राजमाता जिजाऊ भोसले व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
- Team Stay Featured

- 5 days ago
- 1 min read
प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, लोणी येथे दि. १२ जानेवारी २०२६ रोजी राजमाता जिजाऊ भोसले व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यांमध्ये या थोर विभूतींचे विचार, आदर्श व मूल्ये रुजविण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते. या प्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून डॉ. जयश्री सिंगार मॅडम उपस्थित होत्या. मान्यवरांचे स्वागत पुष्परोप भेट देऊन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ भोसले व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रभावी भाषणे सादर केली. काही विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची वेशभूषा परिधान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मार्गदर्शन सौ. सायराबानू शेख यांनी अत्यंत उत्तमरीत्या केले. आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, सात्रळ येथील उपप्राचार्या डॉ. जयश्री सिनगर मॅडम यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून शिस्त, धैर्य, आत्मविश्वास व राष्ट्रसेवा या मूल्यांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

संस्थेच्या माननीय प्राचार्या डॉ. रेणू पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून विवेकानंदांचा मौलिक विचार "उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका", ही आत्मसात करण्याची प्रेरणा दिली. कार्यक्रमाचा समारोप सौ. खालकर यांच्या आभारप्रदर्शनाने करण्यात आला.या युथ क्लबच्या कार्यक्रमानिमित्त राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजयदादा विखे पाटील, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिवानंद हिरेमठ अतांत्रिक विभागाचे संचालक डॉ. प्रदीप दिघे, माध्यमिक शिक्षण विभाग संचालिका सौ. लिलावती सरोदे, प्राचार्या डॉ. रेणू पाटील तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी कार्यक्रमास हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा व्यक्त केल्या.






Comments