आजकाल इन्टरनेट आणि मोबाइलच्या जगात विद्यार्थ्यामध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी. ही बाब लक्ष्यात घेउन कॉलेजचे प्राचार्य प्रो.डॉ.आफताब अनवर शेख़ यांच्या मार्गदर्शनाखाली या भेटीचे आयोजन करण्यात आले होते.
पूना कॉलेजचे 33 विद्यार्थी आणि 04 शिक्षक यांनी बाल साहित्य,कादंबरी कविता,स्पर्धापरीक्षा ,नियतकालिके, चरित्र, इतिहास, स्त्रीसाहित्य,लोक-साहित्य इ. पुस्तकाचे वाचन करण्यात रमले .
पूना कॉलेज ऑफ आर्ट्स साइंस एंड कॉमर्स कैंप पुणे या कॉलेजच्या विद्यार्थ्यानी नुकतीच ‘पुस्तकांचे गांव’ महाबलेश्वर तालुक्यातील भिलार या गावाला भेट दिली. या प्रसंगी भिलार गावचे व्यवस्थापक श्री राजेश जाधव यांनी विद्यार्थ्याना पुस्तकाना मित्र बनवा हा मोलाचा मंत्र दिला.
या शैक्षणिक सहलीचे आयोजन डॉ.मो. शाकिर शेख ,डॉ. बाबा शेख,डॉ. मुखतार शेख प्रा. दिपनविता देव यांनी केले.
Comments