लोणी येथील प्रवरा गर्ल्स स्कूलमध्ये ‘आदिवासी दिन’ उत्साहात साजरा
- Neel Deshpande
- 3 days ago
- 1 min read
प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, लोणी येथे आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि वारसा यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने ‘आदिवासी दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
आदिवासी समाजाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची विद्यार्थिनींना ओळख व्हावी, तसेच निसर्गसंवर्धन, शांतता, सामाजिक मूल्ये आणि परंपरांचे महत्त्व पुढील पिढीपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींनी पारंपरिक आदिवासी नृत्ये, गीते तसेच पारंपरिक वेशभूषेचे आकर्षक सादरीकरण केले.

या कार्यक्रमास प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुष्मिता विखे पाटील आणि शिक्षण विभागाच्या संचालिका सौ. लीलावती सरोदे तसेच अतांत्रिक विभागाचे डॉ. प्रदीप दिघे सर यांनी शुभेच्छा दिल्या.
लोणी केंद्रप्रमुख श्री. विठ्ठल रंधे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्या, डॉ. रेणू पाटील व मान्यवर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना आदिवासी समाजाने देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय जडणघडणीत दिलेल्या योगदानाचे कौतुक केले. तसेच आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा आणि मौल्यवान वारसा जतन करून तो पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.

विद्यार्थिनींनी सादर केलेल्या विविध पारंपरिक नृत्ये, गीते आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. संपूर्ण कार्यक्रमातून आदिवासी संस्कृतीचे वैविध्य आणि समृद्धता प्रभावीपणे अधोरेखित झाली. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये विविध संस्कृतींबद्दल आदर, सामाजिक एकात्मता आणि राष्ट्रीय ऐक्याची भावना अधिक दृढ झाली.
कार्यक्रमाचे नियोजन सौ. शितल थोरात व सौ.स्वाती वाघमारे यांच्याबरोबर त्यांच्या कुलप्रतिनिधी यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाच्या श्री . बाळासाहेब गायकर यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षकवृंद, कर्मचारी आणि विद्यार्थिनींचे आभार मानले.




Comments