top of page

प्राचार्या प्रिती दबडे 'टीचर्स गॉट टॅलेंट २०२३ क्रिएटिव्ह पेपर प्रेझेन्टेशन ' ने सन्मानित

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इंग्लिश मीडियम स्कूल व ज्यु.कॉलेज,आकुर्डीच्या प्राचार्या प्रिती दबडे यांना 'एड्युड्रोन वी कनेक्ट' यांच्या विद्यमाने 'टीचर्स गॉट टॅलेंट २०२३ क्रिएटिव्ह पेपर प्रेझेन्टेशन ', या सन्मानाने १५ जानेवारी रोजी भोसरी येथे गौरविण्यात आले. या सन्मानाचा मुख्य विषय 'पेपर प्रेझेंटेशन (एक्सपेरिएनशल लर्निंग मॅपड् विथ एन् इ पी अँड एन् सी एफ' असा होता. या प्रकल्पाचे नियोजन शिक्षकांसाठी गटनिहाय करण्यात आले होते. यामधून प्राचार्या प्रिती दबडे यांनी इयत्ता नववी ते बारावी या उच्च माध्यमिक गटाकरिता प्रेझेंटेशन केले होते. यासाठी विविध निकष ठेवण्यात आले होते. सर्व निकषांना ग्राह्य धरून त्यांनी 'थ्री डिफरंट टाइप्स ऑफ क्लॉकस् बाय युजिंग मॅथेमॅटिकल फंक्शन्स' अशी वेगवेगळ्या पद्धतीची घड्याळे आपल्या प्रेझेंटेशनमध्ये दाखवली होती.







अशा प्रकारच्या शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना अतिशय नाविन्यपूर्ण पद्धतीने गणित शिकण्यास मदत मिळेल, गणिताची वेगवेगळी सूत्रे मनोरंजकपणे बनवण्यास व लक्षात ठेवण्यास प्रेरणा मिळेल, तसेच विद्यार्थी पारंपारिक शिक्षण पद्धतीतून मुक्त होतील व त्यांना शिक्षणामध्ये आवड निर्माण होईल, अशी अनेक उद्दिष्टे त्यांनी आपल्या पावर पॉइंट प्रेझेंटेशनमधून दाखवून दिली. याचबरोबर या पद्धतीचा वापर आपण अनेक विषयांमध्ये देखील करू शकतो जसे की विज्ञान, मराठी, हिंदी, भूगोल, भूमिती इ. असे त्यांनी सांगितले. हा सन्मान प्राप्त झाल्यामुळे प्राचार्या प्रिती दबडे यांचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांच्याकडून अभिनंदन होत आहे.

bottom of page