दि. २५ ते २९ जानेवारी २०२३ दरम्यान जपलूप्प इक्वेस्ट्रियन सेंटर,पुणे येथे झालेल्या वार्षिक घोडेस्वारी स्पर्धेत हेरिटेज इंटरनॅशनल स्कूल मधील मानस येनपुरे हया १० वी तील विद्यार्थ्याने ३ विविध घोडेस्वारी स्पर्धेत आपली घोडेस्वारी कला सादर केली . शो जंपिंग (नॉर्मल),बॉल आणि बकेट, ट्रॉटिंग रेस या तीनही घोडेस्वारी प्रकारात त्याने ३ कास्य पदके मिळवली.
आर्यन वर्ल्ड स्कूल, राइड टू लिव्ह अकादमी- मुंबई, यूके युनायटेड क्लब, मुंबई, दिग्विजय प्रतिष्ठान पुणे, एआरसी अकादमी, जपलूप्प इक्वेस्ट्रियन क्लब, इंडस इंटरनॅशनल, गुडविल क्लब यासारख्या नामांकित घोडेस्वारी क्लबच्या घोडेस्वारानी या स्पर्धेत भाग घेतला होता व प्रथमच शाळेच्यावतीने हया स्पर्धेत मानस ने भाग घेतला होता व पहिल्याच प्रयत्नात त्याने ३ कांस्य पदके मिळवून हैट्रिक केली.
शाळा व्यवस्थापन समितीचे मान्यवर श्री.कृष्णा भिलारे (संस्थापक, अध्यक्ष), सौ. संगीता भिलारे (सचिव) श्री. कुणाल भिलारे (संचालक), सौ. यशस्विनी रसाळ-भिलारे (प्रशासकिय व्यवस्थापक) व मुख्याध्यापिका सौ.रेणू पाटील व हेरिटेजचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मानस येणपुरेचे उत्कृष्ट सादरीकरण व अथक प्रयत्न व सरावाचे अभिनंदन केले. त्याला घोडेस्वारी शिकवणारे श्री. कुणाल भिलारे सर व सौ. यशस्विनी भिलारे तसेच उत्तम कामगिरी करणाऱ्या "केसरी' घोड्याचे व शाळेतील सर्व घोड्यांची निगा राखणाऱ्या श्री.अंकुश चे ही सर्वांनी अभिनंदन केले.
Comentários