पूना कॉलेज ऑफ आर्टस सायन्स कॉमर्सचे राष्ट्रीय सेवा योजना (+2) व पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड ,रक्षा मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छता अभियान यानिमित्त ग्रामस्वच्छता अभियान घेण्यात आले. यामध्ये गोळीबार मैदान, पूना कॉलेज परिसर, सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटल ,ईदगाह परिसर तसेच गोळीबार मैदान चौक परिसराची स्वच्छता राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी केली.

पूना कॉलेजचे प्राचार्य डॉ. अफताब अन्वर शेख यांनी आपली वसुंधरा सदैव हरित राहो यासाठी पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी विद्यार्थी ,शिक्षक व समाजाचा सहभाग वाढवणे काळाची गरज आहे. पर्यावरणाचे संवर्धन, संरक्षण व जतन करण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध रहावे असे आव्हान केले.
या उपक्रमात सहभागी सर्व विद्यार्थी ,शिक्षक व स्वयंसेवकांना वृक्षतोड थांबवणे, प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर न करणे, वृक्षारोपणासारखे उपक्रम राबवणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे या कर्तव्याची जाणीव करून देणारी “माझी वसुंधराची “शपथ देण्यात आली. पूना कॉलेजचे प्राचार्य डॉ. आफताब अन्वर शेख व उपप्राचार्य इम्तियाज आगा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला.

सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटलचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. उषा तपासे, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आरोग्य विभागाचे मुख्य अधीक्षक मा.रियाज टी .शेख , पूना कॉलेजचे उपप्राचार्य इकबाल शेख ,सुपरवायझर नसीम खान उपस्थित होते.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. जुबेर पटेल , प्रा. इम्रान मोमीन ,क्रीडाशिक्षक इम्रान पठाण, महिला कार्यक्रम-अधिकारी ,वसुधा व्हावळ, राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम- अधिकारी प्रा.शेख अशद , प्रा.बाबा शेख, प्रा आसिफ खान, प्रा इन्तेकाब आतार प्रा. सबा हुसेन प्रा. समीर रंगरेज , सलमान सय्यद ,राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
Comments