top of page

हेरिटेज इंटरनॅशनल शाळेत हिंदी सप्ताह साजरा


"सारे देश की आशा है,

हिंदी हमारी भाषा है ,

जात-पात के बंधन को तोडे,

हिंदी हमारे देश को जोडे।"





हेरिटेज इंटरनॅशनल शाळेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिंदी सप्ताह विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. 14 ते 21 सप्टेंबर या कालावधीत शाळेत हिंदी भाषेचे महत्त्व सांगणारे विविध उपक्रम राबविण्यात आले. 14 तारखेला परिपाठात हिंदी भाषेचे महत्व, हिंदी कविता, कहानी व हिंदी दिनाच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रम साजरा करण्यात आला. 14 ते 21 सप्टेंबर या आठवड्याभरात शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कविता आणि कहानी स्पर्धा, गिनती स्पर्धा, मुहावरे स्पर्धा, सुविचार लेखन स्पर्धा, कहावतेंची स्पर्धा, गद्यांश लेखनाची स्पर्धा अशा विविध स्पर्धांमार्फत हिंदी भाषेचा सखोल अभ्यास करणे आणि संवर्धन करणे या गोष्टीची विद्यार्थ्यांमध्ये जागृतीकरण करण्यात आली. 21 तारखेला हिंदी सप्ताह समाप्ती समारोह साजरा करण्यात आला ज्यात विविध गुण दर्शनाचा कार्यक्रम झाला. हिंदीचे महत्व व सन्मान या विचारांना प्रकट करणारे भाषण, प्रेरणादायी कहानी, समूहगीत, परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांची मनोदशा दाखविणारे नृत्य, चंद्रयानच्या यशाची कविता, मानवी भावना प्रदर्शित करणारी नाटिका, कबीर व रहीम चे दोहे प्रदर्शित करणारे नृत्य, कहावते, हिंदी नाटिका 'धरती का दिल क्या बोले' ज्यात वाढत्या प्रदूषणाविषयी व फास्ट फूड विषयी जागृतीकरण करण्यात आले. या कार्यक्रमात हिंदीच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला.





माननीय शाळा व्यवस्थापन सदस्य श्री कृष्णा भिलारे (संस्थापक अध्यक्ष), सौ. संगीता भिलारे (सचिन) श्री कुणाल भिलारे (संचालक), सौ यशस्विनी रसाळ- भिलारे (प्रशासकिय व्यवस्थापक) यांनी हिंदी सप्ताहाच्या शुभेच्छा दिल्या.







शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. रेणू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे व स्पर्धांचे आयोजन शाळेतील हिंदी शिक्षिका सुषमा पाटील, रितू महिरे, प्रज्ञा वाळके, स्वाती नागरे आणि शितल बागूल यांनी केले.

bottom of page