top of page

हेरिटेज इंटरनॅशनल स्कूल मध्ये आषाढी एकादशी उत्सव सोहळा पार पाडला

Writer's picture: Neel DeshpandeNeel Deshpande

देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई,

सुखालाही आला या हो आनंदाचा पूर,

चालला नामाचा गजर, अवघे गरजे पंढरपूर,



मुळशी येथील कासार आंबोली गावातील हेरिटेज इंटरनॅशनल स्कूल मध्ये दिनांक १६जुलै २०२४ रोजी आषाढी एकादशी उत्सव सोहळा साजरा करण्यात आला.




आषाढी निमित्त फुलाद्वारे सजवलेल्या सुशोभित पालखीचे मा. मुख्याध्यापिका डॉ.रेणू पाटील यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून पालखी पूजन केले. सर्व विद्यार्थ्यांसोबत पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले.


विठ्ठल नामाचा जयघोष करत शाळेची दिंडी गावातील पद्मावती मंदिर ते विठ्ठल मंदिर पर्यंत फेरी पूर्ण करून पुन्हा आनंदाने शाळेत परतली.सर्व विद्यार्थ्यांनी रंगबेरंगी पारंपारिक पोशाख परिधान केले होते.



कार्यक्रमाची सुरुवात लेझीम व नृत्यातून करण्यात आली.


यावेळी शाळेचे व्यवस्थापन सदस्य श्री. कृष्णा भिलारे ,सौ संगीता भिलारे, श्री कुणाल भिलारे, सौ यशस्वी रसाळ भिलारे व समिधा भिलारे हे उपस्थित होते.



मुख्याध्यापिका यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. जसे की संताची जवळून ओळख व्हावी यासाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा, कीर्तन, भारुड, श्लोक, अभंग, नाट्य स्पर्धा आणि चिमुकल्यांसाठी तुळस व पालखी सजावट अश्या विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.



वातावरण आनंदाने व अध्यात्माने भरलेले होते या उत्सवाने विद्यार्थ्यांना आपल्या महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि त्यांचा वारसा अधिक जाणून घेण्यासाठी प्रोत्साहित केले.

Comentários


9561398225

  • Facebook
  • Instagram

©2021 by Stay Featured. Proudly Created by Buzzer Media & Advertising

bottom of page