हेरिटेज इंटरनॅशनल स्कूल, कासार अंबोली, मुलशी, पुणे
दिनांक - २५ फेब्रुवारी २०२५
हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक श्री. कृष्णा भिलारे सर, सचिव सौ. संगीता भिलारे मॅम व्यवस्थापक संचालक अध्यक्ष श्री.कुणाल भिलारे सर तसेच व्यवस्थाकीय संचालिका सौ. यशस्विनी भिलारे मॅम व शाळेच्या मुख्यध्यापिका सौ. डॉ. रेणू पाटील मॅम यांनी फेब्रुवारी २०२५ ला विद्यार्थ्यांना दिनांक २४ आणि २५ तारखेला ऐतिहासिक चित्रपट "छावा" पाहण्याची एक चांगली संधी प्रदान केली. या चित्रपटाने स्वराज्यप्रती असणारे प्रेम हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या संघर्ष आणि बलिदानांबद्दल आदर आणि कौतुकाची भावना जागृत केली आहे.

"छावा" हा २०२५ चा ऐतिहासिक कृती चित्रपट आहे. जो छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे, जो शिवाजी सावंत यांच्या प्रसिद्ध कादंबरीने प्रेरित आहे. या चित्रपटात त्यांचे शौर्य, दृष्टी आणि स्वराज्य प्रेम आणि आपल्या हिंदवी राज्याविषयी असणारे अतूट समर्पण यांचे एक शक्तिशाली चित्रण रेखाटले असून जिवंत देखावा हा मनाला अगदी भावनिक व हृदयाला स्पर्शून जातो.
"छावा" पाहणे हा एक महत्त्वपूर्ण शैक्षणिक हेतू आहे. हे मराठा योद्धा आणि त्यांच्या कुटुंबियांनी केलेल्या संघर्षाची जाणीव विचारात घेतलेल्या कथा आणि त्याग प्रकाशित करते, विशेषत: समाजावरील युद्धाच्या,निर्बलतेच्या, जाती विचार ह्या सारख्या परिणामावर आणि मागे राहिलेल्या लोंकाच्या लवचिकतेच्या मनावर विचार करून लक्ष केंद्रित करते.
छत्रपती संभाजी महाराजांचे धैर्य व संघर्ष दर्शविणारे मराठा धर्म रक्षक आजच्या युगात हा चित्रपट मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करतो. तसेच हे विद्यार्थ्यांना समजण्यासाठी स्वराजासाठी केलेले बलिदान आणि या मावळ्यांचे ऐतिहासिक महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत करते.
छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा धगधगता इतिहास मांडणाऱ्या बहुचर्चित ‘छावा’ या हिंदी चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून हेरिटेजच्या विद्यार्थ्यांनी देखील त्याचा उस्फूर्त प्रतिसाद घेतला तसेच चित्रपट दरम्यान विद्यार्थ्यांनी मोठ्या आवाजात जयघोष करत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची शिवगर्जना देखील करून डोळ्यातील अश्रू वाहत छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी प्रेम व आपुलकी व्यक्त केली.
विद्यार्थ्यांना ज्ञानात भर घालून ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकल्याबद्दल आणि हिंदवी मराठा साम्राज्याच्या समृद्ध वारशाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी प्रेरणा दिल्याबद्दल या चित्रपटाचे मनापासून कौतुक व शतशः आभार.
Comments