top of page

‘सोल अँड सॉईल’ : कला, सर्जनशीलता आणि आत्मशोधाचा अनोखा अनुभव

7 days ago
2 min read

बोधी ट्री प्रस्तुत | द क्युरेटेड अ‍ॅटेलियरची संकल्पना | स्वा इटर्नलच्या सहयोगाने


पुणे, नोव्हेंबर २०२६ : रोजच्या धावपळीतून थोडा वेळ स्वतःसाठी काढत, मनाला विरंगुळा देत आणि आपल्या सर्जनशीलतेला नवी दिशा देण्याची संधी ‘सोल अँड सॉईल’ या विशेष उपक्रमाच्या माध्यमातून पुणेकरांना मिळणार आहे.


द क्युरेटेड अ‍ॅटेलियरच्या संस्थापक शिरीन नलवाला यांच्या संकल्पनेतून, स्वा इटर्नलच्या संस्थापक गायत्री यांच्या सहयोगाने आणि बोधी ट्री प्रस्तुत हा विशेष अनुभवात्मक सोहळा शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ ते रात्री ८ या वेळेत द कम्यून कॅफे, कोरेगाव पार्क, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.





कला, संगीत आणि सजगतेचा सुंदर संगम असलेल्या या सोहळ्यात मार्गदर्शित ध्यानसत्र, ‘द अनरिटन पेजेस’ हा विशेष लेखन व आत्मचिंतनाचा अनुभव, मधुबनी चित्रकला, प्रत्यक्ष मातीपासून वस्तू घडवण्याचा पॉटरी अनुभव, टॅरो रीडिंग तसेच सहभागी व्यक्तींना संगीताचा भाग बनवणारा संवादात्मक संगीताचा कार्यक्रम असे विविध उपक्रम अनुभवता येणार आहेत.


याशिवाय कला आणि हस्तनिर्मित वस्तूंच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या स्वतंत्र कलाकारांना आणि स्थानिक ब्रँड्सनाही या उपक्रमात आपली उत्पादने व कलाकृती सादर करण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये KalāKānd Studio, Dehatii, Aşhq Jewellery, the.minds_eye, Moonwick Candles & Co. आणि Vit&Chic यांचा समावेश आहे.


‘सोल अँड सॉईल’चा उद्देश केवळ कला अनुभवणे किंवा वस्तूंची खरेदी-विक्री करणे एवढाच मर्यादित नसून, सर्जनशीलतेच्या माध्यमातून स्वतःशी संवाद साधणे, नव्या व्यक्तींशी ओळख निर्माण करणे आणि रोजच्या धावपळीत हरवलेले आनंदाचे क्षण पुन्हा अनुभवणे हा आहे.


या उपक्रमासाठी प्रवेश शुल्क १५० रुपये असून, त्यामध्ये मार्गदर्शित ध्यानसत्र किंवा जर्नलिंग अनुभव यापैकी एका उपक्रमात सहभागी होता येणार आहे. इतर अनुभवांसाठी स्वतंत्र शुल्क आकारले जाईल. सहभागी व्यक्तींना अधिक वैयक्तिक अनुभव मिळावा यासाठी प्रवेश मर्यादित ठेवण्यात आला आहे.


कार्यक्रमाची माहिती


दिनांक : शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६


वेळ : सायंकाळी ४ ते रात्री ८


स्थळ : द कम्यून कॅफे, कोरेगाव पार्क, पुणे


प्रवेश शुल्क : १५० रुपये


नोंदणीसाठी :




आयोजकांविषयी


The Curated Atelier : शिरीन नलवाला यांच्या नेतृत्वाखाली कला, हस्तकला आणि स्वतंत्र कलाकारांना एकत्र आणणारे व्यासपीठ.


Sva Eternal : गायत्री यांनी स्थापन केलेले भावनिक स्वास्थ्य, आत्मशोध आणि वैयक्तिक विकासासाठी समर्पित व्यासपीठ. मानसशास्त्राधारित पद्धती, सजगता आणि सर्जनशील माध्यमांच्या साहाय्याने व्यक्तिमत्त्व विकासाला प्रोत्साहन देण्याचे काम या माध्यमातून केले जाते.


‘सोल अँड सॉईल’ – थोडे थांबण्यासाठी, मनसोक्त काहीतरी घडवण्यासाठी आणि स्वतःला नव्याने शोधण्यासाठी एक अनोखा अनुभव!

Comments


9561398225

  • Facebook
  • Instagram

©2021 by Stay Featured. Proudly Created by Buzzer Media & Advertising

bottom of page