जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलमध्ये जनजागृती कार्यक्रम
- Team Stay Featured
- Jul 13
- 1 min read
कासार आंबोली येथील हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘जागतिक लोकसंख्या दिना’निमित्त विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अतिरिक्त लोकसंख्येच्या परिणामांबाबत कविता, गाणी, पीपीटी प्रेझेंटेशन आणि भाषणे सादर करून समाजात जागरूकता निर्माण केली.

कार्यक्रमात लोकसंख्यावाढीची कारणे, परिणाम आणि उपाय यांवर सखोल चर्चा झाली. विद्यार्थ्यांनी पीपीटी प्रेझेंटेशनद्वारे विषयाची माहिती प्रभावीपणे मांडली. शाळेच्या प्राचार्या डॉ. रेणू पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबंधित प्रश्न विचारून त्यांची जागरूकता तपासली आणि या जनजागृती कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. विद्यार्थ्यांनी प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन लोकसंख्या वाढीच्या समस्येविषयी आपली जाणीव दर्शवली.

यावेळी ‘छोटे कुटुंब, सुखी कुटुंब’ या शासकीय उपक्रमाची माहिती देण्यात आली. लोकसंख्येचा समतोल राखण्याचे महत्त्व आणि त्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला. कार्यक्रमाला शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री. कृष्णा भिलारे, सचिव सौ. संगीता भिलारे, व्यवस्थापकीय संचालक श्री. कुणाल भिलारे, सौ. यशस्विनी भिलारे, प्राचार्या तसेच शिक्षक उपस्थित होते.
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्यात यशस्वी ठरला आणि लोकसंख्या नियंत्रणाच्या महत्त्वाविषयी महत्त्वपूर्ण संदेश दिला.
Comments