‘रक्षकांना राखी’ : हेरिटेज स्कूलचा अनोखा रक्षाबंधन सोहळा
- Neel Deshpande
- Aug 12
- 1 min read
पौड, ता. पुणे – भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण रक्षाबंधन यंदा हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलने अनोख्या उपक्रमातून साजरा केला. शाळेच्या विद्यार्थ्यांनी पौड पोलिस स्टेशनला भेट देऊन समाजाचे खरे ‘रक्षक’ असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मनगटावर राखी बांधत त्यांचा सन्मान केला.

या विशेष कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या प्राचार्या डॉ. रेणू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शाळेने पोलीस स्टेशनला भेट देऊन विद्यार्थ्यांना कायदा अंमलबजावणी, फौजदारी न्यायव्यवस्था आणि समाजरक्षण याबाबत प्रत्यक्ष जाणून घेण्याची संधी दिली. विद्यार्थ्यांनी विविध विभागांची पाहणी केली, एफआयआर नोंदणीची प्रक्रिया शिकलो, तसेच गुन्हेगारी प्रतिबंधक उपायांबद्दल अधिकाऱ्यांकडून माहिती मिळवली.
यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष गिरीगोसावी, सहाय्यक पोलीस अधिकारी श्रीमती अनिता रवळेकर, तसेच पोलीस कॉन्स्टेबल श्री. मनोज कदम, श्री. वैभव सुरवसे, श्री. मंगेश कदम, श्री. निवास जगदाळे, श्री. श्रीकृष्ण पोरे, श्री. बाबा पाटील, श्री. संतोष गायकवाड आणि श्री. विजय ओंबासे यांची विद्यार्थ्यांशी उत्स्फूर्त चर्चा झाली.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मुळशी तहसीलदार श्री. विजयकुमार चोबे यांना भेटण्याची संधीही मिळाली. त्यांनी आपल्या जीवनप्रवासातील प्रेरणादायी क्षण सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
रक्षाबंधनाचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी केवळ आनंदोत्सव नव्हता, तर एक मौल्यवान शिकण्याचा अनुभव ठरला.

शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री. कृष्णा भिलारे, सचिव श्रीमती संगीता भिलारे, संचालक श्री. कुणाल भिलारे आणि श्रीमती यशस्विनी भिलारे यांनी पोलिस विभागाच्या नि:स्वार्थ सेवेसाठी आणि समाजरक्षणासाठी मनःपूर्वक आभार मानले.
Comments