top of page

Search Results

77 results found with an empty search

  • मास्टरस्ट्रोक कॅरम अकॅडमी लवकरच सुरू.

    पुण्याचे उपनगर असलेल्या कोंढवा बुद्रुक येथील ऊन्ड्री येथे लवकरच मास्टरस्ट्रोक कॅरम अकॅडमी सुरू होणार असून येत्या १० ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वा. अकॅडमीचे उद्घाटन भारतीय कॅरम संघाचे प्रशिक्षक ज्येष्ठ खेळाडू सुहास कांबळी, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष व हवेली तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती सचिन घुले यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी ऑल इंडिया बॉक्सिंग असोसिएशनच्या पंच, परीक्षक व क्रीडापटू वैशाली चिपलकट्टी, श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रकाश गायकवाड, आंतरराष्ट्रीय खेळाडू अनिल मुंढे, आंतरराष्ट्रीय खेळाडू अभिजीत त्रीपणकर , महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सदस्य आशुतोष धोडमिसे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या संदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेस जेष्ठ भारतीय कॅरम संघ प्रशिक्षक सुहास कांबळी, आंतरराष्ट्रीय खेळाडू अनिल मुंढे आणि अभिजीत त्रिपणकर, आय सी एफ कप फेडरेशन पॅनल अम्पायर संदीप अडागळे, मास्टर स्ट्रोक कॅरम अकॅडमीचे संचालक गणेश अडागळे, उपसंचालिका आशा भोसले आणि महाराष्ट्र कॅरम असोसिएशन चे सभासद आशुतोष धोडमिसे उपस्थित होते. कॅरम हा खेळ सर्वपरिचित आहे तसेच हा खेळ घरोघरी असतो या खेळाचा लहान मुलां पासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्व जण आनंद घेतात. परंतु हाच खेळ राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यावसायिक स्वरूपातही खेळला जातो या बाबत कुठेच जागरूकता दिसत नाही. कॅरम खेळामध्ये जिल्हास्तरीय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके प्राप्त करता येऊ शकतात तसेच आयपीएल सारखी कॅरम ची सुद्धा एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे म्हणून कॅरम या खेळाकडे मनोरंजन किंवा विरंगुळा या दृष्टीने न पाहता एक उत्तम व्यावसायिक क्रीडा प्रकार म्हणून मान्यता मिळणे गरजेचे असल्याचे मत या वेळी कांबळी यांनी व्यक्त केले. महिला, पुरुष, जेष्ठ नागरिक आणि मुले मुली या अकॅडमीत येऊन खेळू शकतात पण याच बरोबर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू म्हणून जर या खेळाला स्वीकारायचे असेल तर अकॅडमी मधे ६ ते २१ वयोगटातील मुला मुलींना खास राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंकडून शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे गणेश अडागळे यांनी सांगितले. भोसले म्हणाल्या की, कॅरम हा खेळ महिला सुद्धा खूप उत्तम रित्या खेळतात जर योग्य मार्गदर्शन मिळालं तर या खेळात महिला सुद्धा प्रावीण्य मिळवू शकतील. त्यासाठी महिलांना काही खास सवलती अकॅडमी तर्फे दिल्या जातील. कॅरम या खेळा मधे सुद्धा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, स्विस लीग, आय सी एफ लीग, झोनल स्पर्धा, बेस्ट झोन आदी प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात. त्या साठी अकॅडमी मधून खेळतानाची आसन स्थिती पासून ते हातात स्ट्रायकर पकडण्या पर्यंतचे सर्व मूलभूत तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे संदीप अडागळे यांनी सांगितले. शिवछत्रपती पुरस्कार विजेता योगेश परदेशी मुळे कॅरमचा भारतातील चेहरा बदलला आहे. योगेश परदेशी हा पुणे जिल्ह्यातील असून भारता कडून आंतरराष्ट्रीय पातळीवर कॅरम खेळा मध्ये जास्तीत जास्त पदके मिळवणारा हा एकमेव खेळाडू आहे. योगेश परदेशी हा कॅरम क्षेत्रातील खेळाडूं मध्ये पुण्याची शान आहे. असे पत्रकार परिषदेत बोलताना अनिल मुंढे यांनी सांगितले. क्रिकेट सारख्या खेळाला जसा नावलौकिक मिळाला आहे तसा कॅरम हा खेळ अजूनही भारतात दुर्लक्षित राहिला आहे. त्यामुळे कॅरम खेळामध्ये उत्कृष्ट खेळाडू निर्माण व्हावेत असा मास्टर स्ट्रोक कॅरम अकॅडमीचा उद्देश आहे. विनामूल्य शिबिर- कॅरम खेळामध्ये रुची उत्पन्न होण्यासाठी अकॅडमी तर्फे ३ ते १५ ऑगस्ट पर्यंत सकाळी ११ ते सायं ६ या वेळे मधे मुलांसाठी विनामूल्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

  • चिंगारीने #SAALEKCHINGARIANEK ह्या प्रसिद्धी मोहीमेद्वारे साजरा केला प्रथम वर्धापन दिन

    चिंगारी या भारतातील प्रसिद्ध सोशिओ-कॉमर्स अॅपने पहिला वर्धापनदिन चिंगारीचे कुटुंब आणि इतर कंटेंट क्रिएटर्ससोबत #SaalEkChingariAnek या उत्साही प्रसिद्धी मोहिमेद्वारे साजरा केला . याप्रसंगी, चिंगारीने चिंगारी अँथम देखील लाँच केले. जेणेकरून क्रिएटर्सना या उत्सवात सहभागी होता यईल आणि उत्साह वर्धक व्हिडिओ तयार करून लाखो चिंगारी कॉइन्स जिंकता येतील. अल्पावधीतच चिंगारीने अद्वितीय कल्पनाशक्ती आणि संकल्पनांच्या आधारे मजबूत पकड जमवली आहे. कंटेंट क्रिएटर्ससाठी वैयक्तिक मंच प्रदान करण्याची सुविधा, हेच प्लॅटफॉर्मच्या यशाचे प्रमुख कारण ठरले. तसेच मागील वर्षात आयोजित विविध स्पर्धांद्वारे क्रिएटर्सची आवड आणि सृजनात्मकतेला प्रोत्साहन देण्यात आले. याप्रसंगी बोलताना चिंगारी अ‍ॅपचे सीईओ आणि सह संस्थापक सुमित घोष म्हणाले, “ चिंगारीच्या सुरुवातीपासूनचे हे वर्ष अविस्मरणीय ठरले. आमचा दृष्टीकोन पुढे नेण्यासाठी आणि जास्तीत जास्त भारतीय प्रेक्षकांचा फायदा होईल, या पद्धतीने हे अ‍ॅप तयार करण्यासाठी टीमच्या प्रयत्नांमुळे आमची प्रगती वेगाने झाली. आम्ही देशातील कलाकारांना भरपूर संधी उपलब्ध करून देणे सुरुच ठेवणार आहोत. नि:पक्ष व्यासपीठ मिळण्यासाठी संघर्ष करणाऱ्या निर्मात्यांचा आवाज होण्याचे आमचे ध्येय आहे. कला व्यावसायिकांची वेगाने वृद्धी करणे, हे या ब्रँडचे दीर्घकालीन उद्दिष्ट आहे. जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त संधी आणि लाभ मिळेल. प्रेक्षक आणि भागीदार संस्थांमध्ये ब्रँडने निर्माण केलेल्या विश्वासाच्या आधारे चिंगारीने या क्षेत्रात दमदार गती प्राप्त केली. मागील वर्षी चिंगारीने ब्रँड आणि प्लॅटफॉर्मच्या यूझर्सना नव्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता विविध ब्रँड आणि सेलिब्रेटिंशी भागीदारी केली. ब्रँडने कंटेंट क्रिएटर्ससाठी एक लर्निंग प्लॅटफॉर्मदेखील विकसित केला असून येथे कलाकार अनुभवी व्यावसायिकांकडून शिकू शकतात आणि त्यांची कौशल्ये वाढवू शकतात. अशा पथदर्शक उपक्रमांद्वारेच चिंगारी स्वतंत्र कलाकार आणि कंटेंट क्रिएटर्ससाठी एक समग्र वृद्धीचे वातावरण विकसित करण्यास सक्षम आहे. भविष्यातील योजनांविषयी बोलताना चिंगारीचे सीओओ आणि सह संस्थापक दीपक साळवी म्हणाले, “ उद्योजक आणि संस्था ज्यप्रमाणे विज्ञान, वाणिज्य आणि तंत्रज्ञानात गुंतवणूक करतात, त्याप्रमाणे चिंगारी मागील वर्षात सर्जनशील सामग्रीचे मानसशास्त्र, लोकसंख्याशास्त्र आणि प्रेक्षकांची समज जाणून घेण्यास मदत झाली. ही आकडेवारी आणि माहिती देशभरातील निर्मात्यांसाठी वापरण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून त्यांना त्यातून लाभ मिळेल.” ‘बन चिंगारी’ हे गीत क्रिएटिव्ह डायरेक्टर प्रणत घुडे यांनी बहुभाषिक, मिलेनिअल्सचे लक्ष वेधून घेण्यासाठी तसेच भारतातील वैविध्य टिपण्यासाठी लिहिले असून देशातील नृत्य व संगीतप्रेमींसाठी ही जबरदस्त मेजवानी ठरणार आहे. चिंगारीच्या संस्कृतीतील अधिकृत प्रतिभेचा कॅनव्हास या व्हिडिओद्वारे प्रसारीत केला जातो. या अँथमद्वारे, प्रेक्षकांसोबत आणखी दृढ नाते तयार करायचे आहे. तसेच या महोत्सवात त्यांना सहभागी करून घ्यायचे आहे. आघाडीच्या म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरदेखील हे अँथम उपलब्ध आहे. प्लॅटफॉर्मच्या या उत्तुंग यशामुळे, अनेक सार्वजनिक आणि खासगी संस्था चिंगारीसोबत भागीदारी करण्याच्या प्रतीक्षेत आहेत, जे फक्त ब्रँडच्या विश्वसनीयतेवरच विश्वास ठेवतात. तंत्रज्ञान नूतनाविष्काराचा नियमित आधार असलेल्या चिंगारीचे उद्दिष्ट, पुढील काही वर्षांत भारतातील सर्वाधिक प्रमाणात वापरला जाणारा सोशिओ-कॉमर्स प्लॅटफॉर्म बनण्याचे आहे. "बन चिंगारी " हे गाणे पाहायचे असेल तर जरूर ह्या दुव्यावर जा https://www.youtube.com/watch?v=ciXE_v0dfdI

  • फिनो पेमेंट्स बँक बनली आयपीओ फाईल करणारी पहिली नफ्यातील फिनटेक

    पेमेंट बँका म्हणून चार वर्षे कार्यरत असलेल्या ब्लॅकस्टोन, आयसीआयसीआय ग्रुप आणि बीपीसीएलचे पाठबळ लाभलेल्या फिनो पेमेंट्स बँक लिमिटेड (एफपीबीएल)ने आयपीओकरिता सेबीसोबत मसुदा दस्तावेज नोंदवला आहे. बाजारातील सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार, आयपीओचे आकारमान ₹1,300 कोटी असू शकते. या इश्यूत ₹ 300 कोटी त्याचप्रमाणे ओएफएस घटकांच्या ताज्या इश्यूचा समावेश आहे. एफपीबीएल ही शेड्यूल्डेड कमर्शियल बँक असून आपल्या डिजीटल वित्तीय सेवांच्या साह्याने उदयोन्मुख भारतीय बाजारांमध्ये कार्यरत आहे. ही कंपनी तंत्रज्ञान-सक्षम वित्तीय समावेशक पर्यायातील आद्यकर्ता असलेल्या फिनो पेटेक लिमिटेड (एफपीएल)च्या संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे. एफपीएल’ ला ब्लॅकस्टोन, आयसीआयसीआय ग्रुप, भारत पेट्रोलियम आणि आयएफसी यांसारख्या महत्त्वाच्या गुंतवणुकदारांचे पाठबळ आहे. आर्थिक वर्ष 20 च्या चौथ्या तिमाहीत ही फिनटेक बँक नफ्यात राहिली आणि तेव्हापासून सातत्याने नफ्यात वाढ झाली आहे. यामुळे एफपीबीएल ही आयपीओ फाईल करणारी पहिली नफा कमावणारी फिनटेक ठरली. मागील काही वर्षांपासून आपल्या बँकिंग पद्धतीत डिजीटायजेशन आणि वृद्धीचा अवलंब करत एफपीबीएल’ ने व्यवहार आकारमान वाढलेले पाहिले आहे. डीआरएचपी’ मध्ये नमूद करण्यात आल्याप्रमाणे आर्थिक वर्ष 21 दरम्यान पेमेंट बँक मंचावर 434 दशलक्षहून अधिक व्यवहारांची नोंद झाली आणि एकूण व्यवहारांनी रु. 1.32 लाख कोटींचा पल्ला ओलांडला आहे. फिनटेक उद्योग क्षेत्रात भक्कम नेतृत्व स्थिती असून मार्च 2021 दरम्यान मायक्रो एटीएम’ चे सर्वात मोठे नेटवर्क होते आणि 55% च्या बाजार वाट्यासह 6.4 लाखांचे मर्चंट नेटवर्क आणि 25.7 लाख बँक खाती लाभली आहेत. सध्याचा काळ वित्तीय क्षेत्रासाठी आव्हानांचा असूनही डिजीटल व्यवहारांवर बेतलेली पद्धत आणि विना-कर्ज जोखीम यामुळे एफपीबीएल’ ला प्रगती साधणे शक्य झाले. आर्थिक वर्ष 21 करिता मागील तीन वर्षांसाठी सीएजीआर 29%नी वाढला असून ₹791 कोटींचा महसूल जमा झाला. डीआरएचपी’ मध्ये नोंदवण्यात आलेल्या माहितीनुसार, वार्षिक अंदाजे 15% सह आर्थिक वर्ष 21 दरम्यान बँकेने ₹20.5 कोटींचा नफा नोंदवला. या इश्यूकरिता नियुक्त करण्यात आलेल्या गुंतवणुकदार बँकर्समध्ये एक्सिस कॅपिटल लिमिटेड, सीएलएसए इंडिया प्रा लि, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड आणि नोमुरा फायनान्शियल अॅडव्हायजरी सर्विसेस प्रा लि’ चा समावेश आहे.

  • वेलनेस्टाने D2C सेवेद्वारे मुंबईतील रहिवाशांसाठी सादर केली सुरक्षित आणि सोयीची वेलनेस सेवा

    वेलनेस्टा ऍप या सलॉन व स्पा, जिम व फिटनेस, आयुर्वेदिक मसाज, योगा व नॅचरोपॅथी अशा पर्सनल वेलनेस सेवा सहजपणे शोधण्यास मदत करणाऱ्या भारतातील पहिल्या वेलनेस-टेक अॅपने सध्याच्या महामारीदरम्यान चांगली सेवा देण्याच्या हेतूने नुकतीच D2C सेवा सुरू केल्याची घोषणा केली आहे. वेबसाइट/ऍप मध्ये (अँड्रॉइड व iOS) फोटो व रिव्ह्यू यासह अनेक व्हेंडरची माहिती दिली आहे. युजरना हे व्हेंडर पाहता येतील, विश्लेषण करता येईल आणि त्यांच्या सोयीनुसार सेवा निवडता येईल. या सेवेमुळे युजरना त्यांच्या परिसरातील विविध आउटलेटमध्ये थेट अपॉइंटमेंट बुक करता येईल आणि सुरळित सेवेचा लाभ घेता येईल, तसेच आकर्षक सवलतीही मिळवता येतील. वेलनेस्टाची D2C सेवा सध्या मुंबईभोवती केंद्रित असून तेथे आम्ही 500+ आउटलेटचा समावेश केला आहे व त्यातील 86 लाइव्ह झाले आहेत. बहुतेकसे व्हेंडर आकर्षक व काही वेळा 40% इतके अधिक डिस्काउंट देत असल्याने लोकांनी घराबाहेर पडायला आणि सेल्फ-केअर सेवांचा वापर करायला सुरुवात केली आहे. “2020 हे वर्ष आमच्या कंपनीसाठी असंख्य बदलांचे आणि नवे धडे घेण्याचे होते”, असे वेलनेस्टाचे संस्थापक संजीव सिंघई यांनी नमूद केले. ते म्हणाले, “निर्बंध कमी व्हायला सुरुवात झाल्यापासून व्हेंडरच्या नोंदणीमध्ये वाढ झाली आहे. दररोज अधिकाधिक व्हेंडर आमच्याकडे नोंदणी करत आहेत आणि अॅपॉइंटमेंट, कुपन, इन्व्हेंटरी व पेरोल व्यवस्थापन सेवा देणाऱ्या आमच्या SaaS सेवेचा लाभ घेत आहेत. वेलनेस्टा ही सुविधा ग्राहकांना त्यांच्या परिसरातील विविध प्रकारची आउटलेट शोधण्याची सुविधा देते. कोविड-19 मुळे लोक सुरक्षा व स्वच्छता याविषयी कमालीचे जागरुक झाल्याने आम्ही त्यांच्यासाठी सुस्पष्ट फोटो व रिव्ह्यू देण्यावर भर देत आहोत, जेणे करून अॅपद्वारे रिझर्व्हेशन करण्यापूर्वी संबंधित जागा स्वच्छ असल्याची खात्री त्यांना करून घेता येईल. व्हेंडर डिस्काउंटव्यतिरिक्त, आम्ही नव्या ग्राहकांना त्यांच्या पहिल्या बुकिंगवर 40% व 50% पर्यंत इंट्रोडक्टरी डिस्काउंटही देत आहोत. आगामी काळाबद्दल आम्ही आशावादी आहोत!” या सेवेचे फायदे केवळ ग्राहकांपुरते मर्यादित नाहीत. महामारीचे संकट अचानक कोसळल्यामुळे गेल्या दोन वर्षांत व्यवसायांचे बरेच नुकसान झाले आहे. वेलनेस्टा व्हेंडरना समाविष्ट करून घेत आहे आणि ऑनलाइन बुकिंग उपलब्ध करत आहे. यामुळे व्हेंडरसाठी उत्पन्नाच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. याव्यतिरिक्त, वेलनेस्टा या आउटलेटच्या अॅपॉइंटमेंटचे व्यवस्थापन, कुपन व्यवस्थापन, पेरोल व्यवस्थापन व इन्व्हेंटरी व्यवस्थापन अशा विविध कार्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी एक परिपूर्ण सॉफ्टवेअर सुविधा उपलब्ध करते. वेलनेस्टाचे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सार्थक सिंघई यांनी स्पष्ट केले, “गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये D2B जाहीर केल्यानंतर स्वाभाविकपणे आम्ही D2C सादर केले आहे. वेलनेस्टाबद्दल ग्राहकांमध्ये जागृती करणे आणि आमच्याद्वारे बुकिंग करण्यासाठी त्यांना उत्तेजन देणे, हे आमचे उद्दिष्ट आहे.” बाजारातील स्थिती आता सुधारत आहे. लोक घराबाहेर पडू लागले आहेत आणि व्यवसायही पूर्वपदावर येत आहेत. लोकांनी पुरेशी काळजी घेणे आणि सामाजिक अंतर राखणे गरजेचे आहे. यासाठी वेलनेस्टा लोकांन मदत करते. लोकांना त्यांच्या अपॉइंटमेंटच्या वेळा आधीच बुक करता येऊ शकतात आणि गर्दी टाळता येऊ शकते. वेलनेस्टाने आगामी तिमाहीमध्ये दिल्ली व बेंगळुरू येथे विस्तार करायचे नियोजन केले आहे.

  • शं. ल. चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरजूंकरिता अन्नदान आणि महिलांना विनामूल्य रोजगार प्रशिक्षण

    In the frame: कागदी पिशवी बनवण्याची कार्यशाळा. कोरोना च्या या खडतर काळात शं. ल. चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून दररोज 300 लोकांना मोफत जेवण देण्यात येत असून खेड शिवापुर दर्गा येथील वस्ती, तसेच अनेक बेघर लोकांना पोटभर अन्न मिळेल यासाठी प्रयत्न करत आहे. नेहमीच्या जेवणा व्यतिरिक्त वेगळ्या पद्धतीने कधी मिसळ पाव, कधी पाव भाजी, खिचडी पुलाव, पुरणपोळी, पुरीभाजी, थालीपीठ अशा विविध पद्धतीचे अन्न पुरवले जात आहे यासाठी बचत गटाच्या महिलांना काम दिले जात असून दररोज पंचवीस महिला कोरोना काळात घालून दिलेल्या सरकारी नियमांचे काटेकोर पालन करीत हे काम करीत आहेत त्यामुळे या महिलांना रोजगार मिळत आहे. अन्नाची गुणवत्ता चांगला ठेवण्यावर आमचा भर असून सध्या पंचवीस महिला या कार्यात सहभागी असल्याचे प्रतिष्ठान च्या अध्यक्षा डॉ. गिरीजा भास्कर शिंदे यांनी पत्रका द्वारे कळविले आहे. In the frame : डॉ. गिरिजा शिंदे सध्या सर्वत्र संचारबंदी असल्या कारणाने अनेक व्यवसाय बंद करावे लागलेत तर काही ठिकाणी रोजंदारीवर काम करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे या सर्व बाबींचा विचार करून शं. ल. चव्हाण प्रतिष्ठान तर्फे महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या दृष्टीने मोफत प्रशिक्षण वर्ग घेण्यात येत आहेत जेणे करून महिलांना घर बसल्या व्यवसाय सुरू करता येईल. या मधे सर्व प्रकारचे मसाले, इन्स्टंट पीठे, कागदी पिशव्या, विविध प्रकारचे आयुर्वेदिक तेल, वाळवणीचे पदार्थ, बाळंतविडा, गोधडी, इमिटेशन ज्वेलरी, बाग आणि सेंद्रिय खत निर्मिती, विविध प्रकारची कलाकौशल्य, रुखवत, बालवाडी प्रशिक्षण, अंगणवाडी प्रशिक्षण, डेंटल डॉक्टर असिस्टंट प्रशिक्षण, नर्सिंग असिस्टंट प्रशिक्षण, वृद्ध सेवा प्रशिक्षण असे अनेक प्रशिक्षण वर्ग घेऊन महिलांना रोजगार मिळवून दिला जात आहे. कागदी पिशव्यांच्या प्रशिक्षणामुळे महिलांना कायमस्वरूपी काम मिळाले असून विविध आकर्षक गोधडी प्रशिक्षणामुळे महिलांनी बनवलेल्या गोधड्यांना दुबईची बाजार पेठ मिळाल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. सध्या लॉकडाऊन मुळे हे सर्व प्रशिक्षण वर्ग ऑनलाईन पद्धती ने सुरू आहेत. अशा प्रकारे प्रतिष्ठान तर्फे विविध अर्थार्जन महिलांना मिळवून देण्याचे काम गेले वर्षभर चालू आहे. चव्हाण प्रतिष्ठान बचत गट तसेच बेरोजगार महिला यांसाठी हक्काचे स्थान झाले आहे.

9561398225

  • Facebook
  • Instagram

©2021 by Stay Featured. Proudly Created by Buzzer Media & Advertising

bottom of page