हेरिटेज इंटरनॅशनल स्कूल, कासारआंबोली, पुणे येथे दिनांक 21 व 22 डिसेंबर रोजी वार्षिक स्नेहसंमेलन तसेच वार्षिक क्रीडा महोत्सव समारोह उत्साहात साजरा झाला. यावेळी वार्षिक क्रीडा सप्ताह समारोपण वेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिके सादर केले, त्यामध्ये त्यामध्ये नृत्य, ओलंपिक मशाल रन, घोडेस्वारी,धनुर्विद्या ,रोल बॉल स्केटिंग ,परेड, पॉम पॉम शो,रिदमिक योगा, कराटे लेझीम, घुंगुरकाठी, डंबेल्स अशा विविध प्रात्यक्षिकांची सादरीकरण झाले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय मोटो सुपर क्रॉस चॅम्पियनशिप 2023 चे विजेते मोटो रेसर ऋग्वेद बारगुजे व शिवछत्रपती अवॉर्ड विजेते ज्ञानेश्वर बारगुजे हे उपस्थित होते. ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष कृष्णा भिलारे, सचिव संगीता भिलारे, संचालक कुणाल भिलारे , सदस्य रवी मांडेकर ,गोडसे , कासार आंबोलीचे सरपंच उमेश सुतार , ग्रामसदस्य मा. सहायकपोलीस आयुक्त रवींद्र रसाळ , यशश्विनी भिलारे, समिधा भिलारे व निमंत्रित पालक यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना कला, क्रीडा व विविध स्पर्धांतील पारितोषकांचे वितरण करण्यात आले. वार्षिक सर्वोत्तम संघाची ट्रॉफी 'रेड फायटर्स' व द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी 'ग्रीन चॅलेंजर्स' यांना घोषित करण्यात आली.
तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कुडो या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करणाऱ्या तसेच
राज्य व शालेय स्तरावरील विविध क्रीडा प्रकारातउत्तम कामगिरी केलेल्या खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले..
जवळपास 11 विविध खेळ व मैदानी खेळ यामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांचे कौशल्य दाखवले व पंधरा दिवस हा चालणारा क्रीडा सप्ताह क्रीडा प्रशिक्षक, शिक्षकवर्ग यांनी उत्साहाने व जिद्दीने जिंकण्याची उमेद घेवून पार पाडण्यास मदत केली. जीवनात व शिक्षणात उत्साह येण्यासाठी शारीरिक क्रीडा प्रकार खूप मदत करतात व त्यामुळे मुलांचे मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते व नवीन उमेद मुलांमध्ये येण्यास हा क्रीडा सप्ताह खूप महत्त्वाचे काम करतो शाळेच्या प्राचार्या रेणू पाटील यांनी व्यक्त केले.
Commentaires