करंजाळे शाळेतील मुलांनी लिहिलेल्या "निसर्गाची शाळा" या कवितासंग्रहांचा प्रकाशन सोहळा दिमाखात संपन्न
- Neel Deshpande
- 2 days ago
- 2 min read
करंजाळे: आंतरराष्ट्रीय कला दिन व करंजाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून "निसर्गाची शाळा" या बालकविता संग्रहाचा प्रकाशन मंगळवार दिनांक १५ एप्रिल २०२५ रोजी मा.श्री.विठ्ठलराव भोईर ( गटविकास अधिकारी,पं.स.जुन्नर) व कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश साबळे ओतुरकर (अध्यक्ष, श्रावणधारा काव्य महोत्सव समिती) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी वि. रा. धोंडगे (शिक्षण विस्तार अधिकारी, पं.स.जुन्नर ), पां. वि. भौरले (शिक्षण विस्तार अधिकारी, पं. स. आंबेगाव ), बा. म. भालेकर ( केंद्रप्रमुख, सितेवाडी), सा. भा. मांडवे ( केंद्रप्रमुख, मढ), श्रावणधारा समितीचे कार्याध्यक्ष प्रा. सुरेश डुंबरे, उपाध्यक्ष डॉ. खं. र. माळवे, सचिव डॉ. प्रविण डुंबरे, सहसचिव संजय गवांदे, खजिनदार व लेण्याद्री प्रकाशनाचे प्रकाशक रणजीत पवार, सहखजिनदार तथा वर्ल्ड व्हिजन टाईम्स मुंबई साहित्यिक दैनिकचे संपादक प्रा. नागेश हुलावळे व करंजाळे ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील मुंढे, उपाध्यक्षा सैंद्रा शेळके, सदस्य नंदकिशोर जगताप, दिनेश जगताप युवराज ढेंगळे, दशरथ कोरडे, आशा शिंदे, गीताबाई शेळकंदे,मंगल मुंढे, हे सुद्धा उपस्थित होते.
याप्रसंगी बालकवींना शुभेच्छा देण्यासाठी बाळासाहेब लांघी(अध्यक्ष,शिक्षक समिती, पुणे जिल्हा),पोपट राक्षे (अध्यक्ष,आर. पी. आय. जुन्नर), विकास राऊत (सामजिक कार्यकर्ते) सुभाष जगताप, कानिफनाथ लांडे, पोपट मुंढे, तुकाराम लांघी, दिनकर जगताप, उपस्थित होते. निसर्गाची शाळा काव्यसंग्रह लेण्याद्री प्रकाशनतर्फे तयार करण्यात आला आहे .
शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षाचा आनंद साजरा करत, शाळेचा ७५वा वाढदिवस मान्यवर अतिथींच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी चित्रकार प्रा. सुरेश डुंबरे यांनी आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या प्रकाशन समारंभात धनश्री पवार, कुणाल शेळके, मयूर पारधी, ज्ञानेश्वरी शेळके या बालकवींनी आपले मनोगत व्यक्त करत आपल्या कविताही सादर केल्या व उपस्थितांची मने जिंकून घेतली.
पं. स. जुन्नरचे गटविकास अधिकारी विठ्ठलराव भोईर यांनी आपल्या मनोगतात शाळेतील या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले .या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन मढ केंद्राचे केंद्रप्रमुख साहेबराव मांडवे यांनी केले. निसर्गाच्या सानिध्यात असणाऱ्या करंजाळे शाळेच्या मैदानात सुंदर मंडप उभारण्यासाठी नंदकिशोर जगताप यांचे सौजन्य लाभले. शाळा व्यवस्थापन समिती आणि करंजाळे गावातील ग्रामस्थांनी सहकार्य करून कार्यक्रमाची शोभा द्विगुणीत केली होती.
तर या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन उत्तम सदाकाळ यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक नामदेव मुठे व शिक्षिका सरला दिवटे यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनेक जबाबदाऱ्या स्वीकारून त्या यशस्वीरीत्या पार पाडल्या. कार्यक्रमाचे नेटके संयोजन व आभार प्रदर्शनाचे काम नंदकुमार साबळे यांनी केले.
Comentários