top of page

रोमँटिक हिट्स ऑफ रफी-किशोर संगीत संध्ये चे आयोजन

पुणे - स्वरोमा म्युझिकल इव्हेंट्स आणि केशव मगर असोसिएट्स प्रस्तुत जुन्या सुमधुर हिंदी गीतांचा कार्यक्रम ‘रोमँटिक हिट्स ऑफ रफी-किशोर’ येत्या १२ जुलै रोजी सायं. ७ वा. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आला असून यामध्ये मोहम्मद रफी, किशोर कुमार यांनी अजरामर केलेल्या सदाबहार आणि अविस्मरणीय गीतांचा नजराणा सादर केला जाणार आहे. हा कार्यक्रम पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विनामूल्य असणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत आयोजिका अनुपमा कुलकर्णी यांनी दिली. या वेळी कार्यक्रमाच्या संयोजिका करुणा पाटील, गायक जितेंद्र भुरुक, रफी हबीब, राजेश्वरी पवार आणि डॉ. रोहिणी काळे उपस्थित होते.



रोमँटिक हिट्स ऑफ रफी-किशोर संगीत संध्ये चे आयोजन
रोमँटिक हिट्स ऑफ रफी-किशोर संगीत संध्ये चे आयोजन

या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक जितेंद्र भुरूक आणि रफी हबीब एकल गीते तसेच युगल गीते सादर करणार आहेत त्यांना गायिका अनुपमा कुलकर्णी, राजेश्वरी पवार आणि डॉ. रोहिणी काळे साथ देणार आहेत. गायकांना, कीबोर्डवर आसिफ खान, ट्रम्पेट आणि सॅक्सोफोनवर बाबा खान, कीबोर्डवर सईद खान, गिटारवर हार्दिक रावल, बासरीवर सचिन वाघमारे, रिदम मशिनवर आसिफ इनामदार, ड्रम्स वर स्वयम सोनावणे, तुंबा वर सोमनाथ फाटके ढोलक वर रोहित साने हे कलाकार साथसंगत करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्र संचालन आकाश सोळंकी करणार आहेत. या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक संघातील सभासदांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Comments


9561398225

  • Facebook
  • Instagram

©2021 by Stay Featured. Proudly Created by Buzzer Media & Advertising

bottom of page