top of page

पूना कॉलेजमध्ये "राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 -अंमलबजावणी " ह्या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या सहकार्याने पूना कॉलेज वाणिज्य विभाग, आय क्यू ए सी व हिंदी विभागाच्या संयुक्त विद्यमाने पूना कॉलेज येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंमलबजावणी विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न झाली .प्राचार्य डॉ. आफताब अनवर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रियासत पिरजादे यांनी कार्यशाळेचे आयोजन केले.





सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वाणिज्य विभागाचे भूतपुर्व विभागप्रमुख डॉ. संजय कप्तान यांनी बीजभाषण केले. त्यांनी राष्ट्रीय शिक्षा नितीचे स्वरूप, उद्दिष्टे व ती लागू करण्यासाठी येणारी आव्हाने या विषयावर आपले विचार व्यक्त केले.






उदघाटन प्रसंगी प्राचार्य डॉ. आफताब अनवर शेख यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची प्रशंसा करताना संगीतले की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 एकविसाव्या शतकाची आव्हाने स्वीकारण्यास विद्यार्थ्यांना सक्षम बनवेल. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या सुवर्ण संधी उपलब्ध करून देतील.


पूना कॉलेज वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. नसरीन खान यांनी प्रास्ताविक केले. मुख्य वक्ता डॉ. रज़िया बेगम, चेन्नई, मौलाना आजाद नेशनल उर्दू यूनिवर्सिटी हैदराबादचे डॉ. पठान रहीम, डॉ. मुश्ताक पटेल, डॉ. सुरेखा मंगलगी, बेंगलुरु यांनी आपले विचार व्यक्त केले. उदघाटन सत्राचे संचालन डॉ. वाफिया वहिद यांनी तर आभार सब लेफ्टनेंट डॉ. मोहम्मद शाकिर शेख यांनी केले.


प्रथम सत्राची अध्यक्षता डॉ. पठान रहीम खान, हैदराबाद यांनी केली. भेन्डा मैसूर येथून आलेल्या डॉ. शाफिया फरहीन, डॉ.प्रिया ए., केरल तसेच प्रा. अथिरा, बैंगलरु यांनी विषय प्रस्तुती केली.


समापन सत्रामध्ये डॉ. अंजली आलेकर, मुंबई, डॉ. किन्नरी ठक्कर, मुंबई यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 शी संबंधीत सर्व सभी शंकांचे नि

रसन केले. समापन सत्राचे संचालन डॉ. वाफिया वहिद यांनी तर आभार डॉ. बाबा शेख यांनी मानले.

या प्रसंगी डॉ नागनाथ भेंडे, कलबुर्गी , डॉ. शकिला मुल्ला, उप प्राचार्या सरिता गोयल, प्राचार्या उज्वला पिंगले, संगीता रॉय, आरती देशपांडे, तुर्कमेनिस्तान ची विद्यार्थिनी सुरय्या, सुरेखा आवटे, लक्ष्मी छाया उपस्थित होते.


कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉ. हामेद हाशमी, डॉ.इरम खान, डॉ. रिज़्वान सैय्यद, डॉ. अकबर सैय्यद, मिस फायेज़ा शेख, डॉ. एम. फाज़िल शरीफ़, मिस मुबिना शेख, प्रा. सईद इनामदार यांनी परिश्रम घेतले.


Comments


bottom of page