top of page

हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलमध्ये पालखी सोहळा उत्साहात साजरा

आपल्या मुलांना सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध अश्या पालखी सोहळा मिरवणूक , संत भाषा साहित्यातील अभंग, भजन, कीर्तन,भारुड असे विविध प्रकार समजण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या वयोमानानुसार स्पर्धा घेण्यात आल्या आणि त्याद्वारे त्यांनी आनंद घेतला व संत साहित्य शिकले.

विद्यार्थी विद्यार्थिनी भगवान विठ्ठल रुक्मिणी, विविध संत, वारकऱ्यांच्या वेषात आले होते. गावातून पालखी मिरवणुकीचा आनंद लुटला, विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे दर्शन घेतले, फुगडी, रिंगण, लेझीम असे खेळ खेळले.

संपूर्ण शाळेचे वातावरण विठ्ठल रुक्मिणी, ज्ञानेश्वर माऊलीच्या जय घोषाने पवित्र,.खूपच सुंदर, भक्तीमय व उत्साहाने भरलेले होते. आपली संस्कृती समजून घेवून व पुढे नेण्याचा उत्तम प्रयत्न मुलांनी शिकण्यासाठीचा हा अनुभव शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येतो असे प्राचार्या सौ रेणू पाटील यांनी सांगितले.

माननीय शालेय व्यवस्थापन सदस्य श्री कृष्णा भिलारे (संस्थापक, अध्यक्ष), सौ. संगीता भिलारे (सचिव), श्री. कुणाल भिलारे (संचालक), सौ यशस्विनी भिलारे यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अभंग, भजन, कीर्तन,भारुड व लेझिम नृत्याचे कौतुक केले.

bottom of page