निसर्ग सृष्टी वेलफेअर फाऊंडेशनतर्फे ध्वनी प्रदूषण नियंत्रणाविषयी जागरूकता कार्यक्रम
- Neel Deshpande
- Jul 22
- 1 min read
पुणे, १३ जुलै २०२५: निसर्ग सृष्टी वेलफेअर फाऊंडेशन, पुणे यांच्या वतीने दिनांक १२ जुलै २०२५ रोजी सकाळी ८ ते ९ या वेळेत कलावती दत्तात्रय कोतवाल हायस्कूल, हडपसर, पुणे येथे ध्वनी प्रदूषण नियंत्रणाविषयी जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. जाधव यांनी फाऊंडेशनच्या टीमचे स्वागत करून केली. निसर्ग सृष्टी वेलफेअर फाऊंडेशनची ओळख आणि त्यांच्या कार्याची माहिती सौ. कुंभार यांनी उपस्थितांना करून दिली.
फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. गरिमा कवठेकर यांनी ध्वनी प्रदूषण नियंत्रणाविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी फाऊंडेशनद्वारे राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचा आणि भविष्यातील योजनांचा आढावा घेतला. या कार्यक्रमात : १८० विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

कार्यक्रमाला फाऊंडेशनचे व्यवस्थापक श्री. राजेंद्र कुलकर्णी उपस्थित होते. मुख्याध्यापिका सौ. जाधव यांनी या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल, असे नमूद करत फाऊंडेशनला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी सौ. पवार यांनी सर्वांचे आभार मानले.
निसर्ग सृष्टी वेलफेअर फाऊंडेशन पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक कल्याणासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वांनी फाऊंडेशनचे कौतुक केले.
संपर्कासाठी: निसर्ग सृष्टी वेलफेअर फाऊंडेशन, पुणे

Email- nisarg.srishti@gmail.com
Official no. 9423088707






Comments