुक्त भारत अभियान) च्या डॉ. मोनिका मोरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांशी या दिवसाच्या प्रासंगिकतेवर व सद्या विद्यार्थ्यांमध्ये दिसत असलेले मधुमेह व स्थूलपणा या विषयावर संवाद साधला. त्यानंतर WWClinics मधील आहारतज्ञ दिशा गांधी मॅडम यांच्यासोबत माहितीपूर्ण सत्र झाले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निरोगी जीवनशैली अंगी बाणवून आरोग्याची काळजी घेण्याबाबत जागरूकता निर्माण झाली आणि आरोग्यदायी, ताजे घरगुती अन्न खा असा सल्ला विद्यार्थ्यांना देण्यात आला. मुख्य विपणन अधिकारी भूषण यंदे सर यांच्या समृद्ध सत्रात त्यांचे अनुभव सांगितले, मानसिक आणि शारीरिक आरोग्याबद्दल आणि या काळात सकारात्मक कसे राहायचे याबद्दल बोलले. विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रश्न विचारले, डॉक्टरांशी संवाद साधला आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही दिली. विद्यार्थ्यांसाठी हा एक अद्भुत अनुभव होता. डॉक्टर हेच खरे योद्धे असल्याचे सिद्ध झाले आहे, ज्यांनी जगातील साथीच्या आजारात स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांना वाचवले. कृतज्ञता आणि कृतज्ञतेच्या भावनेने साजरा करण्यात आलेला हा खरोखरच एक अद्भुत दिवस होता असे शाळेच्या प्राचार्य डॉक्टर रेणू पाटील यांनी व्यक्त केले. व्यवस्थापन सदस्य श्री. कृष्णा भिलारे (संस्थापक, अध्यक्ष), सौ. संगीता भिलारे (सचिव), श्री. कुणाल भिलारे (संचालक), सौ. यशश्विनी भिलारे यांनी डॉक्टरांशी संवाद साधत त्यांना त्यांच्या कार्याबद्दल शुभेच्छा देत आभार मानले.

  • रोमँटिक हिट्स ऑफ रफी-किशोर संगीत संध्ये चे आयोजन

    पुणे - स्वरोमा म्युझिकल इव्हेंट्स आणि केशव मगर असोसिएट्स प्रस्तुत जुन्या सुमधुर हिंदी गीतांचा कार्यक्रम ‘रोमँटिक हिट्स ऑफ रफी-किशोर’ येत्या १२ जुलै रोजी सायं. ७ वा. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आला असून यामध्ये मोहम्मद रफी, किशोर कुमार यांनी अजरामर केलेल्या सदाबहार आणि अविस्मरणीय गीतांचा नजराणा सादर केला जाणार आहे. हा कार्यक्रम पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विनामूल्य असणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत आयोजिका अनुपमा कुलकर्णी यांनी दिली. या वेळी कार्यक्रमाच्या संयोजिका करुणा पाटील, गायक जितेंद्र भुरुक, रफी हबीब, राजेश्वरी पवार आणि डॉ. रोहिणी काळे उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक जितेंद्र भुरूक आणि रफी हबीब एकल गीते तसेच युगल गीते सादर करणार आहेत त्यांना गायिका अनुपमा कुलकर्णी, राजेश्वरी पवार आणि डॉ. रोहिणी काळे साथ देणार आहेत. गायकांना, कीबोर्डवर आसिफ खान, ट्रम्पेट आणि सॅक्सोफोनवर बाबा खान, कीबोर्डवर सईद खान, गिटारवर हार्दिक रावल, बासरीवर सचिन वाघमारे, रिदम मशिनवर आसिफ इनामदार, ड्रम्स वर स्वयम सोनावणे, तुंबा वर सोमनाथ फाटके ढोलक वर रोहित साने हे कलाकार साथसंगत करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्र संचालन आकाश सोळंकी करणार आहेत. या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक संघातील सभासदांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

9561398225

  • Facebook
  • Instagram

©2021 by Stay Featured. Proudly Created by Buzzer Media & Advertising

bottom of page