कासार आंबोली – हेरिटेज इंटरनॅशनल स्कूल येथे २७ फेब्रुवारी २०२५ रोजी मोठ्या उत्साहात ‘मराठी राजभाषा दिवस’ साजरा करण्यात आला. मराठी साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा दिवस दरवर्षी मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली.

यानंतर विद्यार्थ्यांनी स्वागत नृत्य, भाषणे, बडबडगीते, कविता, नाटक, लावणी, भारूड, लोकनृत्य आणि पारंपरिक वेशभूषा सादरीकरण यांसारख्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. तसेच, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.

कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सौ. रेणू पाटील यांनी मार्गदर्शन केले, तर सूत्रसंचालन सौ. प्राजक्ता आमराळे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन शाळेतील Yellow हाऊस तर्फे करण्यात आले.
या कार्यक्रमाला शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री. कृष्णा भिलारे, सचिव सौ. संगीता भिलारे, संचालक श्री. कुणाल भिलारे, व्यवस्थापिका सौ. यशस्विनी भिलारे आणि प्राचार्या डॉ. सौ. रेणू पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

या भव्य आयोजनामुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण झाली असून, मराठी संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित झाले.
Comments