तरुणांमध्ये कौशल्य विकास आणि उद्योजकतेला चालना देण्याची गरज असे
वक्तव्य प्रमुख पाहुण्या श्रीमती कमल परदेशी (सचिव, अंबिका मसाला ग्रुप) यांनी
व्यक्त केले उद्घाटक म्हणून त्या उद्योजकता कार्यशाळेत उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, युवकांमध्ये कौशल्य विकास
आणि उद्योजकतेला चालना देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न
धावता ग्रामीण भागातील उद्योगांना प्रोत्साहन द्यावे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ आणि पूना कॉलेज
विद्यार्थी विकास मंडळ आणि आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने पूना
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आफताब अन्वर शेख,उपप्राचार्य डॉ.इकबाल शेख
यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेचा उद्देश विविध
क्षेत्रातील उद्योजकता विकास आणि विपणन व्यवस्थापन या विषयावर ज्ञान आणि
कौशल्ये प्रदान करणे हा होता.
यानंतर श्रीमती कीर्ती राजगुरू (कीर्ती उद्योगाच्या संस्थापक) यांनी
विद्यार्थ्यांना उद्योजक कसे व्हावे या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच महिलांना या
क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रोत्साहित केले.
मि.मोहम्मद सादिक हन्नुरेजी यांनी सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि आयटी
उद्योजक कसे व्हावे या विषयावर आपले विचार मांडले आणि विद्यार्थ्यांना आयटी
क्षेत्रात करिअर करण्याचे आवाहन केले.
यावेळी डॉ.शिरीन शेख, डॉ.शाहिद जमाल अन्सारी, प्रा.जमीर सय्यद,डॉ.विनोद
,फ़ाहिम अहमद डॉ.गुलनवाज उस्मानी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.शबाना शेख, प्रा. फारुख शेख प्रा.शबिना खान, प्रा.
शाहेदा अन्सारी, प्रा. स्वालेहा मुल्ला, प्रा. हिना सय्यद, प्रा. इम्रान कुरेशी, प्रा.उमर
हसन इ. परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आयोजन व सुत्रसंचालन विद्यार्थी विकास
अधिकारी डॉ.बाबा शेख यांनी केले तर आभार सबलेफ्टनंट डॉ.शाकीर शेख यांनी
मानले.
コメント