top of page

पुना कॉलेज मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस मोठ्या उत्साहात साजरा

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व पुना कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स , यांच्या संयुक्त विद्यमाने त्यामधील पुना कॉलेज येथे राष्ट्रीय क्रीडा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो.





विश्वविद्यालय अनुदान आयोग शिक्षा मंत्रालय भारत सरकार यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त 21 ते 29 ऑगस्ट या कालावधीमध्ये विविध प्रकारचे उपक्रम घेण्याबाबत सुचित करण्यात आले होते त्यानुसार राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुना कॉलेज मध्ये विविध उपक्रम व क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.


राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त महाविद्यालयात विविध स्पर्धा व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कॅरम, बास्केटबॉल ,बुद्धिबळ, आर्मरेसलिंग, टेबल टेनिस, हॉलीबॉल ,बॅडमिंटन तसेच महिला महिलांसाठी मनोरंजनात्मक खेळाचे आयोजन करण्यात आले होते या खेळामध्ये खेळाडू ,महिला ,पुरुष ,विद्यार्थी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. क्रीडा दिनानिमित्त सर्व खेळाडूं, शिक्षकांना आणि सहभागी स्पर्धकांनी फिट इंडियाची प्रतिज्ञा घेतली . या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आफताब अन्वर शेख, उपप्राचार्य डॉ.इकबाल शेख, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य इम्तियाज आगा, सुपरवायझर नसीम खान ,जिमखाना विभागाचे व्हाईस चेअरमन मुशरब हुसेन ,क्रीडा विभागाचे प्रमुख डॉ अय्याज शेख ,एन. एस. एस. कार्यक्रम आधिकारी शेख आशद, क्रीडा शिक्षक इम्रान पठाण डॉ.गुलाब पठाण , जुबेर पटेल ,डॉ .सलीम मणियार , डॉ .फाजील शेख, इमरान मिर्झा , डॉ.शाकीर शेख डॉ बाबा शेख, फारुख शेख मोसिन शेख हुस्नुद्दीन शेख ,उपस्थित होते.





राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रीडा क्षेत्रात उल्लेखनी काम करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला . खेलो इंडिया विद्यापीठ स्तरावरील वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुणे विद्यापीठाला रौप्य पदक मिळवून देणाऱ्या धैर्यशील साळुंखे व एशियन आर्चरी कप मध्ये भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणाऱ्या पुना कॉलेजचा खेळाडू प्रथमेश फुगे याचा सत्कार करण्यात आला.



राष्ट्रीय सेवा योजना (स्तर+2) च्या विद्यार्थ्यांनी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी व या कार्यक्रमाला यशस्वी करण्यात मोलाचा हातभार लावला.

bottom of page