top of page

पूना कॉलेज कैंप पुणे व पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वच्छता ही सेवा” अभियान

पूना कॉलेज ऑफ आर्टस सायन्स कॉमर्स व पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वच्छता ही सेवा” उपक्रमांतर्गत आभियान राबविन्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या (+2) स्वयंसेवकांनी अरोरा टावर चौक ते जे जे गार्डनमागील भाग व जे. जे. गार्डनमधील परिसर स्वच्छ केले.

पूना कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना (+2) स्वयंसेकानी स्थानिक व कॅन्टोन्मेंट कर्मचार्‍यांशी संवाद साधला आणि त्यांना स्वच्छ वातावरण राखण्याबद्दल प्रशिक्षित केले. पर्यावरणीय शाश्वततेच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून,स्वयंसेवकानी हरित आणि निरोगी इको सिस्टममध्ये योगदान देण्यासाठी जे. जे. गार्डन या ठिकाणी वृक्षारोपण केले.

या प्रसंगी मुख्य संचालक संवर्धन ईस्टर्न कमांड एस. एन. गुप्ता, कोलकाता,मुख्य संचालक वेस्टर्न कमांड चंदीगड शोभा गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड रॉबिन बलेजा, ,जॉइंट सीईओ पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड रोहित सिंग, आझम कॅम्पसचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार आझम कॅम्पस , पूना कॉलेजचे प्राचार्य डॉ. आफताब अन्वर शेख , उपप्राचार्य इम्तियाज आगा ,महिला कार्यक्रम-अधिकारी ,वसुधा व्हावळ, राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम- अधिकारी प्रा.शेख अशद प्रा इन्तेकाब आतार ,डॉ .अहिद-उर-रहमान , सलमान सय्यद उपस्थित होते

Comments


bottom of page