top of page

शं. ल. चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरजूंकरिता अन्नदान आणि महिलांना विनामूल्य रोजगार प्रशिक्षण



In the frame: कागदी पिशवी बनवण्याची कार्यशाळा. 


कोरोना च्या या खडतर काळात शं. ल. चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून दररोज 300 लोकांना मोफत जेवण देण्यात येत असून खेड शिवापुर दर्गा येथील वस्ती, तसेच अनेक बेघर लोकांना  पोटभर अन्न मिळेल यासाठी प्रयत्न करत आहे. नेहमीच्या जेवणा व्यतिरिक्त वेगळ्या पद्धतीने कधी मिसळ पाव, कधी पाव भाजी, खिचडी पुलाव, पुरणपोळी,  पुरीभाजी, थालीपीठ अशा विविध पद्धतीचे अन्न पुरवले जात आहे यासाठी बचत गटाच्या महिलांना काम दिले जात असून दररोज पंचवीस महिला  कोरोना काळात घालून दिलेल्या सरकारी नियमांचे काटेकोर पालन करीत हे काम करीत आहेत त्यामुळे या महिलांना रोजगार मिळत आहे. अन्नाची गुणवत्ता चांगला ठेवण्यावर आमचा भर असून सध्या पंचवीस महिला या कार्यात सहभागी असल्याचे प्रतिष्ठान च्या अध्यक्षा डॉ. गिरीजा भास्कर शिंदे यांनी पत्रका द्वारे कळविले आहे.




        In the frame : डॉ. गिरिजा शिंदे

सध्या सर्वत्र संचारबंदी असल्या कारणाने अनेक व्यवसाय बंद करावे लागलेत तर काही ठिकाणी रोजंदारीवर काम करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे या सर्व बाबींचा विचार करून शं. ल. चव्हाण प्रतिष्ठान तर्फे महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या दृष्टीने मोफत प्रशिक्षण वर्ग घेण्यात येत आहेत जेणे करून महिलांना घर बसल्या व्यवसाय सुरू करता येईल. या मधे सर्व प्रकारचे मसाले, इन्स्टंट पीठे, कागदी पिशव्या, विविध प्रकारचे आयुर्वेदिक तेल, वाळवणीचे पदार्थ, बाळंतविडा, गोधडी, इमिटेशन ज्वेलरी, बाग आणि सेंद्रिय खत निर्मिती, विविध प्रकारची कलाकौशल्य, रुखवत, बालवाडी प्रशिक्षण, अंगणवाडी प्रशिक्षण, डेंटल डॉक्टर असिस्टंट प्रशिक्षण, नर्सिंग असिस्टंट प्रशिक्षण, वृद्ध सेवा प्रशिक्षण असे अनेक प्रशिक्षण वर्ग घेऊन महिलांना रोजगार मिळवून दिला जात आहे. कागदी पिशव्यांच्या प्रशिक्षणामुळे महिलांना कायमस्वरूपी काम मिळाले असून विविध आकर्षक गोधडी प्रशिक्षणामुळे महिलांनी बनवलेल्या गोधड्यांना दुबईची बाजार पेठ मिळाल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. सध्या लॉकडाऊन मुळे हे सर्व प्रशिक्षण वर्ग ऑनलाईन पद्धती ने सुरू आहेत. अशा प्रकारे प्रतिष्ठान तर्फे विविध अर्थार्जन महिलांना मिळवून देण्याचे काम गेले वर्षभर चालू आहे. चव्हाण प्रतिष्ठान बचत गट तसेच बेरोजगार महिला यांसाठी हक्काचे स्थान झाले आहे.

Comments


9561398225

  • Facebook
  • Instagram

©2021 by Stay Featured. Proudly Created by Buzzer Media & Advertising

bottom of page