top of page
Writer's pictureTeam Stay Featured

75 वर्षानंतर ,भारतीय प्रजासत्ताकीय शिक्षण-अनिल लिमये

स नः 1818 मध्ये पेशवाई संपली होती. स.न. 1774 मधेच इंग्रजांनी बंगालमध्ये पाय स्थिर केले होते तिथे मेकॉलेच्या आधीच इंग्रजी भाषेकडे शिक्षित लोक वळायला लागले होते. अहो आत्ता सुद्धा मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडत आहेत आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळात प्रवेश मिळणे अवघड आणि खर्चिक होत आहे. मेकॉलेच्या डोक्यावर खापर फोडत असताता हे वास्तव सुद्धा लक्षात घेणे आवश्यक आहे. असो 150 ते 200 वर्षे चालत आलेल्या शिक्षण पद्धतीत शिक्षण घेतलेले आपण सगळे घटक आहोत.

वाडवडिलांकडुन ऐकलेल्या गोष्टीचा विचार केला तर त्या काळी शिक्षणाचा दर्जा खुपच उच्च होता अस वाटावं अशी वास्तविकता आहे, वाडवडिलांकडुन ऐकलेल्या गोष्टी म्हणताना एक गंमत मांडावीशी वाटते. माझ्या वडिलांचा जन्म स.न.1897 मधला. आजोबा आंग्लविद्याविभूषित होते तेव्हापासून माझ्या नातवांपर्यंत एखादं दुसरा अपवाद सर्व पदवीधरांच्या पंगतीतले. असो तो मुद्दाच नाही त्यांच्या काळात मला वाटत सर्व भाषा व्याकरण, वाड्मय सर्वच उच्च दर्जाचं होतं . शिक्षित घरात शेले, कीट्स , बायरन, केशवसुत, भा . रा. तांबे, अनंत फंदी, राम जोशी, आननाभाऊ साठे ,तुकाराम महाराज. ही नावे कानावर पडत.






अगदी परीक्षेच्या भाषेत मराठी, इंग्रजी, संस्कृत या उच्च दर्जाच्या म्हणाव्यात अशा पातळीच्या भाषा सक्तीच्या असत 100 गुणांच्या.

संस्कृत, इंग्रजीमध्ये भाषांतरीत करावा लागे ,सातवी पर्यंतच सर्व अंकगणित आत्मसात करावा लागे ,अर्थात त्यावेळेस शिक्षण क्लास एज्युकेशन असे साक्षरतेचे प्रमाणही अत्यल्प असे आणि या बरोबरच पुस्तकी विद्याच खरी असा भाव नव्हता . परंपरागत ज्ञानाला मान्यता समाजात होती. वैदयाकडुन लोक उपचार घेत असत अगदी सन 1980 मधल्या एका सर्व्हे मध्ये 70% भारतीय जनता आयुर्वेदिक औषधे वापरतात अशी माहीती पुढे आली होती. तरी पण जे त्त्या राज्यकर्त्यांती हतबल करण्यासाठी अनेक गोष्टी केल्या. जहाज बांधणी संपवली ,मृत्यु प्रमाणपत्र देण्याच्या बंधनावरून वैदयकी संपवलं. अनेक गोष्टी. या सगळ्या प्रकारातून इंग्रजी शिकलेल्यांना मानसन्मान मिळू लागला प्रमाणपत्राशिवाय सरकारी नोकरी नाही या सर्वातून प्रमाणपत्राची किंमत वाढत गेली.

अजुनही ज्ञानमहात्म्याची धुगधुगी होती कोल्हापूरला वाय. पी पवार नगर आहे ज्यांच्या नावाने ही औद्योगिक कॉलनी ओळखली जाते ते पदवीधर इंजीनियर नव्हते. तरी किर्लोस्कर वाडीत ऑइल इंजिन तयार करण्याच्या कारखान्यात त्यांचा मोठा मान होता. आणखी एक गमतीदार अनुभव मला कागदाचे गोल कापण्यासाठी लोखंडाचा साचा करून, दार लावुन, पाणी लावायला- हार्डनिंग करायला नेला. "घिसाडी म्हणाला पाणी लागणार नाही लगेच मुंढ होईल’ विचारल कशावरून तर म्हणतो आम्हाला बघितल्यावर आणि हातात घेतल्यावर कळतं, विश्वास बसण अवघड होत `चालेल म्हटल लाव पाणी काय होईल ते पाहु,’ त्यांनी पाणी लावलं आणि एका ऑपरेशन मध्येच ते मोल्ड झाल .ते घेऊन इंजिनियरिंग कॉलेजच्या मेटॉलर्जी विभागात गेलो. आणि विचारल हार्डनिंग होत का नाही हे कस ओळखायच? तर उत्तर साध होत विकत घेत असतांना पावती वर स्टील चा नंबर असतो त्यावरून गुणधर्म पाहता येतात ,मी तर तो तुकडा भंगार मधुन आणला होता सगळच अवघड..

माझा एक मामा इ.स. 1912-13 मधला त्याचा जन्म असेल तो अँग्रीकल्चरल ऑफिसर होता. त्याचा अनुभव सांगत असतांना तो म्हणाला शेतकऱ्यांचा आमच्यावर विश्वास नसतो" आणि त्याने शेतकऱ्यांच्या मधला प्रचलित विनोद सांगितला. तो असा ... एका शेतकऱ्याचा मुलगा शहरात राहुन शाळा शिकत होता पुढे अँग्रीकल्चरल कॉलेज मध्ये गेला .सुट्टीला गावी आल्यावर आपल्या ज्ञानाच प्रदर्शन करत होता. बाप एका रोपाची काही निगराणी करीत होता मुलगा म्हणाला - "अस करू नका त्यामुळे आंबे उशिरा लागतील, ‘शेतक-याने विचारल म्हणजे’ मुलांनी सल्ला दिला ..तु म्हणतोस तस केलं तरी कधीच आंबे लागणार नाहीत कारण ते झाड आंब्याच नाहीच …..

पण इंदिरा गांधीनी हे सर्वच बदलल विश्वविद्यालयातील विद्वानांना आयव्हरी टॉवर सोडुन शेतकऱ्यांपर्यंत पोहचा अस सांगितलं. राजकीय इच्छाक्तीची कळ फिरली हरीतक्रांती झाली सन 1955, 1956, 1957 ओळीने तीन वर्षे उत्तम पाऊसपाणी होऊन चांगले पीक येऊन आपल्या गरजेपेक्षा 5% धान्य उत्पादन कमी होते. ते आता आम्ही धान्य निर्यातदार झालो आहोत. सुरुवातीच्या काळात आम्ही चाळीस कोटीच होतो आता ऐक्शे चाळीस कोटी असुन सु‌द्धा आम्ही निर्यातदार आहोत. असा चमत्कार घडला.

ब्रिटीश काळात सुद्धा मान्यताप्राप्त शाळांना सरकारी अनुदान मिळायची. स्वातंत्र्य मिळाल्यावरतर काही काळ शाळा काढणे, शिक्षण प्रसार करणे ,घरोघरी जाऊन मुलांना शाळेत घालण्यासाठी पालकांना प्रवृत्त करण हे कार्यक्रम असत. सर्व राजकीय पक्ष त्यात भागीदारी करत यातून क्लास एज्युकेशन वरून मास एज्युकेशनकडे वाटचाल सुरू झाली .घंटा झाल्यावर मुल येऊन बसू लागली हे मोठ यश वाटत असे. यामुळे काही धुरिणांनी या अवस्थेला घाई वाटेल असे प्रसंग घडायचे ज्यांना अनेक पिढयात शालेय शिक्षणाचा संस्कार नसलेले पालक आपल्या मुलांना शाळेत आणून सांगत " गुरुजी माझ्या मुलाला त्यानी ऐकलं नाही तर बुटानं मारा पण शिकवा’ हळूहळू तात्यापंतोजी सारखं छडी आणि धोकपटी जाऊन तर्क विचार, समज याला प्राधान्य यायला लागल .कर्मवीर भाऊराव पाटील यांनी यासंदर्भात महाराष्ट्रचा मानसिक पोत बद‌लुन खुप वरच्या पातळीवर आणला अस म्हणणं वास्तवापासून दूर जाणं नसेल.

यातच मधुकर राव चौधरी यांनी शिक्षण मंत्री असताना महाराष्ट्र असेंबली मध्ये शिक्षणाबद्दल श्वेततपत्रिका मांडली. 10+2+3 ही पद्धती आणली. पाठयक्रम बदलला गणित आणि विज्ञानाला महत्त्व दिलं. दहावी एस एस सी ला गणिताचे दोन पेपर, विज्ञानाचे तीन पेपर आणि तीन पात्यक्षिकांच्या परीक्षा, समाजशास्त्राचे दोन पेपर आणि भाषांचे पेपर अस परीक्षांच स्वरूप झालं. संचसंकल्पनांवर आधारलेल्या तर्काला आणि आकलनाला प्राधान्य देणारे गणित आणि शास्त्र आणले. आठवीपासून अँडव्हान्सड (A) आणि ओर्डिनरी (0) असे स्तर केले ज्यांना पुढे विशेष शिक्षण घ्यायच आहे त्यांनी A स्तर घ्यावा आणि ज्यांना SSC नंतर नोकरी व्यवसायाला जायच आहे त्यांनी 0 स्तर घ्यावा अस सुचवलं.

इथपासून घटनाक्रमाची दिशाच बदलुन गेली (A) आणि (O) वर असेंब्लीमध्ये प्रचंड टिका झाली मागच्य दरवाज्यात ब्राम्हणी राज्य आणण्याचा हा प्रयत्न आहे . (A) ला केवळ ब्राम्हण मुल जातील आणि आम्हा सामान्यांनी (O) ला जातील वैगेरे वैगेरे . या गुऱ्हाळातून (0) चा पर्यायच काढून टाकला सगळेच प्रगत अवस्थेला आणले पण ते सगळ्यांना झेपेल असं पण एक एक अवघड वाटलेली प्रकरणं भाग कमी करण सुरूझालं. मार्च 1975 मध्ये पहीली दहावी SSC परीक्षा झाली. त्यातसुद्धा गणिताच्या छापित क्रमिक पुस्तकातील तीन चार प्रकरणे अभ्यासक्रमातुन काढून टाकली मग पाळी आली परीक्षेतल्या प्रश्नांच्या काठिण्य पातळीची’ सामान्य विद्यार्थ्यांना उत्तर देता येईल याचा विचार करून काठिण्य पातळी आणि प्रश्नांची रचना ठरू लागली. म्हणजे घडल काय तर शिक्षणाचा दर्जा ठरवून विदयार्थ्याना त्या पातळीवर आणणं हे थांबल आणि शिक्षणाची दर्जापातळी ,परीक्षेची काठिण्यपातळी ,पश्नरचना विद्यार्थ्याना आवडेल त्या पातळीवर आनण्याची क्रिया सुरू झाली .एकप्रकारे लोकांना सुखावून खुश करून सुरु दर्जेदार शिक्षण घेतल्याच्या भ्रमात ठेवन्याचा धूर्तपणा सुरू झाला . त्याचा परिपाक शिक्षणाचं खाजगीकरण स्वायत्त विद्यापीठ असा झाला. एका रात्रीत बसल्या बैठकीत शिक्षण सम्राटांना २०० आणि ३०० कॉलेजेसना मंजुरी दिली गेली पदव्या महाग झाल्या तरी सहज उपलब्ध झाल्या . कॉपी, सामुहीक कॉपी करू दिली नाही म्हणून गावांनी परीक्षा केंद्रावर हल्ला करणं आणि यावर बातमी येण्यापलिकडे काही कारवाई न होणं यात काही नाविन्य राहील नाही.

बहुधा समाजाची सांस्कृतिक पातळी आणि मानसिकता तसेच सत्ताधाऱ्यांची राजकीय इच्छाशक्ती या सर्वावर शिक्षणाची पातळी अवलंबुन असते. अशाही परिस्थितीत इच्छुक मार्ग काढातच असतात.

“इथे माझे दोन अनुभव नोंद करतो आणि थांबतो.”





1960 च्या दशकात ठाण्याच्या बेडेकर हायस्कुल मध्ये मी शिकवीत असे तिथे प्रयोगशाळा छान होती त्यात मला अंडरस्टँडीग सायन्स आणि नॉलेज च्या अंकांच्या फाईल्स मिळाल्या उत्तम गोटीव कागदावर त्रिमितीक वाटव्यात अशा आकृत्या आणि सोप्या इंग्रजीमध्ये निरुपण मी तर हरखुनच गेलो. त्याच रूपांतर मराठीत करून त्या आकृत्यासह काचफलकात प्रदर्शित करू लागलो अर्थात श्याम फडके त्या वेळचे मुख्याध्यापक यांचंत्याला प्रोत्साहनच होतं. सहामाही परीक्षेच्या वेळेस मुलांशी संवाद साधल्यावर 2000 पैकी तीस चाळीस मुलांनी ते पाहिलं होत आणि वीसेक मुलांनी वाचलं होत मी वैतागलो आणि सोडुन दिलं. दिवाळीच्या सुट्टीनंतर दोन तीन आठवड्यांनी सर टीचर्स रूम मध्ये येऊन म्हणाले," काय हो लिमये , तुमची काचफलकाची फसफस निघाली का?, अहो काही प्रतिसाद नाही .दोन-चार मुलं मला वाक्य पूर्ण करू देता लगेच केबिनमध्ये या म्हणाले ‘ तिथे गेल्यानंतर माझ म्हणणं सांगितल्यावर ते उभे राहीले आणि माझ त्यांनी अभिनंदन केले. 1% मुलांनी ते वाचल आणि बघितल मिशन सक्सेसफुल याच मुलांना गरज असते ती भागवली गेली बाकीचे सगळे अल्सो रॅन एक दोन टक्केच साधनेचा नाद वाहता ठेवता ठेवतील पण

दुसरी आठवण ऐकवतो ,1968-69 सालचा व्हीएतनाम युद्ध जोरात सुरू होत मॉस्को मध्ये पैट्रिस लुमुंबा विद्यापीठामध्ये मध्ये काही व्हिएतनामी विद्यार्थी होते. त्यांना युद्धामुळे सरकार ज्यादा स्कॉलरशिप देत असे त्यांच्याकडे थोडे ज्यादा पैसे असत. भारतीय विद्यार्थी तंगीत असत पण त्यांच्याकडे ट्रान्झिस्टर वैगेरे असे. मग ते व्हिएतनामी विद्यार्थ्यांना विकत. ही गोष्ट त्यांच्या पॉलिटिकल कमिशनरच्या लक्षात आली. ती हेडक्वार्टस लां कळवली मुलांना परत बोलावुन घेतल गेल त्या मुलांना युद्ध सीमांवर हिंडवून आणल आपली जनता कशी लढत आहे हे दाखवलंआणि सांगितल, तुम्हाला ज्यादा स्कॉलरशीप, उत्तम खाणं ,उत्तम अभ्यास आणि उत्तम तब्येतीसाठी आहे येऊन तुम्हाला लढायचं आहे. तिथुन परत आल्यावर या सगळ्या विदयार्थ्यांनी करमणुकीची साधन परत केली कित्येकांना त्याने पैसे परत मिळाले नाहीत भारतीयांकडुन ते खर्च झाले होते. त्याबद्दल यांची तक्रार नव्हती. त्यांची ती सामाजिक बांधिलकी होती. कधीतरी आमचेही विद्यार्थी सामाजिक बांधिलकी म्हणून ज्ञानसाधना करत असतील अशी आशा व्यक्त करून थांबतो.

Comments


bottom of page