top of page

प्राचार्या प्रिती दबडे' राही कदम इन्स्पिरेशन अवॉर्डने' सन्मानित

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इंग्लिश मीडियम स्कूल व ज्यु. कॉलेज,आकुर्डीच्या प्राचार्या प्रिती दबडे यांना डॉ.एस. एल.चव्हाण प्रतिष्ठान, पुणे यांच्या विद्यमाने 'राही कदम इन्स्पिरेशन अवॉर्ड' ने २२ जानेवारी रोजी सदाशिव पेठ, पुणे येथे सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी डॉ. रेखा चौधरी, ग्लोबल वेलनेस ॲम्बेसिडर ऑफ इंडिया, या प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या होत्या. या व्यतिरिक्त महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मा.रूपालीताई चाकणकर यांचीही विशेष उपस्थिती होती. या सोहळ्याचे आयोजन मुख्यत्वे महिलांच्या उत्तुंग कामगिरीबद्दल त्यांना कौतुकाची थाप व प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते.


त्यामुळे विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या अनेक हिरकणी महिलांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. उपस्थित सर्व विशेष महिलांना सन्मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. पीडीइएच्या इंग्लिश मीडियम स्कूल व ज्यु.कॉलेजच्या प्राचार्या प्रिती दबडे यांनी देखील शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांच्याकडून अभिनंदन होत आहे. कार्यक्रमाचे आयोजन डॉ.गिरीजा शिंदे, प्रेसिडेंट ऑफ डॉ. एस.एल.चव्हाण प्रतिष्ठान पुणे,यांच्यामार्फत करण्यात आले होते.

Comentários


bottom of page