top of page

फिनो पेमेंट्स बँक बनली आयपीओ फाईल करणारी पहिली नफ्यातील फिनटेक

Writer: Team Stay FeaturedTeam Stay Featured

पेमेंट बँका म्हणून चार वर्षे कार्यरत असलेल्या ब्लॅकस्टोन, आयसीआयसीआय ग्रुप आणि बीपीसीएलचे पाठबळ लाभलेल्या फिनो पेमेंट्स बँक लिमिटेड (एफपीबीएल)ने आयपीओकरिता सेबीसोबत मसुदा दस्तावेज नोंदवला आहे. बाजारातील सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार, आयपीओचे आकारमान ₹1,300 कोटी असू शकते. या इश्यूत ₹ 300 कोटी त्याचप्रमाणे ओएफएस घटकांच्या ताज्या इश्यूचा समावेश आहे.



एफपीबीएल ही शेड्यूल्डेड कमर्शियल बँक असून आपल्या डिजीटल वित्तीय सेवांच्या साह्याने उदयोन्मुख भारतीय बाजारांमध्ये कार्यरत आहे. ही कंपनी तंत्रज्ञान-सक्षम वित्तीय समावेशक पर्यायातील आद्यकर्ता असलेल्या फिनो पेटेक लिमिटेड (एफपीएल)च्या संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे. एफपीएल’ ला ब्लॅकस्टोन, आयसीआयसीआय ग्रुप, भारत पेट्रोलियम आणि आयएफसी यांसारख्या महत्त्वाच्या गुंतवणुकदारांचे पाठबळ आहे.


आर्थिक वर्ष 20 च्या चौथ्या तिमाहीत ही फिनटेक बँक नफ्यात राहिली आणि तेव्हापासून सातत्याने नफ्यात वाढ झाली आहे. यामुळे एफपीबीएल ही आयपीओ फाईल करणारी पहिली नफा कमावणारी फिनटेक ठरली.


मागील काही वर्षांपासून आपल्या बँकिंग पद्धतीत डिजीटायजेशन आणि वृद्धीचा अवलंब करत एफपीबीएल’ ने व्यवहार आकारमान वाढलेले पाहिले आहे. डीआरएचपी’ मध्ये नमूद करण्यात आल्याप्रमाणे आर्थिक वर्ष 21 दरम्यान पेमेंट बँक मंचावर 434 दशलक्षहून अधिक व्यवहारांची नोंद झाली आणि एकूण व्यवहारांनी रु. 1.32 लाख कोटींचा पल्ला ओलांडला आहे. फिनटेक उद्योग क्षेत्रात भक्कम नेतृत्व स्थिती असून मार्च 2021 दरम्यान मायक्रो एटीएम’ चे सर्वात मोठे नेटवर्क होते आणि 55% च्या बाजार वाट्यासह 6.4 लाखांचे मर्चंट नेटवर्क आणि 25.7 लाख बँक खाती लाभली आहेत.


सध्याचा काळ वित्तीय क्षेत्रासाठी आव्हानांचा असूनही डिजीटल व्यवहारांवर बेतलेली पद्धत आणि विना-कर्ज जोखीम यामुळे एफपीबीएल’ ला प्रगती साधणे शक्य झाले. आर्थिक वर्ष 21 करिता मागील तीन वर्षांसाठी सीएजीआर 29%नी वाढला असून ₹791 कोटींचा महसूल जमा झाला. डीआरएचपी’ मध्ये नोंदवण्यात आलेल्या माहितीनुसार, वार्षिक अंदाजे 15% सह आर्थिक वर्ष 21 दरम्यान बँकेने ₹20.5 कोटींचा नफा नोंदवला.


या इश्यूकरिता नियुक्त करण्यात आलेल्या गुंतवणुकदार बँकर्समध्ये एक्सिस कॅपिटल लिमिटेड, सीएलएसए इंडिया प्रा लि, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड आणि नोमुरा फायनान्शियल अॅडव्हायजरी सर्विसेस प्रा लि’ चा समावेश आहे.




Comentários


9561398225

  • Facebook
  • Instagram

©2021 by Stay Featured. Proudly Created by Buzzer Media & Advertising

bottom of page