21 जून 2024 रोजी हेरिटेज इंटरनॅशनल स्कूल, कासारआंबोली, पुणे येथे 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. या वर्षीची थीम 'स्व आणि समाजासाठी योग' ही होती.
विद्यार्थी, कर्मचारी आणि प्रशिक्षक यांनी योग दिनाच्या जिंगल स्पर्धेसाठी स्वत:ची नोंदणी करणे आणि योगासाठी शासकीय प्रमाणपत्र मिळवणे यासारख्या योग क्रियाकलापांमध्ये भाग घेऊन योग दिन साजरा केला.
सहजयोग संघ आणि प्राचार्या रेणू पाटील यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन करून योग दिनाच्या सोहळ्याला सुरुवात झाली. कार्यक्रमाची सुरुवात सान्वी पाटील हीच्या तालबद्ध योगासनातील नृत्य सादरीकरणाने झाली. सामूहिक तालबद्ध सादरीकरण आणि सहजयोग ध्यानामुळे कार्यक्रम अधिक सुंदर झाला.
शाळेच्या योग प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी प्रार्थना, सराव उपक्रम, सूर्यनमस्कार आणि बैठी आणि उभे राहूनची आसने, ओंकार आणि ध्यानधारणा केली. कार्यक्रमाची सांगता जागतिक संगीत दिनानिमित्त गायन, वादन आणि प्रार्थना जी सर्व विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी गायन करून केली ... 'इतनी शक्ती हमे देना दाता...' ही सामूहिक प्रार्थना घेण्यात आली.
हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या डॉ. रेणू पाटील म्हणाल्या की, आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी अधिक आनंददायी होता कारण योग व संगीत दिवस आज साजरे झाले. योगासने आणि संगीताचा आनंद हेच तर शरीर, मन आणि आत्मा यांना प्रफुल्लित करतात . आज दोन्ही आपल्या जीवनात महत्त्वाचे आहेत.
शालेय व्यवस्थापन सदस्य श्री.कृष्णा भिलारे (संस्थापक, अध्यक्ष), सौ.संगीता भिलारे (सचिव), श्री. कुणाल भिलारे (संचालक), सौ. यशस्विनी भिलारे यांनी सर्वांना निरोगी, आनंदी योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
Comments