top of page

पूना कॉलेज तर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निम्मित मानवंदना

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त पूना कॉलेज विद्यार्थी विकास मंडळ, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना+2,आयक्यूएसी यांच्या वतीने मानवंदना सभेचे आयोजन पूना कॉलेजचे प्राचार्य प्रो. डॉ.आफताब अन्वर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.


एन.एस.एस.कार्यक्रम अधिकारी प्रा. असद शेख, प्रा. वसुधा वहवाल, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. बाबा शेख, एनसीसी अधिकारी सब लेफ्टनंट डॉ. मोहम्मद शाकीर शेख, सलमान सय्यद, राष्ट्रीय सेवा योजना +2 स्वयंसेवक, यांनी भारतरत्न डॉ. बी.. आर. आंबेडकरांना मानवंदना देण्यात आली.





डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना प्राचार्य डॉ.आफताब अन्वर शेख यांनी विद्यार्थ्यांना डॉ.आंबेडकरांचे विचार आत्मसात करुन स्वत्रंता समता व बंधुता यांचा अंगीकार करन्याचे आवाहन केले.


हॉटेल अरोरा टॉवरजवळ या कार्यक्रमाचे संचालन डॉ.बाबा शेख यांनी केले तर आभार प्रा. असद शेख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एनएसएस स्वयंसेवक आणि एनसीसी कॅडेट्स यांनी परिश्रम घेतले.

Comments


bottom of page