दिनांक 12/6/2024 च्या शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार हेरिटेज इंटरनॅशनल स्कूल मध्ये प्रहारी गटाची स्थापना करण्यात आली आहे.
बालकांमध्ये ड्रग्स आणि मादक पदार्थांचा प्रसार आणि अवैध तस्करी प्रतिबंध या विषयावर कृती आराखडा अंमलबजावणीबाबत हेरिटेज प्रभारी गट सदस्य व हेरिटेज रोटरी इंटरॅक्ट क्लब सदस्यांनी अंमली पदार्थ विरोधी जागरूकता कार्यक्रमावर एक चर्चासत्र आयोजित केले होते. सुरुवात इयत्ता 6 वी ते इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती सत्राने झाली.
प्रहारी गटप्रमुख व इतर सदस्य विद्यार्थी यांनी अंमली पदार्थ विरोधी समितिच्या कृती आराखड्याप्रमाणे ते कार्य कसे करतात याची माहिती दिली आणि अंमली पदार्थ आणि इतर मादक पदार्थांच्या घातक परिणामांबद्दल जागरूकता पसरवण्याची धुरा या चर्चासत्राद्वारे व विद्यार्थ्यांना व्हिडिओ दाखवून त्यांना अंमली पदार्थ कसे दूर राहता येईल याबद्दल माहिती दिली.
स्वतःला अंमली पदार्थांपासून किंवा इतरांच्या प्रभावाखाली न जाता विद्यार्थ्यांनी स्वतःवर काम करून व्यक्तिमत्वविकास व इतर कलागुणांच्या क्षमतांचा विकास करण्याचा सल्लाही या प्रहारी गटाने दिला.
हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या डॉ.रेणू पाटील यांनी विद्यार्थ्यांना समवयस्कांची निवड हुशारीने करण्याचे मार्गदर्शन केले. त्यांना विषारी लोकांच्या प्रभावाखाली न जाण्याचा विद्यार्थ्यांना सल्ला दिला. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना असा सल्ला दिला पाहिजे की जेव्हा एखादा पर्याय दिला जातो तेव्हा ड्रग्सपेक्षा जीवन निवडा आणि आघातातून जीवन वाचवा.
प्रहरी गटाचे कार्य पाहणाऱ्या शिक्षक प्रतिनिधी सौ हिमाली व सौ सीमा यांनी विद्यार्थ्यांना असा सल्ला दिला की, "व्यसन हा शब्दच वाईट वाटतो. तो तुमच्यासाठी नाही, म्हणून नेहमी योग्य निवड करा."
शाळेतील स्कूल काउन्सलर आदिती यांनी देखील दारू, सिगारेट किंवा ड्रग्ज यांसारख्या मादक द्रव्यांचे सेवन केल्याने होणारे वाईट परिणाम व्हिडिओद्वारे व संभाषणातून स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांनी अँटी नार्कोटिक्स एनजीओ ऑफ इंडियाने प्रकाशित केलेला व्हिडिओ देखील दाखवण्यात आल्या तसेच अनिल अवचट सरांचे TedX tallk व मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र याबद्दलही मुलांना माहिती देण्यात आली. ज्यामुळे त्यांना ड्रग्सचे तोटे समजण्यास खूप मदत झाली. आजच्या
या अनुभवाने सर्व विद्यार्थ्यांवर एक वैचारिक छाप सोडली असे प्राचार्या म्हणाल्या.
शालेय व्यवस्थापन सदस्य श्री. कृष्णा भिलारे (संस्थापक, अध्यक्ष), सौ. संगीता भिलारे (सचिव), श्री. कुणाल भिलारे (संचालक), सौ. यशश्विनी भिलारे यांनी विद्यार्थ्यांनी प्रहारी गटाद्वारे केलेले प्रबोधनपर कार्याबद्दल कौतुक केले व यापुढे विद्यार्थ्यांनी स्वतःहून केलेल्या उपक्रमाबद्दल व आपल्या साथीदारांना चांगल्या सवयी लागाव्यात व चुकीच्या दिशेने न जावे हा संदेश असाच पुढे देत राहावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
Comments