top of page

Search Results

Search this site

83 results found with an empty search

  • पूना कॉलेज तर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निम्मित मानवंदना

    भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त पूना कॉलेज विद्यार्थी विकास मंडळ, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना+2,आयक्यूएसी यांच्या वतीने मानवंदना सभेचे आयोजन पूना कॉलेजचे प्राचार्य प्रो. डॉ.आफताब अन्वर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. एन.एस.एस.कार्यक्रम अधिकारी प्रा. असद शेख, प्रा. वसुधा वहवाल, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. बाबा शेख, एनसीसी अधिकारी सब लेफ्टनंट डॉ. मोहम्मद शाकीर शेख, सलमान सय्यद, राष्ट्रीय सेवा योजना +2 स्वयंसेवक, यांनी भारतरत्न डॉ. बी.. आर. आंबेडकरांना मानवंदना देण्यात आली. डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना प्राचार्य डॉ.आफताब अन्वर शेख यांनी विद्यार्थ्यांना डॉ.आंबेडकरांचे विचार आत्मसात करुन स्वत्रंता समता व बंधुता यांचा अंगीकार करन्याचे आवाहन केले. हॉटेल अरोरा टॉवरजवळ या कार्यक्रमाचे संचालन डॉ.बाबा शेख यांनी केले तर आभार प्रा. असद शेख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एनएसएस स्वयंसेवक आणि एनसीसी कॅडेट्स यांनी परिश्रम घेतले.

  • नाईकनवरे डेव्हलपर्सच्या वतीने स्ट्रक्चर्ड प्लॉट 'अवासा 'लाँच

    नाईकनवरे डेव्हलपर्सच्या वतीने स्ट्रक्चर्ड प्लॉट'अवासा लाँच; अवासा प्लॉटिंगसाठी केले ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म सुरू. नाईकनवरे यांच्या तळेगाव मधील पहिल्या प्रीमियम प्लॉटेड असलेला आवासा मेडोज या प्रकल्पातील ६२सर्व्हिस केलेले N A प्लॉट उपलब्ध पुणे…मार्च३०, २०२३…पुणे, मुंबई आणि गोवा येथीलकॉम्युनिटी सेन्ट्रिक निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पांसाठीप्रसिद्ध असलेल्या नाईकनवरे डेव्हलपर्सने  त्यांनीप्रीमियम प्लॉटेड डेव्हलपमेंटचा नवीन व्यवसाय उभाकरून “आवासा” हा प्रकल्प लाँच केला आणि https://plots.naiknavare.com/, केवळ प्लॉटिंगसाठी डिझाइनकेलेले त्याचे पहिले-प्रकारचे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म सुरू केले.यानवीन समर्पित उभ्या “आवासा मेडोज” अंतर्गत पहिला प्रकल्प तळेगावच्या वडगाव मावळ परिसराजवळ आहेजो मुंबई-पुणे महामार्गाशी सोयीस्करपणेजोडला गेला आहे त्यामुळे याला चांगली रेल्वे कनेक्टिव्हिटी देखील आहे. "आवासा मेडोज" मध्ये पूर्णपणे सर्व्हिस केलेल्या आलिशान N.A प्लॉट्सचा समावेश आहे आणि एकूण 62 प्लॉट आहेत तर प्रत्येकी 1848 चौ. फूट ते 2846 चौ.फूट आकाराचे असेलेले हे प्लॉट याची किंमत ६० लाखांपासून सुरुआहे.  अत्याधुनिकहे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्महे  केवळ प्लॉट विक्रीसाठी आणि मालमत्ता खरेदीप्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी सुरु करण्यात आलेआहे . यामध्ये लीड कॅप्चरपासून बुकिंगआणि त्यानंतर ऑनलाइन नोंदणीपर्यंत सर्वसमावेशक बाबी आहेत. रिअल इस्टेट उद्योगातील हा एक अग्रगण्य उपक्रम आहे जो खरेदीदारांना सहजपणे मालमत्ता शोधण्यास, व्हर्च्युअल टूर पाहण्यास आणि वैयक्तिक भेटींचे वेळापत्रक तयार करण्यास सक्षमकरेल, सर्व काही गोष्टीएका क्लिक वर उपलब्ध आहेत ज्यामुळे प्लॉट खरेदी आणि नोंदणीची संपूर्णप्रक्रिया घरबसल्या करणे शक्य होणारआहे. सामान्यत: तंत्रज्ञानावर कमी लक्ष केंद्रित करणाऱ्या क्षेत्रातील अशा ग्राहकांच्या सोयीसाठीच्या उपाययोजना सार्वजनिक जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये डिजिटलायझेशनच्या सरकारच्या स्पष्ट आवाहनामुळेच न्याय्य आहेत.नाईकनवरेयांनी "आवासा" नावाचा नवीन व्यवसाय विभागसुरू केला आहे जोविशेषत: शहरापासून २० ते २५किमी अंतरावर असलेल्या आलिशान भूखंडांचा विकास आणि विक्री करण्यावरकेंद्रित आहे. हा उपब्रँड व्यावसायिक प्रकल्पांसाठी त्यांच्या विद्यमान उप-ब्रँड "बिझनेसस्क्वेअर" सारखाच आहे. नाईकनवरे डेव्हलपर्सचे बिझनेस प्रोसेसेसचे प्रमुख आनंद नाईकनवरे यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीदरम्यान संरचित प्लॉट्सची व्यवसाय क्षमता आणि विक्री क्षमता याबद्दल बोलले. त्यांनी नमूद केले की वैयक्तिक आणि स्वतंत्र जीवन जगण्याची संधी, तसेच गेट्ड कम्युनिटीमध्ये राहण्याचे फायदे, हे सर्व प्लॉटिंग विक्रीच्या वेगवान वाढीस हातभार लावत आहेत. जमिनीच्या मूल्याच्या आंतरिक स्थिरतेव्यतिरिक्त, वाढीव FSI भूखंड खरेदी आणि स्वयं-विकास हेप्लॉट खरेदीदारांना आकर्षित करतात आणि अंतिम वापरकर्त्यासाठी व्यावसायिकदृष्ट्या अधिक मूल्य जोडतात. किंमत-ते-क्षेत्र गुणोत्तर खूप चांगले आहे. यामुळे नाईकनवरे डेव्हलपर्सना स्ट्रक्चर्ड प्लॉट्सच्या व्यवसायात प्रवेश करण्यास प्रोत्साहित केले. याव्यतिरिक्त, ते येत्या आर्थिक वर्षात ग्राहकांना 1 दशलक्ष चौरस फुटांचे भूखंड सुपूर्द करतील. महत्त्वाच्या खुणा आणि सुविधांच्या जवळ असलेला, हा प्रकल्प मालमत्ताखरेदीदार आणि गुंतवणूकदारांच्या वाढत्या मागणीलानिसर्गाच्या जवळ राहण्यासाठी आणिकमी उंचीच्या एकल निवासी जीवनशैलीमध्ये स्वतःला झोकून देण्याच्या विकासकाच्या प्रतिसादामुळे येतो. घर खरेदीदार आणि गुंतवणूकदारांच्या विविधतेसाठी विकसित आणि डिझाइन केलेला,हा प्रकल्प अनिवासी भारतीयांसाठी एक उत्तम गुंतवणूकम्हणून उदयास आला आहे, कारणगेल्या ५ वर्षांमध्ये जमिनीच्यामूल्यात ३ पट वाढझाली आहे. तळेगाव हे जलद गतीने वाढणाऱ्याकेंद्रांपैकी एक असल्याने आणिमुंबई, पुणे आणि नाशिकमधीलमोक्याच्या स्थानामुळे बरेच लक्ष वेधूनघेत असल्याने, इतर असंख्य बांधकामव्यावसायिक आणि व्यवसाय याशहरात आले आहेत. तळेगाव हे मुंबई-पुणे महामार्गाच्या जवळ आहे, आणि पुण्यापासून ४५मिनिटांच्या अंतरावर आहे आणि मुंबईपासूनदोन तासांच्या अंतरावर आहे हे एकसंभाव्य आर्थिक केंद्र बनवते."आवासा मेडोज"व्यतिरिक्त, नाईकनवरे डेव्हलपर्स तळेगाव (जलद गतीने वाढणाऱ्या केंद्रांपैकी एक) दोन अन्य प्लॉट केलेले विकास प्रकल्प सुरू करण्याच्या तयारीतआहेत

  • पूना कॉलेजमध्ये SOUK 2023 चे आयोजन

    पूना कॉलेज बी.वोक विभाग विभागाने माननीय प्राचार्य डॉ. आफताब अन्वर शेख आणि IQAC प्रमुख डॉ. इक्बाल शेख यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली गुरुवार, 9 मार्च 2023 रोजी SOUK 2023 नवोदित उद्योजक शोकेस 2023 चे यशस्वी आयोजन केले. रामसुख रिसॉर्ट्स महाबळेश्वर आणि वर्ल्ड ऑफ व्हेज पुणेचे एमडी प्रल्हाद राठी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. आपल्या भाषणात ते म्हणाले की, महाविद्यालयीन दिवस हे तुमची प्रतिभा दाखवण्यासाठी सर्वोत्तम दिवस असतात. स्पर्धेच्या जगात नोकरी मिळणे अवघड आहे. तुमचे भविष्य सुरक्षित करण्याचा एकमेव स्त्रोत म्हणजे उद्योजकता. आणि पूना कॉलेजच्या विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये उद्योजकतेचा सराव करण्याची प्रेरणा मिळाल्याचे पाहून त्याला आनंद होतो. अध्यापकाच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.पूना कॉलेजची सहाय्यक प्राध्यापिका दीपिका किनिंगे बीबीए विभाग सहायक प्राध्यापक आणि सुश्री झरीन शेरीफ, सहयोगी संचालक कौशल्य विकास केंद्र यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनाचा उद्देश SOUK 2023 नवोदित उद्योजक व्यवसायाला चालना देणे हा होता. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रा. फारुख शेख बी.व्होक नोडल ऑफिसर आणि प्रा.मुदस्सीर शेख डॉ.इमरान बेग बी.वोक विभाग यांनी सहकार्य केले. यावेळी वाणिज्य विभागाच्या प्रमुख डॉ. नसरीन खान, कंप्यूटर विभागप्रमुख डॉ. शबाना मुल्ला, सर्व विभागप्रमुख आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी भेट देऊन SOUK 2023 प्रदर्शनाचा आनंद घेतला आणि सर्व तरुण उद्योजकांना त्यांची उत्पादने, फराळ आणि खाद्यपदार्थ इत्यादी खरेदी करून प्रेरित केले.

  • युवकांमध्ये कौशल्य विकास आणि उद्योजकतेला चालना देण्याची गरज– श्रीमती कमल परदेशी

    तरुणांमध्ये कौशल्य विकास आणि उद्योजकतेला चालना देण्याची गरज असे वक्तव्य प्रमुख पाहुण्या श्रीमती कमल परदेशी (सचिव, अंबिका मसाला ग्रुप) यांनी व्यक्त केले उद्घाटक म्हणून त्या उद्योजकता कार्यशाळेत उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, युवकांमध्ये कौशल्य विकास आणि उद्योजकतेला चालना देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न धावता ग्रामीण भागातील उद्योगांना प्रोत्साहन द्यावे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ आणि पूना कॉलेज विद्यार्थी विकास मंडळ आणि आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने पूना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आफताब अन्वर शेख,उपप्राचार्य डॉ.इकबाल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेचा उद्देश विविध क्षेत्रातील उद्योजकता विकास आणि विपणन व्यवस्थापन या विषयावर ज्ञान आणि कौशल्ये प्रदान करणे हा होता. यानंतर श्रीमती कीर्ती राजगुरू (कीर्ती उद्योगाच्या संस्थापक) यांनी विद्यार्थ्यांना उद्योजक कसे व्हावे या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच महिलांना या क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रोत्साहित केले. मि.मोहम्मद सादिक हन्नुरेजी यांनी सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि आयटी उद्योजक कसे व्हावे या विषयावर आपले विचार मांडले आणि विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रात करिअर करण्याचे आवाहन केले. यावेळी डॉ.शिरीन शेख, डॉ.शाहिद जमाल अन्सारी, प्रा.जमीर सय्यद,डॉ.विनोद ,फ़ाहिम अहमद डॉ.गुलनवाज उस्मानी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.शबाना शेख, प्रा. फारुख शेख प्रा.शबिना खान, प्रा. शाहेदा अन्सारी, प्रा. स्वालेहा मुल्ला, प्रा. हिना सय्यद, प्रा. इम्रान कुरेशी, प्रा.उमर हसन इ. परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आयोजन व सुत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.बाबा शेख यांनी केले तर आभार सबलेफ्टनंट डॉ.शाकीर शेख यांनी मानले.

  • 9 मार्च पासून मराठमोळी तरूणी रमिला लटपटे निघणार जगभ्रमंतीस

    पुण्याची ख्याती जगभर पसरलेली आहे, त्यात आणखीन एक मानाचा तुरा लावण्यासाठी मराठमोळ्या वेशात नऊवारी साडी नेसून पुणेरी महिला रमिला लटपटे मोटरसायकल वरून जगभ्रमंतीसाठी 9 मार्चला निघणार असून सुमारे 365 दिवस प्रवास करून 8 मार्च 2024 रोजी पुन्हा भारतात परतणार आहे. यासंदर्भात माहिती देताना रमिला लटपटे म्हणाली की, जगभ्रमंती मध्ये 12 खंड, 20 ते 30 देशातून प्रवास करित सुमारे एक लाख किलोमीटर्सचा प्रवास पुर्ण करणार आहे. फक्त प्रवास नाही करणार तर महाराष्ट्रातील विविध बचत गटाच्यामाध्यमातून बनविण्यात आलेले विविध पदार्थांचा आणि भारतीय संस्कृतीचा प्रसार करीत महाराष्ट्राची संस्कृती प्रत्येक देशा पर्यंत पोहोचविण्याचा मानस भारताची मुलगी रमिला लटपटेचा आहे. रमा (रायजींग एबल मॅनकाईंड ऑल राऊंड) या जगभ्रमंती मोहिमेचे नियोजन केले आहे. त्यानुसार रमिला लटपटे 9 मार्च 2023 रोजी सांयकाळी 4.30 वाजता गेट-वे-ऑफ इंडिया येथून त्यांच्या भ्रमंतीच्या प्रवासाचा प्रारंभ होणार आहे. यावेळी फ्लॅग ऑफसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शंतनू नायडू, प्रसाद नगरकर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश दादा लांडगे, अश्‍विनी ताई जगताप, सुरेश भोईर आदी उपस्थित राहणार आहेत. तसेच महिला दिनाचे औचित्य साधत भारतीय महिलांमध्ये साहस, जिद्द आणि चिकाटी यावी हा संदेश देण्यासाठीच ह्या जगभ्रमंतीचा घाट घातला आहे. काही दिवसापुर्वी रमिला लटपटे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मोहिमेची माहिती दिली होती,या उपक्रमांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक ही केले होते. रमिला लटपटे या चिंचवड (पुणे) येथील निवासी आहेत. त्या अहिल्या फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेसाठी महिला व तरुणांच्या सक्षमीकरणाचे उपक्रम राबवतात.

  • राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील पोस्टर स्पर्धेचे आयोजन 205 स्पर्धकांनी घेतला सहभाग

    पुणे येथील पूना कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विज्ञान विद्याशाखा आणि आईक्यूएसी यांनी "ग्लोबल सायन्स फॉर ग्लोबल गुड" या थीमवर हायब्रीड मोडद्वारे राष्ट्रीय स्तरावरील पोस्टर स्पर्धा घेऊन हा दिवस साजरा केला. उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात शास्त्रज्ञ प्रा. राजेश गच्छे, माजी विभागप्रमुख, जैवतंत्रज्ञान विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक वृत्ती विकसित करून मानवजातीच्या भल्यासाठी संशोधन करण्याचे निर्देश दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूना कॉलेजचे प्राचार्य प्रो. डॉ. आफताब अनवर शेख यांनी आपले विचार मांडताना विद्यार्थ्यानी केलेले प्रयत्न आणि कौशल्य दाखविल्याबद्दल सहभागींना प्रोत्साहन व कौतुक केले. डॉ. इक्बाल शेख, उपप्राचार्य, विज्ञान आणि आयक्यूएसी समन्वयक यांनी आयोजन समितीला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन केले. या स्पर्धेत पुणे आणि इतर राज्यातील 205 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. 90 नोंदी ऑफलाइन पद्धतीने होत्या तर उर्वरित ऑनलाइन होत्या. डॉ. सोमनाथ वाघमारे नवरोसजी वाडिया, सहाय्यक प्राध्यापक, प्राणिशास्त्र विभाग आणि डॉ. विठ्ठल बोरकर, सहायक प्राध्यापक, रसायनशास्त्र विभाग यांनी पूना कॉलेजच्या इनडोअर स्पोर्ट्स एरिनामध्ये प्रदर्शित केलेल्या पोस्टर्सचे मूल्यमापन केले. ऑनलाइन पोस्टर सादरीकरणांना प्रो. मुशर्रफ हुसेन इलेक्ट्रॉनिक्स विभाग आणि डॉ. एफ.एम.डी. अत्तार भौतिकशास्त्र विभाग यांनी गूगल मीट प्लॅटफॉर्मद्वारे पोस्टर्सचे मूल्यमापन केले. या कार्यक्रमाचे आयोजन समन्वयक डॉ.रफिक शेख, सहसंयोजक डॉ.मोहम्मद जमीर यांनी केले.यशस्वीतेसाठी व डॉ.कलीम शेख, डॉ.शोएब शेख, डॉ.जहीर अब्बास, प्रा. वसीम शेख, प्रा. अली बांगी, डॉ.मोहसीन, डॉ.इमरान मिर्झा, प्रा. कुद्दुस, प्रा. फारुख शेख, प्रा. इम्रान कुरेशी यांनी परिश्रम केले. प्रमाणपत्रांची नोंदणी आणि वितरणाचे व्यवस्थापन प्रा. रुखसार शेख, प्रा. अल्मास भट्ट, प्रा. नबीला शेख आणि प्रा. फराह पठाण यांनी केले. रसायनशास्त्र विभागातील यूजी आणि पीजी विद्यार्थ्यांनी या टीमच्या अंतर्गत सहभागींना मार्गदर्शन आणि मदत करण्यासाठी काम केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ.आफरीन ए अहमद यांनी केले तर डॉ.कलीम शेख यांनी आभार व्यक्त केले.

  • पूना कॉलेजमध्ये "राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 -अंमलबजावणी " ह्या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या सहकार्याने पूना कॉलेज वाणिज्य विभाग, आय क्यू ए सी व हिंदी विभागाच्या संयुक्त विद्यमाने पूना कॉलेज येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंमलबजावणी विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न झाली .प्राचार्य डॉ. आफताब अनवर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रियासत पिरजादे यांनी कार्यशाळेचे आयोजन केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वाणिज्य विभागाचे भूतपुर्व विभागप्रमुख डॉ. संजय कप्तान यांनी बीजभाषण केले. त्यांनी राष्ट्रीय शिक्षा नितीचे स्वरूप, उद्दिष्टे व ती लागू करण्यासाठी येणारी आव्हाने या विषयावर आपले विचार व्यक्त केले. उदघाटन प्रसंगी प्राचार्य डॉ. आफताब अनवर शेख यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची प्रशंसा करताना संगीतले की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 एकविसाव्या शतकाची आव्हाने स्वीकारण्यास विद्यार्थ्यांना सक्षम बनवेल. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या सुवर्ण संधी उपलब्ध करून देतील. पूना कॉलेज वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. नसरीन खान यांनी प्रास्ताविक केले. मुख्य वक्ता डॉ. रज़िया बेगम, चेन्नई, मौलाना आजाद नेशनल उर्दू यूनिवर्सिटी हैदराबादचे डॉ. पठान रहीम, डॉ. मुश्ताक पटेल, डॉ. सुरेखा मंगलगी, बेंगलुरु यांनी आपले विचार व्यक्त केले. उदघाटन सत्राचे संचालन डॉ. वाफिया वहिद यांनी तर आभार सब लेफ्टनेंट डॉ. मोहम्मद शाकिर शेख यांनी केले. प्रथम सत्राची अध्यक्षता डॉ. पठान रहीम खान, हैदराबाद यांनी केली. भेन्डा मैसूर येथून आलेल्या डॉ. शाफिया फरहीन, डॉ.प्रिया ए., केरल तसेच प्रा. अथिरा, बैंगलरु यांनी विषय प्रस्तुती केली. समापन सत्रामध्ये डॉ. अंजली आलेकर, मुंबई, डॉ. किन्नरी ठक्कर, मुंबई यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 शी संबंधीत सर्व सभी शंकांचे नि रसन केले. समापन सत्राचे संचालन डॉ. वाफिया वहिद यांनी तर आभार डॉ. बाबा शेख यांनी मानले. या प्रसंगी डॉ नागनाथ भेंडे, कलबुर्गी , डॉ. शकिला मुल्ला, उप प्राचार्या सरिता गोयल, प्राचार्या उज्वला पिंगले, संगीता रॉय, आरती देशपांडे, तुर्कमेनिस्तान ची विद्यार्थिनी सुरय्या, सुरेखा आवटे, लक्ष्मी छाया उपस्थित होते. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉ. हामेद हाशमी, डॉ.इरम खान, डॉ. रिज़्वान सैय्यद, डॉ. अकबर सैय्यद, मिस फायेज़ा शेख, डॉ. एम. फाज़िल शरीफ़, मिस मुबिना शेख, प्रा. सईद इनामदार यांनी परिश्रम घेतले.

  • हेरिटेज इंटरनॅशनल स्कूल ही झाली महाराष्ट्रातील पहिली ग्रामीण अंतराळ शिक्षण प्रयोगशाळा

    प्रा.डॉ. प्रतिक मुणगेकर यांच्या नेतृत्वाखाली शनिवार, १८ फेब्रुवारी २०२३ रोजी हेरिटेज इंटरनॅशनल स्कूल आणि व्योमिका स्पेस अकॅडमी यांच्यात महाराष्ट्रातील पहिली अंतराळ शिक्षण प्रयोगशाळा ग्रामीण भागात उभारण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. व्हीएसए आणि इस्रो स्पेस ट्युटर प्रोग्रामच्या वतीने गोविंद यादव आणि डॉ.प्रतिक मुणगेकर सर आणि श्री. कृष्णा भिलारे (संस्थापक अध्यक्ष), सौ. संगीता भिलारे (सचिव), श्री. कुणाल भिलारे (संचालक), सौ. यशस्विनी भिलारे (प्रशासकीय व्यवस्थापिका), सौ. रेणू पाटील ( प्राचार्या) या स्वाक्षरी समारंभासाठी उपस्थित होते. डॉ. प्रतिक यांच्या मते, शिक्षणामुळे सामाजिक गतिशीलतेचे पर्याय विस्तृत होतात, आर्थिक संभावना सुधारतात आणि महिला आणि तरुण मुलींना सक्षम बनवते. दुर्गम आणि ग्रामीण समुदायांना ऐतिहासिकदृष्ट्या शिक्षणात प्रवेश मिळण्यात अडचणी येत असताना, उडणारे ड्रोन आणि आरसी विमान, 3D प्रिंटिंग आणि CAD मॉडेलिंग, रोबोटिक्स आणि कोडिंग, आभासी वास्तविकता आणि गेमिफिकेशन आणि STEM शिक्षण यासारख्या अवकाश-आधारित तंत्रज्ञानामुळे या समुदायांच्या शैक्षणिक संधींमध्ये या अंतराळ शिक्षण प्रयोगशालेमूले परिवर्तन होईल. अंतराळ हे केवळ कार्यक्रमांच्या वितरण व प्रक्षेपण करण्यात मदत करत नाही तर विद्यार्थ्यांना प्रेरणा देखील देते. अवकाश-संबंधित वर्ग वारंवार विद्यार्थ्यांची आवड आणि कल्पकता वाढवतात आणि पुरुष आणि महिला दोघांनाही विज्ञानात करिअर करण्यासाठी प्रेरित करतात. श्री.कुणाल भिलारे यांनी व्यक्त केले की ही स्पेस स्कूल गेमिफिकिंग स्पेस एज्युकेशन आणि लर्निंगवर भर देईल. अंतराळवीर, खगोलभौतिकशास्त्रज्ञ, अंतराळ शास्त्रज्ञ आणि एरोस्पेस अभियंते यांची जगातील पुढची पिढी विकसित करणे हे आमचे ध्येय आहे. महाराष्ट्रातील पहिली ग्रामीण अंतराळ शिक्षण प्रयोगशाळा उघडताना आम्हाला आनंद होत आहे, जी आता पुण्यातील मुळशी तहसीलमधील एका छोट्याशा गावातील शाळेत वैश्विक कृतीसाठी तयार आहे. व्योमिका स्पेस अकादमी आणि हेरिटेज इंटरनॅशनल स्कूल ISRO CBPO सोबत मुलांना रॉकेट प्रक्षेपित करणे, दुर्बिणीद्वारे सौर यंत्रणा पाहणे, यंत्रमानव तयार करणे आणि विमान उडवणे यामध्ये मदत करतील. रेणू पाटील (मुख्याध्यापिका) यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व शाळांना या प्रयोगशाळेला भेट देऊन अवकाश, विमान वाहतूक आणि उपग्रहांबद्दल अधिक अभ्यास करता येईल. सौ.यशस्विनी भिलारे यांनी डॉ.गोविंद यादव आणि डॉ.प्रतिक मुणगेकर सर यांचे समर्थन आणि प्रेरणा दिल्याबद्दल विशेष आभार मानले. इस्रोचे शास्त्रज्ञ डॉ. टी. एन. सुरेशकुमार सर यांनी सर्वांचे अक्षरशः कौतुक केले आणि या प्रयोगशाळांच्या मदतीने भारताचे भविष्य उज्ज्वल होईल असे भाकीत केले. या अनमोल स्वाक्षरी कार्यक्रमासाठी हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलमधील शिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी उपस्थित होते. व्हिजनरी कृष्णा भिलारे आणि संगीता भिलारे यांनी सांगितले की, हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलमधील आमच्या सर्व विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण आणि योग्य पद्धतीने शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

  • पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इंग्लिश मीडियम स्कूल आकुर्डी येथे वाचन स्पर्धा संपन्न

    पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इंग्लिश मीडियम स्कूल आकुर्डी, या विद्यालयामध्ये इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पी. डी. इ. ए. इंग्लिश मीडियम स्कूल आकुर्डी व ज्ञान प्रबोधिनी स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या स्पर्धेसाठी मार्गदर्शक व प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष आदरणीय श्री. राजन लाखे हे मान्यवर म्हणून लाभले होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आली. विद्यालयाच्या प्राचार्या प्रिती दबडे यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे श्री. राजन लाखे सरांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व व वाचन कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले. या स्पर्धेचेे आयोजन प्राची कुलकर्णी यांनी केले होते. या वाचन स्पर्धेत अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धा दोन गटांमध्ये घेण्यात आली. पहिला गट पाचवी ते सातवी व दुसरा गट आठवी ते नववी असा होता. त्यामधून प्रत्येकी तीन क्रमांक काढण्यात आले. पाचवी ते सातवी या गटामधून, पी.डी.इ.ए. इंग्लिश मीडियम स्कूलमधील आराध्य कुलकर्णी (इयत्ता ५ वी) व रुद्र कदम (इयत्ता ७ वी) या विद्यार्थ्यांनी यश मिळवले व इयत्ता आठवी ते नववी या गटातून स्वानंदी वनमाने (इयत्ता ८ वी) व अर्चिता ढोले (इयत्ता ९ वी) या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. स्पर्धेचे परीक्षण महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष विनिताताई अयानपुरे आणि संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ. रजनी सेठ यांनी केले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना तसेच विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे प्रमाणपत्र देण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी या हेतूने विद्यालयाच्या प्राचार्या प्रिती दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे नियोजन यशस्वीरित्या करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता रासकर यांनी केले तर आभार प्रदर्शन किरण जोशी या सरांनी केले.

  • ग्रामीण समाजाच्या विकासाकडे-डॉ. प्रतिक मुणगेकर

    भंडारी समाज असोसिएशन बोर्ली पंचतन, श्रीवर्धन-रायगड यांच्या वतीने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, या व्याख्यानात प्रमुख पाहुणे डॉ.प्रतिक राजन मुणगेकर होते तर मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या शिबिरासाठी श्री मोहनलाल सोनी विद्यालय व श्री नानासाहेब कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय बोर्ली पंचतन, पीएनपी माध्यमिक विद्यालय वडवली, न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल शिस्ते, रा.पा.दिवेकर दांडगुरी हायस्कूल, वि गो लिमये विद्यामंदिर दिवे आगार , न्यू इंग्लिश स्कूल भरडखोल, आडगाव हायस्कूल येथील विद्यार्थी सहभागी झाले होते. शाळा आडगाव, ए.ई.अंतुले हायस्कूल दिघी उपस्थित होते. श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतनच्या भंडारी समाज संघटनेच्या वतीने बोर्ली पंचतन येथील रवींद्र नारायण कुलकर्णी सभागृहात या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. जनता शिक्षण संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष रवींद्र कुलकर्णी, संचालक मंडळ उपाध्यक्ष नंदू पाटील, सचिव चंद्रकांत धनावडे, खजिनदार निवास सोनकर, सदस्य शामकांत भोकरे, अनंत धनवेडा, श्रीराम तोडणकर, अखिल भारतीय भंडारी समाज जिल्हा संपर्क प्रमुख सुधाकर पाटील, तालुका अध्यक्ष विष्णू पाटील, कोषाध्यक्ष श्री. शिलकर, चिंचबादेवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुजित पाटील, जामस समाजाचे अध्यक्ष रणजित मुरकर, मनसे उपजिल्हाप्रमुख बोर्ली पंचतन भंडारी समाजाचे अध्यक्ष मंदार तोडणकर, उपाध्यक्ष निशिकांत रिलकर, सचिव शंकर मयेकर, मावळते अध्यक्ष प्रकाश पाटील, माजी उपाध्यक्ष दीपक काळदेवकर, अरुण तोंडलेकर आदी उपस्थित होते. माजी सचिव अभिजित मुकादम, खोती प्रमुख लीलाधर खोत, प्रकाश तोंडलेकर, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, समाजातील सदस्य तसेच श्री मोहनलाल सोनी विद्यालय व श्री नानासाहेब कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय बोर्ली पंचतन, पीएनपी माध्यमिक विद्यालय वडवली, न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल शिस्त, रिझर्व्ह डॉ.दिवेकर दांडगुरी हायस्कूल, व्ही.गो लिमये विद्यामंदिर दिवेआगर, न्यू इंग्लिश स्कूल भरडखोल, आडगाव हायस्कूल आडगाव, ए.ई.अंतुले हायस्कूल दिघी येथील विद्यार्थी उपस्थित होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी करिअरची तयारी हे आव्हान आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची कॉलेजसाठी तयारी कमी होण्यास अनेक घटक कारणीभूत आहेत. त्यांच्या लहान बजेटमुळे, ग्रामीण शाळा पात्र शिक्षकांना आकर्षित करू शकत नाहीत आणि त्यांना कायम ठेवू शकत नाहीत किंवा विद्यार्थ्यांना प्रगत अभ्यासक्रम प्रदान करू शकत नाहीत. शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना करिअर शोध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याच्या कमी संधी आहेत, ज्यांना सामान्यतः करिअर तयारीसाठी सर्वात प्रभावी पद्धत मानली जाते. ग्रामीण विद्यार्थी त्यांच्या समुदायाच्या वेगळ्या स्थानांमुळे त्यांना विविध व्यवसायांमध्ये (जसे की विविध कामाच्या सेटिंग्जसाठी फील्ड ट्रिप) उघड करतील अशा क्रियाकलापांमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत. करिअर एक्सप्लोरेशन अ‍ॅक्टिव्हिटींव्यतिरिक्त, पदवीनंतरच्या विद्यार्थ्यांच्या गृहजीवनाचा त्यांच्या परिणामांवर महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो. ग्रामीण भागातील अर्ध्याहून अधिक विद्यार्थ्यांचे पालक आहेत ज्यांना त्यांनी महाविद्यालयात जावे किंवा पदवी प्राप्त करावी अशी अपेक्षा असते आणि यापैकी बरेच पालक चांगल्या आर्थिक संधींच्या शोधात त्यांच्या मुलांना त्यांच्या घरच्या समुदायापासून दूर जाण्यास प्रोत्साहित करतात. तथापि, ग्रामीण भागातील पालकांचे महाविद्यालयीन पदवीचे प्रमाण तुलनेने कमी आहे ही वस्तुस्थिती त्यांना महाविद्यालयांच्या अर्ज प्रक्रियेशी कमी परिचित करते आणि परिणामी, त्यांच्या मुलांना सर्वसमावेशक महाविद्यालयीन माहिती प्रदान करण्याची शक्यता कमी होते. ग्रामीण भागातील करिअर समुपदेशन आणि अडथळे ग्रामीण शाळांमधील समुपदेशक विद्यार्थ्यांच्या करिअरच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात कारण त्यांना विविध अडथळ्यांचा सामना करावा लागतो. अनेक अभ्यासांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च माध्यमिक शाळेनंतरच्या कारकीर्दीबद्दल आणि शैक्षणिक पर्यायांबद्दल शिक्षित करण्यात समुपदेशकांच्या महत्त्वाकडे लक्ष वेधले आहे. एका अभ्यासात असे आढळून आले आहे की चार वर्षांच्या महाविद्यालयीन नोंदणीमध्ये 10 टक्के गुणांची वाढ एका शाळेतील एका अतिरिक्त समुपदेशकाच्या उपस्थितीशी संबंधित आहे. ज्या विद्यार्थ्यांचे पालक माध्यमिक शिक्षणाच्या मार्गांबद्दल अपरिचित आहेत त्यांना विशेषतः समुपदेशकांची आवश्यकता असते. ग्रामीण शाळांच्या आर्थिक अडचणींमुळे शाळांना करिअर समुपदेशक ठेवणे कठीण होते जे शिक्षकांप्रमाणेच विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक गरजांसाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित करतात. ग्रामीण भागातील समुपदेशक वारंवार अनेक शाळांच्या गरजा व्यवस्थापित करतात. परिणामी, कोणत्याही कॅम्पसमध्ये त्यांची भौतिक उपस्थिती सामान्यत: मर्यादित असते. ग्रामीण शाळांमध्ये, समुपदेशक अतिरिक्त जबाबदाऱ्या देखील घेऊ शकतात आणि करिअर मार्गदर्शनासाठी त्यांच्या विद्यार्थ्यांना आवश्यकतेपेक्षा कमी वेळ देऊ शकतात. दैनंदिन अडथळ्यांव्यतिरिक्त ग्रामीण शाळा शहरी शाळांपेक्षा कमी अनुभवी समुपदेशकांना नियुक्त करतात याचा पुरावा आहे. ग्रामीण शाळांची वेगळी ठिकाणे, निधीच्या कमतरतेव्यतिरिक्त, ग्रामीण समुपदेशकांना प्रशिक्षणाच्या संधींमध्ये भाग घेण्यापासून आणि विद्यार्थ्यांच्या करिअरच्या विकासासाठी आवश्यक करिअर हस्तक्षेप कौशल्ये विकसित करण्यापासून रोखतात. तथापि, ग्रामीण समुपदेशकांमध्ये कल्पना सामायिक केल्याने त्यांना व्यावसायिक प्रगती करण्यास मदत होऊ शकते. समुपदेशकांना भेडसावणाऱ्या आर्थिक आव्हानांच्या प्रकाशात शाळा आणि समुदाय यांच्यातील अनुकरणीय भागीदारी शाळा आणि समुदाय यांच्यातील अनुकरणीय भागीदारी ग्रामीण भागातील समुपदेशकांना भेडसावणाऱ्या आर्थिक आव्हानांच्या प्रकाशात, या क्षेत्रात अतिरिक्त निधीची गरज आहे. जर बजेट वाढले तर ग्रामीण भागातील शाळा अनुभव आणि पूर्णवेळ रोजगार असलेले अधिक समुपदेशक नियुक्त करू शकतील. तथापि, खाजगी आणि ना-नफा क्षेत्रांमधील सामुदायिक भागीदारी थेट निधी वाढीव्यतिरिक्त ग्रामीण विद्यार्थ्यांच्या करिअर विकासाच्या गरजा पूर्ण करण्याचा एक मार्ग असू शकतो. ग्रामीण समाजाच्या विकासाच्या दिशेने ग्रामीण शाळांमध्ये समुपदेशक किंवा सामुदायिक भागीदारीद्वारे करिअर समुपदेशनासाठी प्रवेश असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ केल्याने महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या आणि पदवीधर होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होऊ शकते. तथापि, ग्रामीण भागातील ब्रेन ड्रेनची तीव्रता हा महाविद्यालयीन नोंदणी वाढविण्याचा अनपेक्षित परिणाम असू शकतो. 2015 आणि 2022 दरम्यान, शहरी भागात तरुण लोकांच्या "ग्रामीण उड्डाण" मुळे 1,300 पेक्षा जास्त ग्रामीण भागातील लोकसंख्या कमी झाली. किती किंवा कोणत्या प्रकारचे शिक्षण "खूप जास्त" आहे या मुद्द्याशी ग्रामीण समुदाय संघर्ष करत असला तरीही, ग्रामीण भागातील अनेक तरुण त्यांच्या मजबूत कौटुंबिक आणि समुदाय संबंधांमुळे मागे खेचले जातात. देशभरात, महाविद्यालयीन पदवीधरांचे परतणे ग्रामीण समुदायांना त्यांचे मानवी भांडवल वाढवून आणि अर्थव्यवस्थेला चालना देऊन टिकवून ठेवण्यास आणि पुनरुज्जीवन करण्यास मदत करेल.

  • 75 वर्षानंतर ,भारतीय प्रजासत्ताकीय शिक्षण-अनिल लिमये

    स नः 1818 मध्ये पेशवाई संपली होती. स.न. 1774 मधेच इंग्रजांनी बंगालमध्ये पाय स्थिर केले होते तिथे मेकॉलेच्या आधीच इंग्रजी भाषेकडे शिक्षित लोक वळायला लागले होते. अहो आत्ता सुद्धा मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडत आहेत आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळात प्रवेश मिळणे अवघड आणि खर्चिक होत आहे. मेकॉलेच्या डोक्यावर खापर फोडत असताता हे वास्तव सुद्धा लक्षात घेणे आवश्यक आहे. असो 150 ते 200 वर्षे चालत आलेल्या शिक्षण पद्धतीत शिक्षण घेतलेले आपण सगळे घटक आहोत. वाडवडिलांकडुन ऐकलेल्या गोष्टीचा विचार केला तर त्या काळी शिक्षणाचा दर्जा खुपच उच्च होता अस वाटावं अशी वास्तविकता आहे, वाडवडिलांकडुन ऐकलेल्या गोष्टी म्हणताना एक गंमत मांडावीशी वाटते. माझ्या वडिलांचा जन्म स.न.1897 मधला. आजोबा आंग्लविद्याविभूषित होते तेव्हापासून माझ्या नातवांपर्यंत एखादं दुसरा अपवाद सर्व पदवीधरांच्या पंगतीतले. असो तो मुद्दाच नाही त्यांच्या काळात मला वाटत सर्व भाषा व्याकरण, वाड्मय सर्वच उच्च दर्जाचं होतं . शिक्षित घरात शेले, कीट्स , बायरन, केशवसुत, भा . रा. तांबे, अनंत फंदी, राम जोशी, आननाभाऊ साठे ,तुकाराम महाराज. ही नावे कानावर पडत. अगदी परीक्षेच्या भाषेत मराठी, इंग्रजी, संस्कृत या उच्च दर्जाच्या म्हणाव्यात अशा पातळीच्या भाषा सक्तीच्या असत 100 गुणांच्या. संस्कृत, इंग्रजीमध्ये भाषांतरीत करावा लागे ,सातवी पर्यंतच सर्व अंकगणित आत्मसात करावा लागे ,अर्थात त्यावेळेस शिक्षण क्लास एज्युकेशन असे साक्षरतेचे प्रमाणही अत्यल्प असे आणि या बरोबरच पुस्तकी विद्याच खरी असा भाव नव्हता . परंपरागत ज्ञानाला मान्यता समाजात होती. वैदयाकडुन लोक उपचार घेत असत अगदी सन 1980 मधल्या एका सर्व्हे मध्ये 70% भारतीय जनता आयुर्वेदिक औषधे वापरतात अशी माहीती पुढे आली होती. तरी पण जे त्त्या राज्यकर्त्यांती हतबल करण्यासाठी अनेक गोष्टी केल्या. जहाज बांधणी संपवली ,मृत्यु प्रमाणपत्र देण्याच्या बंधनावरून वैदयकी संपवलं. अनेक गोष्टी. या सगळ्या प्रकारातून इंग्रजी शिकलेल्यांना मानसन्मान मिळू लागला प्रमाणपत्राशिवाय सरकारी नोकरी नाही या सर्वातून प्रमाणपत्राची किंमत वाढत गेली. अजुनही ज्ञानमहात्म्याची धुगधुगी होती कोल्हापूरला वाय. पी पवार नगर आहे ज्यांच्या नावाने ही औद्योगिक कॉलनी ओळखली जाते ते पदवीधर इंजीनियर नव्हते. तरी किर्लोस्कर वाडीत ऑइल इंजिन तयार करण्याच्या कारखान्यात त्यांचा मोठा मान होता. आणखी एक गमतीदार अनुभव मला कागदाचे गोल कापण्यासाठी लोखंडाचा साचा करून, दार लावुन, पाणी लावायला- हार्डनिंग करायला नेला. "घिसाडी म्हणाला पाणी लागणार नाही लगेच मुंढ होईल’ विचारल कशावरून तर म्हणतो आम्हाला बघितल्यावर आणि हातात घेतल्यावर कळतं, विश्वास बसण अवघड होत `चालेल म्हटल लाव पाणी काय होईल ते पाहु,’ त्यांनी पाणी लावलं आणि एका ऑपरेशन मध्येच ते मोल्ड झाल .ते घेऊन इंजिनियरिंग कॉलेजच्या मेटॉलर्जी विभागात गेलो. आणि विचारल हार्डनिंग होत का नाही हे कस ओळखायच? तर उत्तर साध होत विकत घेत असतांना पावती वर स्टील चा नंबर असतो त्यावरून गुणधर्म पाहता येतात ,मी तर तो तुकडा भंगार मधुन आणला होता सगळच अवघड.. माझा एक मामा इ.स. 1912-13 मधला त्याचा जन्म असेल तो अँग्रीकल्चरल ऑफिसर होता. त्याचा अनुभव सांगत असतांना तो म्हणाला शेतकऱ्यांचा आमच्यावर विश्वास नसतो" आणि त्याने शेतकऱ्यांच्या मधला प्रचलित विनोद सांगितला. तो असा ... एका शेतकऱ्याचा मुलगा शहरात राहुन शाळा शिकत होता पुढे अँग्रीकल्चरल कॉलेज मध्ये गेला .सुट्टीला गावी आल्यावर आपल्या ज्ञानाच प्रदर्शन करत होता. बाप एका रोपाची काही निगराणी करीत होता मुलगा म्हणाला - "अस करू नका त्यामुळे आंबे उशिरा लागतील, ‘शेतक-याने विचारल म्हणजे’ मुलांनी सल्ला दिला ..तु म्हणतोस तस केलं तरी कधीच आंबे लागणार नाहीत कारण ते झाड आंब्याच नाहीच ….. पण इंदिरा गांधीनी हे सर्वच बदलल विश्वविद्यालयातील विद्वानांना आयव्हरी टॉवर सोडुन शेतकऱ्यांपर्यंत पोहचा अस सांगितलं. राजकीय इच्छाक्तीची कळ फिरली हरीतक्रांती झाली सन 1955, 1956, 1957 ओळीने तीन वर्षे उत्तम पाऊसपाणी होऊन चांगले पीक येऊन आपल्या गरजेपेक्षा 5% धान्य उत्पादन कमी होते. ते आता आम्ही धान्य निर्यातदार झालो आहोत. सुरुवातीच्या काळात आम्ही चाळीस कोटीच होतो आता ऐक्शे चाळीस कोटी असुन सु‌द्धा आम्ही निर्यातदार आहोत. असा चमत्कार घडला. ब्रिटीश काळात सुद्धा मान्यताप्राप्त शाळांना सरकारी अनुदान मिळायची. स्वातंत्र्य मिळाल्यावरतर काही काळ शाळा काढणे, शिक्षण प्रसार करणे ,घरोघरी जाऊन मुलांना शाळेत घालण्यासाठी पालकांना प्रवृत्त करण हे कार्यक्रम असत. सर्व राजकीय पक्ष त्यात भागीदारी करत यातून क्लास एज्युकेशन वरून मास एज्युकेशनकडे वाटचाल सुरू झाली .घंटा झाल्यावर मुल येऊन बसू लागली हे मोठ यश वाटत असे. यामुळे काही धुरिणांनी या अवस्थेला घाई वाटेल असे प्रसंग घडायचे ज्यांना अनेक पिढयात शालेय शिक्षणाचा संस्कार नसलेले पालक आपल्या मुलांना शाळेत आणून सांगत " गुरुजी माझ्या मुलाला त्यानी ऐकलं नाही तर बुटानं मारा पण शिकवा’ हळूहळू तात्यापंतोजी सारखं छडी आणि धोकपटी जाऊन तर्क विचार, समज याला प्राधान्य यायला लागल .कर्मवीर भाऊराव पाटील यांनी यासंदर्भात महाराष्ट्रचा मानसिक पोत बद‌लुन खुप वरच्या पातळीवर आणला अस म्हणणं वास्तवापासून दूर जाणं नसेल. यातच मधुकर राव चौधरी यांनी शिक्षण मंत्री असताना महाराष्ट्र असेंबली मध्ये शिक्षणाबद्दल श्वेततपत्रिका मांडली. 10+2+3 ही पद्धती आणली. पाठयक्रम बदलला गणित आणि विज्ञानाला महत्त्व दिलं. दहावी एस एस सी ला गणिताचे दोन पेपर, विज्ञानाचे तीन पेपर आणि तीन पात्यक्षिकांच्या परीक्षा, समाजशास्त्राचे दोन पेपर आणि भाषांचे पेपर अस परीक्षांच स्वरूप झालं. संचसंकल्पनांवर आधारलेल्या तर्काला आणि आकलनाला प्राधान्य देणारे गणित आणि शास्त्र आणले. आठवीपासून अँडव्हान्सड (A) आणि ओर्डिनरी (0) असे स्तर केले ज्यांना पुढे विशेष शिक्षण घ्यायच आहे त्यांनी A स्तर घ्यावा आणि ज्यांना SSC नंतर नोकरी व्यवसायाला जायच आहे त्यांनी 0 स्तर घ्यावा अस सुचवलं. इथपासून घटनाक्रमाची दिशाच बदलुन गेली (A) आणि (O) वर असेंब्लीमध्ये प्रचंड टिका झाली मागच्य दरवाज्यात ब्राम्हणी राज्य आणण्याचा हा प्रयत्न आहे . (A) ला केवळ ब्राम्हण मुल जातील आणि आम्हा सामान्यांनी (O) ला जातील वैगेरे वैगेरे . या गुऱ्हाळातून (0) चा पर्यायच काढून टाकला सगळेच प्रगत अवस्थेला आणले पण ते सगळ्यांना झेपेल असं पण एक एक अवघड वाटलेली प्रकरणं भाग कमी करण सुरूझालं. मार्च 1975 मध्ये पहीली दहावी SSC परीक्षा झाली. त्यातसुद्धा गणिताच्या छापित क्रमिक पुस्तकातील तीन चार प्रकरणे अभ्यासक्रमातुन काढून टाकली मग पाळी आली परीक्षेतल्या प्रश्नांच्या काठिण्य पातळीची’ सामान्य विद्यार्थ्यांना उत्तर देता येईल याचा विचार करून काठिण्य पातळी आणि प्रश्नांची रचना ठरू लागली. म्हणजे घडल काय तर शिक्षणाचा दर्जा ठरवून विदयार्थ्याना त्या पातळीवर आणणं हे थांबल आणि शिक्षणाची दर्जापातळी ,परीक्षेची काठिण्यपातळी ,पश्नरचना विद्यार्थ्याना आवडेल त्या पातळीवर आनण्याची क्रिया सुरू झाली .एकप्रकारे लोकांना सुखावून खुश करून सुरु दर्जेदार शिक्षण घेतल्याच्या भ्रमात ठेवन्याचा धूर्तपणा सुरू झाला . त्याचा परिपाक शिक्षणाचं खाजगीकरण स्वायत्त विद्यापीठ असा झाला. एका रात्रीत बसल्या बैठकीत शिक्षण सम्राटांना २०० आणि ३०० कॉलेजेसना मंजुरी दिली गेली पदव्या महाग झाल्या तरी सहज उपलब्ध झाल्या . कॉपी, सामुहीक कॉपी करू दिली नाही म्हणून गावांनी परीक्षा केंद्रावर हल्ला करणं आणि यावर बातमी येण्यापलिकडे काही कारवाई न होणं यात काही नाविन्य राहील नाही. बहुधा समाजाची सांस्कृतिक पातळी आणि मानसिकता तसेच सत्ताधाऱ्यांची राजकीय इच्छाशक्ती या सर्वावर शिक्षणाची पातळी अवलंबुन असते. अशाही परिस्थितीत इच्छुक मार्ग काढातच असतात. “इथे माझे दोन अनुभव नोंद करतो आणि थांबतो.” 1960 च्या दशकात ठाण्याच्या बेडेकर हायस्कुल मध्ये मी शिकवीत असे तिथे प्रयोगशाळा छान होती त्यात मला अंडरस्टँडीग सायन्स आणि नॉलेज च्या अंकांच्या फाईल्स मिळाल्या उत्तम गोटीव कागदावर त्रिमितीक वाटव्यात अशा आकृत्या आणि सोप्या इंग्रजीमध्ये निरुपण मी तर हरखुनच गेलो. त्याच रूपांतर मराठीत करून त्या आकृत्यासह काचफलकात प्रदर्शित करू लागलो अर्थात श्याम फडके त्या वेळचे मुख्याध्यापक यांचंत्याला प्रोत्साहनच होतं. सहामाही परीक्षेच्या वेळेस मुलांशी संवाद साधल्यावर 2000 पैकी तीस चाळीस मुलांनी ते पाहिलं होत आणि वीसेक मुलांनी वाचलं होत मी वैतागलो आणि सोडुन दिलं. दिवाळीच्या सुट्टीनंतर दोन तीन आठवड्यांनी सर टीचर्स रूम मध्ये येऊन म्हणाले," काय हो लिमये , तुमची काचफलकाची फसफस निघाली का?, अहो काही प्रतिसाद नाही .दोन-चार मुलं मला वाक्य पूर्ण करू देता लगेच केबिनमध्ये या म्हणाले ‘ तिथे गेल्यानंतर माझ म्हणणं सांगितल्यावर ते उभे राहीले आणि माझ त्यांनी अभिनंदन केले. 1% मुलांनी ते वाचल आणि बघितल मिशन सक्सेसफुल याच मुलांना गरज असते ती भागवली गेली बाकीचे सगळे अल्सो रॅन एक दोन टक्केच साधनेचा नाद वाहता ठेवता ठेवतील पण दुसरी आठवण ऐकवतो ,1968-69 सालचा व्हीएतनाम युद्ध जोरात सुरू होत मॉस्को मध्ये पैट्रिस लुमुंबा विद्यापीठामध्ये मध्ये काही व्हिएतनामी विद्यार्थी होते. त्यांना युद्धामुळे सरकार ज्यादा स्कॉलरशिप देत असे त्यांच्याकडे थोडे ज्यादा पैसे असत. भारतीय विद्यार्थी तंगीत असत पण त्यांच्याकडे ट्रान्झिस्टर वैगेरे असे. मग ते व्हिएतनामी विद्यार्थ्यांना विकत. ही गोष्ट त्यांच्या पॉलिटिकल कमिशनरच्या लक्षात आली. ती हेडक्वार्टस लां कळवली मुलांना परत बोलावुन घेतल गेल त्या मुलांना युद्ध सीमांवर हिंडवून आणल आपली जनता कशी लढत आहे हे दाखवलंआणि सांगितल, तुम्हाला ज्यादा स्कॉलरशीप, उत्तम खाणं ,उत्तम अभ्यास आणि उत्तम तब्येतीसाठी आहे येऊन तुम्हाला लढायचं आहे. तिथुन परत आल्यावर या सगळ्या विदयार्थ्यांनी करमणुकीची साधन परत केली कित्येकांना त्याने पैसे परत मिळाले नाहीत भारतीयांकडुन ते खर्च झाले होते. त्याबद्दल यांची तक्रार नव्हती. त्यांची ती सामाजिक बांधिलकी होती. कधीतरी आमचेही विद्यार्थी सामाजिक बांधिलकी म्हणून ज्ञानसाधना करत असतील अशी आशा व्यक्त करून थांबतो.

  • हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलमध्ये व्यवसाय समुपदेशन सत्र

    डॉ. प्रतीक मुणगेकर सरांना हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलमध्ये व्यवसाय समुपदेशन सत्रासाठी संसाधन व्यक्ती म्हणून आमंत्रित केले होते आणि परदेशातील अभ्यासाविषयी माहिती देण्यासाठी आणि शैक्षणिक क्षेत्रातील संधी जाणून घेण्यासाठी आमंत्रित केले होते. डॉ. प्रतीक सध्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात आणि भविष्यातील करिअरमध्ये मदत करण्याच्या मिशनवर कार्यरत आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील योजनांसाठी मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांना सांगितले की त्यांनी आयुष्यभर शिकत राहिले पाहिजे,, सराव आणि उजळणी करावी, लक्ष केंद्रित करावे, ध्येय साध्य करण्यासाठी मोठी स्वप्ने पाहण्यास सुरुवात करावी, गुरुंचा आदर करावा, अधिक जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारावे, जिज्ञासू व्हावे आणि तुमच्या कामात किंवा अभ्यासातही सातत्य ठेवा. डॉ.दीपाली शिरगावे यांनाही विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी आमंत्रित केले होते. त्या विद्यार्थांना संबोधित करताना म्हणाल्या,,, " विद्यार्थ्यांनो, तुमची ही पिढी टेक्नोसॅव्ही आहे. अशक्य ते शक्य करण्याची ताकद तुमच्यात आहे. परीक्षेचा ताण घेऊ नका. अभ्यासातील सातत्य जास्त महत्त्वाचं आहे. तुमच्या स्वप्नांची रोज जोपासना करा. एक मजबूत स्वप्न तुम्हाला धाडसी निर्णय घेण्यास बळ देईल..संकल्पना शिक्षणावर लक्ष केंद्रित करा..नुसते पाठांतर टाळा.आपला भारत आर्थिकदृष्ट्या वेगाने विकसित होत आहे. आम्ही जगभरात अव्वल आहोत. आपली आर्थिक वाढ ६.६ आहे. तुम्ही भावी पिढी आहात म्हणून तुमच्या आवडीचे अनुसरण करा, यश आपोआप तुमच्या मागे येईल. डॉ प्रतीक तुमच्यासाठी एक आदर्श आहे. त्यांनी तुम्हाला ज्या प्रकारे मार्गदर्शन केले ते उत्कृष्ट होते. समुपदेशन सत्रासाठी मला अतिथी म्हणून आमंत्रित केल्याबद्दल टीम हेरिटेज, भिलारे कुटुंब आणि प्रिय रेणू मॅडम यांचे मी मनापासून आभार मानते.. तुमच्या उदार आदरातिथ्यासाठी मी नम्र आहे." माननीय व्यवस्थापन श्री.कृष्णा भिलारे (संस्थापक, अध्यक्ष), सौ. संगीता भिलारे (सचिव), श्री. कुणाल भिलारे (संचालक), सौ. यशस्विनी भिलारे (प्रशासकीय व्यवस्थापिका) यांनी डॉ. प्रतीक सरांच्या #onamissiontohelpstudents साठी शुभेच्छा दिल्या. प्राचार्या सौ. रेणू पाटील आणि त्यांच्या कर्मचार्यांनी डॉ. प्रतीक यांचे संपूर्णपणे उत्साहने भरलेले आणि सर्वात आकर्षक सत्र दिल्याबद्दल आभार मानले. ज्यामध्ये सरांचे बोलणे अतिशय तीव्रतेने मनाला भिडणारे होते आणि त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वामुळे आणि त्यांच्या ज्ञान आणि यशामुळे विद्यार्थ्यांना ते खूप भावले

9561398225

  • Facebook
  • Instagram

©2021 by Stay Featured. Proudly Created by Buzzer Media & Advertising

bottom of page