top of page

विश्वकल्याण इंग्लिश मीडियम स्कूल ,जुनियर कॉलेज,चिखली- विद्यार्थी प्रतिनिधी अधिकार समारंभ संपन्न

शुक्रवार, दि.२८/०७/२०२३ या दिवशी विश्वकल्याण इंग्लिश मीडियम स्कूल आणि जुनियर कॉलेज,चिखली या शाळेत Investiture ceremony (अधिकृत पद,अधिकार समारंभ) सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यासाठी पिंपरी चिंचवड विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अमरनाथ वाघमोडे सर आणि माने सर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. दिपाली शिरगावे मॅडम, प्रशासक दीपक आफले, शाळेचे संस्थापक जितेंद्र मेहता सर आणि नीलम मेहता मॅडम कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे आणि शाळेच्या मुख्याध्यापिकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

या सोहळ्यामध्ये मुलांमध्ये इयत्ता १० वी.चा कुमार प्रिन्स चौधरी आणि मुलींमध्ये १० ची कुमारी सिद्धी शिंदे या दोघांची विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली.इयत्ता ९वी चा कुमार ओंकार इंगोले व कुमारी साक्षी सैनी यांची खेळाचे प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून इयत्ता १०वी चा कुमार रोहित राठोड आणि इयत्ता ९वी ची कुमारी अंशूला विभूते यांची निवड करण्यात आली.या सोहळ्यात हाऊस प्रतिनिधी यांची देखील निवड करण्यात आली. मुलांच्या नेमणुकीसाठी शाळेचे क्रीडा शिक्षक जगदीश चव्हाण सर यांनी विद्यार्थ्यांना योग्य असे मार्गदर्शन केले व प्रोत्साहन दिले. तसेच शाळेच्या पर्यवेक्षक शिल्पा शिंदे मॅडम यांचे देखील मोलाचे मार्गदर्शन लाभले.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका डॉ.दिपाली शिरगावे मॅडम यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देऊन शपथविधीचा कार्यक्रम संपन्न केला.यावेळी मुख्याध्यापिकांचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे डॉ. अमरनाथ वाघमोडे सर यांनी विद्यार्थ्यांना उत्स्फूर्त असे प्रोत्साहन देऊन सुंदर असे मार्गदर्शन केले.त्याचबरोबर त्यांनी वाहतुकीचे नियम आणि त्यांची अंमलबजावणी का करणे आवश्यक आहे हे देखील समजावून सांगितले. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली.

bottom of page