top of page

Search Results

81 results found with an empty search

  • रोमँटिक हिट्स ऑफ रफी-किशोर संगीत संध्ये चे आयोजन

    पुणे - स्वरोमा म्युझिकल इव्हेंट्स आणि केशव मगर असोसिएट्स प्रस्तुत जुन्या सुमधुर हिंदी गीतांचा कार्यक्रम ‘रोमँटिक हिट्स ऑफ रफी-किशोर’ येत्या १२ जुलै रोजी सायं. ७ वा. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आला असून यामध्ये मोहम्मद रफी, किशोर कुमार यांनी अजरामर केलेल्या सदाबहार आणि अविस्मरणीय गीतांचा नजराणा सादर केला जाणार आहे. हा कार्यक्रम पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विनामूल्य असणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत आयोजिका अनुपमा कुलकर्णी यांनी दिली. या वेळी कार्यक्रमाच्या संयोजिका करुणा पाटील, गायक जितेंद्र भुरुक, रफी हबीब, राजेश्वरी पवार आणि डॉ. रोहिणी काळे उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक जितेंद्र भुरूक आणि रफी हबीब एकल गीते तसेच युगल गीते सादर करणार आहेत त्यांना गायिका अनुपमा कुलकर्णी, राजेश्वरी पवार आणि डॉ. रोहिणी काळे साथ देणार आहेत. गायकांना, कीबोर्डवर आसिफ खान, ट्रम्पेट आणि सॅक्सोफोनवर बाबा खान, कीबोर्डवर सईद खान, गिटारवर हार्दिक रावल, बासरीवर सचिन वाघमारे, रिदम मशिनवर आसिफ इनामदार, ड्रम्स वर स्वयम सोनावणे, तुंबा वर सोमनाथ फाटके ढोलक वर रोहित साने हे कलाकार साथसंगत करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्र संचालन आकाश सोळंकी करणार आहेत. या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक संघातील सभासदांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

  • हेरिटेज इंटरनॅशनल स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन व जागतिक संगीत दिन उत्साहात साजरा

    21 जून 2024 रोजी हेरिटेज इंटरनॅशनल स्कूल, कासारआंबोली, पुणे येथे 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. या वर्षीची थीम 'स्व आणि समाजासाठी योग' ही होती. विद्यार्थी, कर्मचारी आणि प्रशिक्षक यांनी योग दिनाच्या जिंगल स्पर्धेसाठी स्वत:ची नोंदणी करणे आणि योगासाठी शासकीय प्रमाणपत्र मिळवणे यासारख्या योग क्रियाकलापांमध्ये भाग घेऊन योग दिन साजरा केला. सहजयोग संघ आणि प्राचार्या रेणू पाटील यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन करून योग दिनाच्या सोहळ्याला सुरुवात झाली. कार्यक्रमाची सुरुवात सान्वी पाटील हीच्या तालबद्ध योगासनातील नृत्य सादरीकरणाने झाली. सामूहिक तालबद्ध सादरीकरण आणि सहजयोग ध्यानामुळे कार्यक्रम अधिक सुंदर झाला. शाळेच्या योग प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी प्रार्थना, सराव उपक्रम, सूर्यनमस्कार आणि बैठी आणि उभे राहूनची आसने, ओंकार आणि ध्यानधारणा केली. कार्यक्रमाची सांगता जागतिक संगीत दिनानिमित्त गायन, वादन आणि प्रार्थना जी सर्व विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी गायन करून केली ... 'इतनी शक्ती हमे देना दाता...' ही सामूहिक प्रार्थना घेण्यात आली. हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या डॉ. रेणू पाटील म्हणाल्या की, आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी अधिक आनंददायी होता कारण योग व संगीत दिवस आज साजरे झाले. योगासने आणि संगीताचा आनंद हेच तर शरीर, मन आणि आत्मा यांना प्रफुल्लित करतात . आज दोन्ही आपल्या जीवनात महत्त्वाचे आहेत. शालेय व्यवस्थापन सदस्य श्री.कृष्णा भिलारे (संस्थापक, अध्यक्ष), सौ.संगीता भिलारे (सचिव), श्री. कुणाल भिलारे (संचालक), सौ. यशस्विनी भिलारे यांनी सर्वांना निरोगी, आनंदी योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

  • अध्यात्म'ज्ञानामुळे माझा अभिनय आणि मी प्रगल्भ होतोय!- अभिनेता प्रसाद ताटके

    'अभिनय'  आणि 'अध्यात्म' या बळावर अभिनेते प्रसाद ताटके यांनी असंख्य मालिकांमधून आपला वेगळा ठसा उमटवायला आहे. 'भैरोबा', 'काटा रुते कुणाला', 'कन्यादान', 'लक्ष', 'स्वप्नांच्या पलीकडले', 'माधुरी मिडलक्लास', 'क्राईम डायरी', 'श्री स्वामी समर्थ', 'दूर्वा', 'प्रेमास रंग यावे', 'स्वराज्यारक्षक संभाजी', 'स्वराज्यजननी जिजामाता', 'सुखी माणसाचा सदरा', आणि आता नवीन चालू होणारी 'अंतरपाट' अशी प्रातिनिधिक नावे घेता येतील. तसेच नाटकांमध्ये 'अजब तुझे सरकार', 'संगीत सन्यस्त खड्ग' आणि चित्रपटांमध्ये केदार शिंदे दिग्दर्शित 'महाराष्ट्र शाहीर', आगामी 'दिल मलंगी' अश्या काही मराठी चित्रपटांमध्ये या हरहुन्नरी कलावंताने विविध पैलू असलेल्या अनेक भूमिकांतून रसिकांचे मनोरंजन केले आहे. अभिनयासोबतच ते अनेक स्टेज शोंचे निवेदन - सूत्रसंचालन देखील करतात. यासोबतच ते सत्यनारायण पूजा, सर्व शांती कर्म म्हणजेच पौरोहित्य तसेच श्री स्वामींच्या मठात गुरुजी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या आगामी चित्रपट,  मालिकांमधून विविध छटा असलेल्या भूमिकांमध्ये ते रसिकांना दिसणार आहेत. त्यांच्याशी साधलेला हा संवाद... प्रश्न १ : प्रसादजी आपली अभिनय क्षेत्रात सुरुवात कशी झाली? आवड म्हणून कि व्यवसाय म्हणून? अभिनेता प्रसाद ताटके : अर्थात आवड म्हणून! पण पुढे काही चांगली काम मिळाली आणि हळूहळू अध्यात्मासोबतच अभिनयात रमू लागलो. स्वामीकृपेने सध्या दोन्हीं क्षेत्रांमध्ये काम करीत आहे. प्रश्न २ : आपण अभिनय करू शकतो केव्हा समजले? गाॅडफादर कोणाला मानता? अभिनेता प्रसाद ताटके : हे अभिनयाचे गुण कोंकणवासियांत उपजत आहेत, त्यामुळे लहानपणापासून स्टेजचे आकर्षण कायम होते. गॉडफादर म्हणाल तर मराठी मध्ये उपेंद्र लिमये, सुबोध भावे, प्रसाद ओक, प्रसाद खांडेकर, दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ, सदाशिव अमरापूरकर, विनय आपटे सर यांसह अनेक दिग्गजांच्या अभिनयाने प्रेरणा मिळत आहे. प्रश्न ३ : आध्यात्म आणि अभिनय यात निवडायचे झाल्यास कशाची निवड कराल? अभिनेता प्रसाद ताटके : अध्यात्म आणि अभिनय हे दोन्ही माझे passion आहे. त्यामुळे मी दोन्हीमध्ये रमतो. अभिनयाला अध्यात्माची जोड असेल तर आधिक फायद्याचे होते. अध्यात्मात भाषा, उच्चार, आवाजाचा पोत, सादरीकरण यांवर प्रभुत्व गाजवता येते, आणि अभिनय कलेसाठी हे महत्वाचे असल्याने, मी दोन्ही कलेत पारंगत होण्यासाठी प्रयत्न करीत असतो... प्रश्न ४ : अभिनयात करियर करायचं ठरवलं तेव्हा कोणती आव्हाने समोर होती? त्यांना कसे सामोरे गेलात? अभिनेता प्रसाद ताटके : सुरवातीला खूप हालपेष्टा सहन कराव्या लागल्या, आजही आव्हान समोर आहेतच. पण आता थोडा मार्ग मोकळा होत चाललाय. छान छान भूमिका करायला मिळत आहेत. आपलं काम लोकांपर्यंत पोहचू लागलय याचा आनंद होतोय... प्रश्न ५ : आजवरचा या क्षेत्रातील अनुभव कसा होता? आवडीचे काम मिळावण्यासाठी काय काय करावे लागले? अभिनेता प्रसाद ताटके : आजपर्यंतचा अनुभव खूप छान आहे. इतर कलाकारांना जशी वागणूक सुरवातीला मिळते तस माझ्या बाबतीत शक्यतो झाले नाही. यामध्ये अर्थातच माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद आणि मघाशी म्हणालो तसं अध्यात्माची जोड यामुळे अनेक मालिका, नाटकांमध्ये भूमिका मिळत गेल्या. इतर कलाकारांना जसा त्रास होतो तसा सुदैवाने मला झाला नाही. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे खूप कमी कालावधीत rispect  मिळतोय. जो काही संघर्ष सुरु आहे तो आव्हानात्मक भूमिका मिळविण्यासाठी... प्रश्न ६ : आजवर तुम्ही कोणत्या कोणत्या भुमिका केल्या आहेत? अभिनेता प्रसाद ताटके : आजवर मी गुरुजी, डॉक्टर, हवालदार, ऑफिस  मॅनेजर, अशा वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. 'महाराष्ट्र शाहीर' मधील भूमिकेचे विशेष कौतुक झाले आहे. तसेच सुनील परब दिग्दर्शित आणि रमाकांत भोसले यांच्या सद्गुरू एंटरटेनमेण्टच्या 'दिल मलंगी' मध्ये एक अफलातून भूमिका करत आहे. असे असले तरी मला आगामी काळात निगेटिव्ह भूमिका आव्हानात्मक वाटत असून अश्या भूमिका करायला जास्त आनंद होईल... प्रश्न ७ : केदार शिंदे यांच्यासोबत महाराष्ट्र शाहीर करतानाचा अनुभव कसा होता? अभिनेता प्रसाद ताटके : फार छान, वेगळी अनुभूती देणारा. देशासाठी आपल्या पिढीने किती त्यागलंय तो काळ या निमित्ताने अनुभवायला मिळत होता. केदार शिंदे सर कलावंतांकडून त्यांना हवा असलेला अभिनय सहज करून घेतात. ते अतिशय शिस्तप्रिय आहेत. स्वामीभक्त असल्याने आमच्यात सहज ट्युनिंग जमले.

  • भूषण प्रधान आणि शिवानी सुर्वेंच्या 'ऊन सावली' चित्रपटाचा अल्ट्रा झकास ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर!

    नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'ऊन सावली' या चित्रपटाला प्रेक्षकांचं महाराष्ट्रभर भरभरून प्रेम मिळालं. कांद्या पोह्याच्या कार्यक्रमातून पार पडलेल्या लग्नात प्रेमाचा गंध कसा दरवळत जातो; सांगणाऱ्या या चित्रपटाचा १२  एप्रिल २०२४  रोजी 'अल्ट्रा झकास' मराठी ओटीटीवर वर्ल्ड  डिजिटल प्रीमियर होणार आहे. प्रणय आणि अन्वी त्यांच्या पालकांच्या आग्रहास्तव लग्नासाठी एकमेकांना भेटायला तयार होतात. प्रणयला पहिल्या भेटीतच अन्वी आवडली आहे, मात्र अन्वीची लग्न करण्याची इच्छा नाही. असं असतानाही त्यांचं लग्न होतं खरं, मात्र लग्नानंतर काय गोंधळ सुरू होतो ते चित्रपटात पहायला मिळणार आहे. भूषण प्रधान आणि शिवानी सुर्वे यांच्यासह तिचा खऱ्या आयुष्यातील पती अजिंक्य ननावरे हे चित्रपटाचे प्रमुख कलाकार आहेत. याचबरोबर राज शरणागत, अंकित भोईर, विकास हांडे, श्वेता कामत आणि प्रिया तुळजापूरकर यांच्या चित्रपटात धमाकेदार भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन दिवाकर नाईक यांनी केले आहे. “एक आशावादी आणि एक निरर्थक विचार सरणीचे दोन पात्र या चित्रपटात प्रेक्षकांना दिसणार आहेत. निरर्थक विचारातून एक आशेचं किरण तेवत ठेवलं तर आयुष्य सुंदर होतं. प्रेमाचा हा विलक्षण विचार मांडणारा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, अशी आम्हाला आशा आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री.सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले. नवनवीन चित्रपट पाहण्यासाठी :- https://www.ultrajhakaas.com/marathi-movies

  • सुपरहिट ‘सिरी लंबोदर विवाह’ कन्नड चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर!

    लग्न करण्यापेक्षा लग्न जमवणं जास्त अवघड असतं, मात्र संजय आणि लीला यांनी ‘सिरी लंबोदर विवाह’ चित्रपटात लग्न जमवण्याचा विडा उचलला आहे. ‘सिरी लंबोदर विवाह’ चित्रपट मूळ कन्नड भाषेत असून ‘संजय लीलाची प्रेम कहाणी’ या नावाने मराठीत पहायला मिळणार आहे. ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर ५ एप्रिल २०२४ रोजी चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. एकाच शाळेत आणि ट्यूशनला जाण्यापासून संजय आणि लीला एकत्र मोठे झाले आहेत. शिक्षण पूर्ण  केल्यानंतर विवाह संस्था उघडतात. तेव्हा त्यांना राजकारणाची पार्श्वभूमी असलेल्या एका लग्नाच्या  नियोजनाची संधी मिळते. या लग्नादरम्यान १०० कोटींचा एक रहस्यमय गोंधळ उद्भवतो आणि गोष्टीला एक अनपेक्षित वळण मिळतं. हे वळण नेमकं कुठे जाऊन पोहचणार, हे चित्रपटात कळणार आहे. चित्रपटाचे विलक्षण दिग्दर्शन नवोदित दिग्दर्शक सौरभ कुलकर्णी यांनी केले असून अंजन भारद्वाज आणि दिशा रमेश या जोडीचे या चित्रपटातून सुपरहिट पदार्पण झाले आहे. "दाक्षिणात्य चित्रपटांतून दाक्षिणात्य संस्कृती आणि खास कला आपल्याला पहायला आणि अनुभवायला मिळते. चित्रपटांमधून विविध संस्कृतींची देवाण घेवाण व्हावी, आणि चांगली कलाकृती भाषेच्या बंधनात अडकून न राहता प्रेक्षकांपर्यंत पोहचावी म्हणून हा आमचा प्रयत्न आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेंमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री.सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले. नवनवीन चित्रपट पाहण्यासाठी:- https://www.ultrajhakaas.com/marathi-movies

  • सिद्धार्थ जाधवच्या ‘लग्न कल्लोळ’ चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होतोय अल्ट्रा झकासवर!

    संपूर्ण महाराष्ट्रात नुकताच प्रदर्शित झालेला आणि आपल्या जबरदस्त गाण्यांसाह सर्वत्र धुमाकूळ घातलेला ‘लग्न कल्लोळ’ चित्रपटाचा २९ मार्च २०२४ रोजी ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. महाराष्ट्रातील चित्रपट रसिक प्रेक्षकांना हा सुवर्णयोग मनस्वी अनुभवता येणार आहे. श्रुती आणि अथर्व एकमेकांवर प्रेम करतात आणि ते लग्न करणार आहेत. श्रुतीला एक जुळी बहीण आहे, तिचे लग्न घटस्फोटाच्या उंबरठ्यावर आहे. जुळी असल्यामुळे श्रुती आणि तिच्या बहिणीची कुंडली सारखीच आहे, त्यामुळे अथर्व आणि श्रुतीचे लग्न होऊन घटस्फोट होण्याची शक्यता आहे. खरंच अशी घटना घडेल की घटनेला एक वेगळं वळण मिळेल? चित्रपटात सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान, ऐश्वर्या आहेर आणि सुप्रिया कर्णिक यांच्या प्रमुख भूमिका असून चित्रपट मोहम्मद बर्मावाला आणि मयूर तिरमखे यांनी दिग्दर्शित केला आहे. तसेच प्रिया बेर्डे, अमिता कुलकर्णी, प्रतिक्षा लोणकर आणि भारत गणेशपुरे हे लोकप्रिय कलाकारही चित्रपटात  दिसणार आहेत. “नवा विषय आणि नवा आशय असणारा ‘लग्न कल्लोळ’ चित्रपट आणि त्यातील भन्नाट कलाकार प्रेक्षकांचं भन्नाट मनोरंजन करणार आहेत. आम्ही या चित्रपटासोबतच येत्या काळात अनेक मराठी चित्रपट घेऊन येणार असून प्रेक्षकांचं शाश्वत मनोरंजन करणार आहोत.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री.सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले. नवनवीन चित्रपट पाहण्यासाठी :- https://www.ultrajhakaas.com/marathi-movies

  • 'मोऱ्या' २२ मार्च २०२४ रोजी मराठीसह तामिळ, तेलगू, कन्नड, हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार!

    शहराची स्वच्छता राखण्याचं काम करणाऱ्या सफाई कामगारांवर अनेकदा चर्चा होते. पण त्यांच्या व्यथा, त्यांच्या अडचणी मात्र आजही तशाच आहेत. यावर प्रकाश टाकणारा सफाई कर्मचाऱ्यांची व्यथा दाखविणारा मोऱ्या हा अत्यंत वेगळा चित्रपट मराठीसोबतच हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड या भाषांमध्ये येत्या २२ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित होत आहे. सेंसॉर बोर्डासोबत प्रदीर्घ संघर्ष करून हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याने तमाम रसिकांमध्ये मोऱ्या बद्दल विशेष कुतूहल निर्माण झाले आहे. एका सफाई कर्मचाऱ्यांची अत्यंत विलक्षण भावस्पर्शी कथा 'मोऱ्या' या चित्रपटात रेखाटण्यात आली आहे. ती साकारण्यासाठी अभिनेता जितेंद्र बर्डे यांनी खास मेहनत घेतली आहे. त्यांनी केलेला नैसर्गिक अभिनय तंतोतंत सफाई कर्मचाऱ्यांचं आयुष्य उभं करतं. विषयाच्या जातकुळीनुसार धुळे जिल्ह्यातील 'पिंपळनेर या ठिकाणी चित्रपटाचे चित्रीत करण्यात आहे. चित्रपटाच्या माध्यमातून या परिसराचे सौंदर्य पहिल्यांदाच सर्वांना मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या निर्मितीसाठी निर्माती तृप्ती कुलकर्णी, राजेश अहिवले, सहनिर्माते प्रेरणा धजेकर, पूनम नागपूरकर, मंदार मांडके, राहुल रोकडे, सचिन पाटील यांची खंबीर साथ लाभली आहे. 'टॉर्टुगा मोशन पिक्चर्स'ची निर्मिती असलेल्या या चित्रपटात एका सफाई कर्मचाऱ्यांची हृदयस्पर्शी कथा रेखाटण्यात आली असून ती अभिनेता जितेंद्र बर्डे यांनी आपल्या सहजसुंदर नैसर्गिक - संयमी अभिनयाने हुबेहूब उभी केली आहे. प्रमुख सहकलाकार उमेश जगताप, संजय भदाणे, धनश्री पाटील, राहुल रोकडे, बालकलाकार रुद्रम बर्डे इत्यादींचा अभिनय आहे. संगीतकार-अमोघ इनामदार, गायक अवधूत गुप्ते तर DOP आकाश काकडे आहेत. सहाय्यक दिग्दर्शन श्रेयस गौतम, करण मोरे यांचे आहे. विविध आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविणारा 'मोऱ्या' २२ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन सर्वांनी पहावा आणि मराठी अस्मिता जागवावी.

  • २५ वर्षानंतर पुन्हा पहा आभाळमायातील मनोज जोशी आणि सुकन्या कुलकर्णी काळजाला भिडणारा अभिनय!

    लोकप्रियतेचा उचांक गाठणाऱ्या दामिनी या मालिकेच्या लेखिका, निर्माती आणि दिग्दर्शक अर्थात अभिनेत्री कांचन घारपुरे उर्फ कांचन अधिकारी ह्या एक नवा विलक्षण विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आपल्या सुसंस्कृत मराठमोळ्या कुटुंबात घडलेल्या सत्यघटनेवर त्यांनी 'जन्मऋण' या नव्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मनोरंजनातून थेट प्रेक्षकांच्या काळजात स्थान मिळविण्यासाठी 'आभाळमाया' या पहिल्या लोकप्रिय दैनंदिन मालिकेतील जोडी शरद आणि सुधा जोशी अर्थात अभिनेते मनोज जोशी आणि अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांची साथ त्यांना लाभली आहे. आज निव्वळ भारतात ३२,००० च्या वर केसेस आहेत ज्यात स्वतःच्या मुलानेच आपल्या आई-वडिलांना त्यांच्या म्हातारपणी आपल्यापासून दूर केलेले आहे. ‘जन्मॠण’ हा नवीन चित्रपट याच विषयावर आधारित आहे. न्यायालयातर्फे अशा मुलांना शिक्षाही आहेत. जन्मदात्या आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या मुलांना ‘कलम-5’ तर्फे तुरुंगवासही भोगाव लागतो. समाजात आपल्या आई-वडिलांना प्रेमाने व आदराने आपल्या मुलांनी वागवावे केवळ याच एका सद्भावनेने या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन कांचन अधिकारी यांनी केलेले आहे. आतापर्यंत आपण त्यांना चित्रपटाच्या व दूरदर्शनच्या माध्यमातून ओळखतो एक सकस कलाकृती घेऊन त्या तुमच्या भेटीला २२ मार्चपासून येत आहेत. ‘गणेश फिल्म्स’ निर्मित आणि ‘श्री. अधिकारी ब्रदर्स’ प्रस्तुत 'जन्मऋण' चित्रपटाच्या लेखिका, निर्माती, दिग्दर्शक आहेत कांचन अधिकारी. या चित्रपटात मनोज जोशी, सुकन्या कुलकर्णी, सुशांत शेलार, तुषार आर.के., अनघा अतुल, शशी पेंडसे, प्रज्ञा करंदीकर, धनंजय मांद्रेकर, दर्पण जाधव, विराज जोशी, कपील पेंडसे, सिद्धेश शिगवण आणि पाहुणे कलाकार म्हणून खास भूमिकेत हिंदी मालिका-चित्रपट अभिनेते महेश ठाकूर, निहारिका रायजादा यांनी काम केले आहे. डीओपी सुरेश देशमाने यांच्या कॅमेऱ्यातून जन्मऋणचे सौन्दर्य अधिकच खुलले असून संगीतकार वैशाली सामंत आणि गायक सुदेश भोसले, वैशाली सामंत यांच्या संगीत सुरावटीने ही कथा अधिक रंग भरते. येत्या २२ मार्चला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट नक्की पहा व नवीन दृष्टिकोन मिळवा.

  • भरत जाधव, दिलीप प्रभावळकर, संजय मोने यांचा 'झिंग चिक झिंग' चित्रपट 'अल्ट्रा झकास मराठी ओटीटी'वर!

    देशाचं पोट भरणारा बळीराजा जेव्हा उपाशी राहतो, तेव्हा त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अगणित अडचणींना तो कसा सामोरा जातो हे 'झिंग चिक झिंग' या राष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या चित्रपटातून प्रकर्षाने दिसते. हा चित्रपट आता ०४  मार्च २०२४ रोजी अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर  प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांच्या मनात गंभीर विचारांची दाहकता निर्माण करणार आहे. एका संवेदनशील शेतकऱ्यावर सावकारी कर्जाचा मोठा डोंगर उभा आहे. परिस्थितीने गांजलेला हा शेतकरी आपला संपूर्ण आत्मविश्वास हरवून बसला असून जगासमोर मान उंच करून चालणं त्याच्यासाठी लज्जास्पद झालं आहे. हा अगतिक शेतकरी कर्जाचा डोंगर फोडून काढेल की त्याखाली दबून मरेल, हे चित्रपटात कळणार आहे. नितीन नंदन यांनी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले असून चित्रपटात भरत जाधव, माधवी जुवेकर, संजय मोने आणि दिलीप प्रभावळकर हे सुप्रसिद्ध अभिनेते आहेत. “२०१० च्या महाराष्ट्र राज्य पुरस्कारासोबतच आणखी बऱ्याच पुरस्कारांनी पुरस्कृत झालेला चित्रपट अल्ट्रा झकासच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहचवताना आनंद गगनात न मावणारा आहे. अशाच प्रकारचे अनेक चित्रपट आणून प्रेक्षकांना नेहमी मनोरंजित ठेवण्याचा आमचा सकारात्मक अट्टहास आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री.सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले. नवनवीन चित्रपट पाहण्यासाठी :- https://www.ultrajhakaas.com/marathi-movies

  • जन्मऋणची विलक्षण कथा सांगण्यासाठी लेखिका, निर्माती दिग्दर्शक कांचन अधिकारी सज्ज

    आपल्या विलक्षण कलागुणांनी अभिनेत्री, लेखिका, निर्माती आणि दिग्दर्शक असा चौफेर वावर करून मनोरंजन विश्वातील अनेक विक्रम नावावर नोंदविणाऱ्या कांचन अधिकारी एक अत्यंत वेगळा विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. एका गाजलेल्या सत्यघटनेवरून प्रेरित होऊन त्यांनी 'जन्मऋण' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा विषय प्रेक्षकांच्या हृदयात सखोल रुजविण्यासाठी अत्यंत वेगळं कास्टिंग त्यांनी करून 'आभाळमाया' या मराठी प्रेक्षकांच्या मानत रुंजी घालणारी जोडी अर्थात अभिनेते मनोज जोशी आणि अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांची निवड त्यांनी बाजी मारली आहे. मूल जन्माला येताना आई व मुलातील नाळ कापली जाते आणि तिथेच तो एक व्यक्ती म्हणून उदय पावतो. नाळ कापली तरी आई-बापाचं मुलांप्रतीचं प्रेम मात्र कधीच कमी होत नाही. पण मुलं मोठी झाली की पालकांची संपत्ती,  मालमत्ता किती आहे याचा विचार करताना दिसतात. पालक मात्र यापासून अनभिज्ञ असतात. जेव्हा मुलांना पालकांच्या अस्तित्वापेक्षा त्यांच्या मालमत्तेचा मोह पडतो तेव्हा काय होतं? पालकांनी अशावेळी काय करावे? मुलांमध्ये होणारे बदल कसे ओळखावे? नातेसंबंधाकडे कोणत्या दृष्टीने पहावे? बदलत्या काळानुसार त्याची पावलं कशी ओळखावी? याच विषयावर आधारित "जन्मऋण" हा त्यांचा चित्रपट आहे. ‘श्री गणेश फिल्म्स’ निर्मित आणि ‘श्री. अधिकारी ब्रदर्स’ प्रस्तुत 'जन्मऋण' चित्रपटाच्या लेखिका, निर्माती, दिग्दर्शक आहेत कांचन अधिकारी. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत मनोज जोशी, सुकन्या कुलकर्णी, सुशांत शेलार, धनंजय मांद्रेकर, तुषार आर.के., अनघा अतुल आणि खास भूमिकेत पाहुणे कलाकार म्हणून हिंदी मालिका - चित्रपट अभिनेते महेश ठाकूर यांनी काम केले आहे. डीओपी सुरेश देशमाने यांच्या कॅमेऱ्यातून जन्मऋणचे सौन्दर्य अधिकच खुलले असून संगीतकार वैशाली सामंत आणि गायक सुदेश भोसले, वैशाली सामंत यांच्या संगीत सुरावटीने ही कथा अधिक रंग भरते. येत्या १५ मार्चला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट नक्की पहा व नवीन दृष्टिकोन मिळवा.

  • तरुणांच्या ‘जिव्हारी’ लागणारा चित्रपट २६ फेब्रुवारी २०२४ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर!

    देशात राहणाऱ्या प्रत्येक उभरत्या तरुणाचं परदेशात जाऊन आपलं नशीब अजमावून पहाण्याचं स्वप्न असतं. परदेशात राहणाऱ्या अशाच एका तरुणाची कथा ‘जिव्हारी’ या चित्रपटात अलौकिक मांडली गेली आहे. २६ फेब्रुवारी २०२४ रोजी अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार असून प्रेक्षकांना चित्रपटाचा अद्वितीय अनुभव घेता येणार आहे. परदेशात जाऊन नोकरी करणारा महाराष्ट्रातला एक तरुण पुन्हा आपल्या मायदेशी परततो. आपल्या गावी परत आल्यानंतर पुन्हा परदेशाची वाट न धरता इथेच आपल्या उपजीविकेचं साधन शोधण्याचा निर्णय घेतो. जवळजवळ चौदा नोकऱ्या बदलून आई वडिलांवर भार झालेला हा तरुण आयुष्यात पुढे अशी एक गोष्ट करतो, जे सर्वांनाच आश्चर्यचकित करणारं आहे. ती आश्चर्याची गोष्ट काय असेल हे प्रमुख कलावंत निकिता सुरेश कांबळे, सुयोग सुदर्शन भोरे, ओंकारसिंग उदयसिंग राजपूत, नील राजुरीकर, मनीषा दामोदर मोरे या नवोदित कलाकारांच्या टवटवीत अभिनयाने 'जिव्हारी'ची गोष्ट कळणार आहे. चित्रपटाची निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शन गणेश शंकर चव्हाण यांनी केली आहे. “अनेक विषयांवर आधारित चित्रपट आम्ही प्रेक्षकांच्या भेटीस आणत असतो. यावेळी तरुणांना प्रेरित करेल असा आशयघन प्रेरक चित्रपट ‘जिव्हारी’ अल्ट्रा झकास ओटीटीच्या माध्यमातून आम्ही सादर करत आहोत. यापुढेही प्रेक्षकांचं तासंतास मनोरंजन होईल याकरिता आम्ही सातत्याने नवनवीन धाटणीचे चित्रपट आणण्याच्या प्रयत्नात आहोत.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री.सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले. नवनवीन चित्रपट पाहण्यासाठी :- https://www.ultrajhakaas.com/marathi-movies

  • पूना कॉलेजचे विद्यार्थी रमले पुस्तकांच्या गावात

    आजकाल इन्टरनेट आणि मोबाइलच्या जगात विद्यार्थ्यामध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी. ही बाब लक्ष्यात घेउन कॉलेजचे प्राचार्य प्रो.डॉ.आफताब अनवर शेख़ यांच्या मार्गदर्शनाखाली या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. पूना कॉलेजचे 33 विद्यार्थी आणि 04 शिक्षक यांनी बाल साहित्य,कादंबरी कविता,स्पर्धापरीक्षा ,नियतकालिके, चरित्र, इतिहास, स्त्रीसाहित्य,लोक-साहित्य इ. पुस्तकाचे वाचन करण्यात रमले . पूना कॉलेज ऑफ आर्ट्स साइंस एंड कॉमर्स कैंप पुणे या कॉलेजच्या विद्यार्थ्यानी नुकतीच ‘पुस्तकांचे गांव’ महाबलेश्वर तालुक्यातील भिलार या गावाला भेट दिली. या प्रसंगी भिलार गावचे व्यवस्थापक श्री राजेश जाधव यांनी विद्यार्थ्याना पुस्तकाना मित्र बनवा हा मोलाचा मंत्र दिला. या शैक्षणिक सहलीचे आयोजन डॉ.मो. शाकिर शेख ,डॉ. बाबा शेख,डॉ. मुखतार शेख प्रा. दिपनविता देव यांनी केले.

9561398225

  • Facebook
  • Instagram

©2021 by Stay Featured. Proudly Created by Buzzer Media & Advertising

bottom of page