पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इंग्लिश मीडियम स्कूल आकुर्डी, या विद्यालयामध्ये इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पी. डी. इ. ए. इंग्लिश मीडियम स्कूल आकुर्डी व ज्ञान प्रबोधिनी स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या स्पर्धेसाठी मार्गदर्शक व प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष आदरणीय श्री. राजन लाखे हे मान्यवर म्हणून लाभले होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आली. विद्यालयाच्या प्राचार्या प्रिती दबडे यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे श्री. राजन लाखे सरांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व व वाचन कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले.
या स्पर्धेचेे आयोजन प्राची कुलकर्णी यांनी केले होते. या वाचन स्पर्धेत अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धा दोन गटांमध्ये घेण्यात आली. पहिला गट पाचवी ते सातवी व दुसरा गट आठवी ते नववी असा होता. त्यामधून प्रत्येकी तीन क्रमांक काढण्यात आले. पाचवी ते सातवी या गटामधून, पी.डी.इ.ए. इंग्लिश मीडियम स्कूलमधील आराध्य कुलकर्णी (इयत्ता ५ वी) व रुद्र कदम (इयत्ता ७ वी) या विद्यार्थ्यांनी यश मिळवले व इयत्ता आठवी ते नववी या गटातून स्वानंदी वनमाने (इयत्ता ८ वी) व अर्चिता ढोले (इयत्ता ९ वी) या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. स्पर्धेचे परीक्षण महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष विनिताताई अयानपुरे आणि संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ. रजनी सेठ यांनी केले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना तसेच विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे प्रमाणपत्र देण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी या हेतूने विद्यालयाच्या प्राचार्या प्रिती दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे नियोजन यशस्वीरित्या करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता रासकर यांनी केले तर आभार प्रदर्शन किरण जोशी या सरांनी केले.
Comments