हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलचे सीबीएसई बोर्ड परीक्षेत सुयश
- Neel Deshpande
- 5 days ago
- 1 min read
कासार आंबोली तालुका मुळशी येथील ज्ञानदीप शिक्षण संस्था संचलित हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सीबीएससी बोर्ड परीक्षेत उज्वल यश मिळवले आहे शाळेचा निकाल 98 टक्के लागलेला आहे

सीबीएससी बोर्डाचा दहावीचा निकाल नुकता जाहीर झाला त्यामध्ये शाळेतील राजन कुंभार 97% , सुजल हेरकर 94.4% मयुरेश पाटील 85.4% ,नील राऊत 85.2%, अनुष्का भोसले 83.4% मानसी शिंदे 77.2% ,सानवी सावंत 77%, संचित नखाते 75.8%, वेदांत राऊत 75.6%, समीक्षा वाकोडे 75.2%, असे गुणानुक्रमे 10 क्रमांक पटकावले .
विद्यार्थी केंद्रीय शिक्षण पद्धती, अनुभवी व तज्ञ शिक्षक, सुसज्ज प्रयोगशाळा,विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम व आधुनिक शिक्षण पद्धती यामुळे शाळेने यापूर्वी दोन वेळा 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' उपक्रमा अंतर्गत तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक पटकावले आहेत. तसेच 'राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार' मिळाला आहे. यंदा सीबीएसईच्या दहावी बोर्डामध्येही विद्यार्थ्यांनी विविध विषयात 90 पेक्षा जास्त गुण मिळवलेले आहेत. राजन कुंभार याने हिंदी मध्ये 100 पैकी 100 घेऊन एक उच्चस्थान मिळवले आहे.त्याला गणित विषयात 99 , इंग्लिश मध्ये 98, विज्ञान मध्ये 94, समाजशास्त्र मध्ये 94 गुण मिळालेले आहेत.

विद्यार्थी, शिक्षक पालक व व्यवस्थापन या सर्वांच्या एकजुटीने हे संपादन करणे शक्य झाले आहे,असे प्राचार्य डॉ. रेणू पाटील यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या सर्वोत्तम यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा भिलारे, सचिव संगीता भिलारे , संचालक कुणाल भिलारे, कार्यकारी प्रशासकीय व्यवस्थापिका यशस्विनी भिलारे, प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांचे , शिक्षकांचे व पालकांचे कौतुक केले आणि आणि सर्व विद्यार्थ्यांना भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
コメント